Skip to main content

Posts

Showing posts from August, 2022

तिची आठवण!

A click by: Varun Bhagwat  सोडून गेली याहूनही अधिक अजूनही आठवणीतून गेली नाही याचं जास्त वाईट वाटत होतं त्याला... मग विचार आला की तिची आठवण कशी निघून जाईल? माणसं जातात, त्यांच्या आठवणी राहतात. आठवण राहते याचं वाईटच अधिक वाटत राहतं. कारण चांगल्या आठवणी आठवल्या की आता 'ते क्षण' नाहीत म्हणून वाईट वाटतं. वाईट आठवणी आठवल्या की त्या आठवताना अंगावर काटा येतो नि तो म्हणाला की या वाईट आठवणीच नको. पण त्याला काहीच बदलता येत नव्हतं. परिस्थितीचा स्वीकार हा एकमेव उपाय होता. हा उपाय दिसतो सोपा, पण अमलात आणणं फारच मुश्किल. स्वीकार करायला मनाचं खूप मोठं स्थैर्य लागतं. हे स्थैर्य प्राप्त करायला मनावर नियंत्रण लागतं. मनावर नियंत्रण आणणं हे ज्याचं त्याचं कसब.. अशक्य नाही पण फार अवघड गोष्ट. पण त्याने ठरवलं. मनाचा हिय्या करून पुढचं आयुष्य उत्तम पद्धतीत जगण्याचा निर्णय घेतला. खरंतर हा निर्णय घेणं सुद्धा सोपं नाही. असा निर्णय घेताना स्वतःला शाबासकी द्यायला विसरायचं नाही. कारण मनातून खचल्यावर, कोणी जवळचं सोडून गेल्यावर माणसं आतून पूर्ण तुटतात. सावरणं अवघड असतं. हे जमलं म्हणजे 'पुन:श्च हरी ओम' कर...