Skip to main content

Posts

Showing posts from June, 2020

अडचण आणि gaps

  A Click by: Varun Bhagwat शाळेमध्ये आज सर मुलांशी अनौपचारिक गप्पा मारत होते. सर म्हणाले, “कल्पना करा, तुम्ही रस्त्यातून चालत जाताय... रस्त्यामध्ये मोठ्ठा दगड ठेऊन दिला आहे. तुमचं लक्ष कुठे जाईल?” एक मुलगा खोडीलपणे म्हणाला, “दगड ठेवणाऱ्या माणसाला शोध घेण्याकडे लक्ष जाईल.” सर हसले आणि बोलले, “छान. पण गंमत सोडा. काय दिसेल सांगा पाहू?” मुलं म्हणाली, “दगड.”   “आज अमितच्या शर्टवर डाग पडला होता. मुलांनो त्याच्याकडे पाहताच तुमचं लक्ष कुठे गेलं?” “सर, डागाकडे.”   “उदाहरणं, प्रसंग अनेक आहेत. सगळी गंमत इकडेच आहे. म्हटलं तर दगडापेक्षा रस्ता मोठा आहे. रस्ता दिसायला हवा. पण दिसतो दगड. इतका सुंदर शर्ट अंगावरती आहे, डागापेक्षा शर्ट मोठा आहे. पण लक्ष डागाकडे जातं.” “सर असा दगड दिसला की काढला पाहिजे ना..” “बरोबर... दगड म्हणजे अडचण. आपण ती दूर करावी. स्वत:ला आणि लोकांनाही फायदा होतो.” तेवढ्यात दुसरा मुलगा म्हणाला, “पण सर कधीकधी तो दगड उचलणं अशक्य असतं... अर्थात खूप मोठी अडचण असते जी स्वत: तिथून हलायला तयार नसते. आपण तिथे काहीच करू शकत नसतो. मग करायचं....???” ...

Stress आणि उंट

A Click by: Varun Bhagwat रमा आणि शोभा, Psychology शिकणाऱ्या २ मैत्रिणी lecture नंतर जवळच्या restaurant मध्ये गेल्या. थोडंसं पोटात पडल्यावर आज जे lecture झालं त्यासंबंधी दोघींची चर्चा चालू होती. रमा थोडा विचार करत म्हणाली, “Stress ही एक अशी गोष्ट आहे जी दिसत नाही.” शोभा त्यावर बोलली, “खरंय. पण दिसत नसली तरी direct affect करते. पण ना कधीकधी अगदी छोटी गोष्ट असते, पण ती सुद्धा कसा stress create करते हे मात्र मला झेपत नाही.” “छोटी गोष्ट as in?” “अगं रमा, अनेकदा कारण किती फालतू आहे असं दिसतं पण तेवढ्यावरून एखाद्या माणसाचा ताबा सुटतो किंवा he/ she breaks down.” “हं...” “हं काय अगं? थोडासा stress पण bear करता येत नाही का?” “तसं नाहीये ते शोभा.” “मग कसं आहे?” “दिसताना एखादी गोष्ट छोटी दिसते.   पण ती अनेकदा निमित्तमात्र असते. नुसती निमित्तमात्र असते म्हणण्यापेक्षा ना, मला असं वाटतं की प्रत्येकाचं एक सहन करण्याचं limit असतं, the moment you cross that limit, तो माणूस पूर्ण खचतो शोभा.” “तुला नक्की काय म्हणायचंय?” “हे बघ ते limit ओळखता आलं पाहिजे. एखादा काम करतोय म्हणू...

दोन चेहरे

A sketch by: Prasad Joshi कांचन आज घरी आली ते तोंड पाडूनच. वडिलांचं तिच्या एकूण हालचालीकडे लक्ष होतं. पण स्वत:हून ते मुद्दाम काही बोलले नाहीत. त्यांना माहित होतं आज हे घडणार होतं, तिचा चेहरा पडणार होता, तिला थोडं वाईट वाटणार होतं. त्यांनीच तिला काळे काकांकडे पाठवलं होतं.   काळे काका म्हणजे कांचनच्या बाबांचे खूप चांगले मित्र ज्यांना नाटकाची खूप चांगली समज होती. कांचनच्या नुकत्याच झालेल्या नाटकाच्या performance विषयी चर्चा करण्यासाठी बाबांनी तिला योग्य माणसाकडेच पाठवलं होतं. आत ती आपल्याशी बोलण्यासाठी स्वत:च विषय काढेल याची ते वाट बघत होते आणि तिने विषय काढलाच. कांचन वैतागत म्हणाली, “बाबा...” “बोला.” बाबा वाचत असलेलं पुस्तक मिटत म्हणाले. “झाली माझी काळे काकांसोबत meeting.” “मग काय म्हणाले?” “फारच वाट लावतात हो ते.” उगाच न समजल्याचा आव आणत बाबा म्हणाले, “म्हणजे काय गं?” “म्हणजे मला कितीतरी जण ‘छान झालं हं’ वगैरे म्हणत होते आणि यांनी मात्र प्रयोगाची चिरफाड केली.” “थोडक्यात तुम्हाला जमिनीवर आणलं.” “हां, तुम्ही त्यांचीच बाजू घेणार.” “तसं नाही बाळा. पण कोणीतरी असलंच ...

यशाचं शिखर

A click by: Varun Bhagwat खूप मोठे आणि यशस्वी उद्योगपती सुरंजन यांना नुकतच एक award मिळालं होतं.   त्याप्रित्यर्थ त्यांचा interview चालू होता. interviewer अजित चे प्रश्नांवर प्रश्न चालू होते. त्याला सुरंजन फार सुरेख उत्तरं देत होते. “सर्वांनीच बोध घ्यावा असे तुमचे विचार आहेत sir.” अजित म्हणाला. सुरंजन फक्त हसले. “सर, तुम्ही यशाच्या ज्या शिखरावर सध्या आहात तिथून सगळीकडे बघताना कसं वाटतंय? सगळं आता फार सोपं वाटत असेल नाही?” “बिलकुल नाही.” अजितला उत्तर अनपेक्षित होतं. तो म्हणाला, “तुम्हाला रोखणारा कोण आहे? तुम्ही top वर आहात असं म्हणायला हरकत नाहीये.” “Top वगैरे फार तात्पुरतं असतं.” “As in?” “आपण कोणत्याही शिखरावर पोहोचलो तरी कोणतीच गोष्ट casually घेऊन चालत नाही. तू म्हणतोस तसं so called यशाच्या शिखरावर असताना तर मुळीच नाही. You need to be alert all the time. कोणालाच कमी लेखायचं नाही.” “ते तर खरंय सर.” “खूप खरंय. माझ्या उद्योगाच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मी हा धडा शिकलो की Never take anyone and anything for granted. हे ही शिकलो की दुसऱ्याच्या अनुभवावरूनही आपण ...

दृष्टीकोन

A click by: Varun Bhagwat  प्रत्येकाचा आयुष्य जगण्याचा आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन फार वेगळा असतो. जो तो आपापल्या नजरेने, आपापल्या तऱ्हेने आयुष्याकडे कसं बघायचं हे ठरवत असतो. अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की समोरच्याची अशी mentality कशी असू शकते आणि समोरच्याला प्रश्न पडतो की आपली mentality तशी असूच कशी शकते? उत्तर मिळत नाही. आपण अस्वस्थ होतो. पण पुन्हा प्रत्येक जण वेगळा आहे.   मूळ स्वभाव बदलत पण नाही. या सगळ्या विचारांनी आणि प्रश्नांनी अक्षयला अक्षरश: दिवसभर घेरलं होतं. त्याला वाटायचं की सगळी माणसं त्याच्यासारखी सरळ जगतात. पण हळूहळू दुनियादारी कळत होती. निरनिराळी माणसं त्याला भेटत होती. योगायोगानेच या प्रश्नांची उत्तरं त्याला स्वत:लाच त्याच रात्री वाचलेल्या गोष्टीतून मिळाली. एक होता बैल. तो खूप राबायचा, कष्ट करणं त्याला ठाऊक होतं. एक होती पिसू. हिला काम हा शब्दच माहित नाही. कोणीतरी काम करतंय हे पाहून तिला विशेष आश्चर्य वाटायचं. जसं या बैलाला ही पिसू काहीच काम करत नाही यावरून आश्चर्य वाटायचं. प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा होता. पिसू चा वेळ जात नसे. बैलाला मोकळा वेळ मिळत न...

विचार आणि निर्णय

A click by: Varun Bhagwat उन्हाळ्याचे दिवस होते. तापमान भयंकर वाढलं होतं. पाणवठे कोरडे पडत चालले होते. २ बेडूक जिथे राहत होते तिथला पाणवठा पण पूर्ण कोरडा झाला होता. त्यांना तिथून हालणं भाग होतं. बदलाचा स्वीकार गरजेचा होता. नाईलाज होता. ते पाण्याच्या शोधात निघाले.   खूप कष्टाने एक विहीर त्यांना सापडली, ज्यात थोडं पाणी शिल्लक होतं. एका बेडकाने तिथेच ठाण मांडलं आणि म्हणाला, “आपण इथेच राहतोय.” दुसऱ्याने विहीर पाहिली आणि खूप खोल असलेलं पाणी पाहून म्हणाला, “ऐक माझं, नको.” पहिला वैतागून म्हणाला “तुला कळतंय का आपण किती कष्ट केलेत?” “हो कळतंय.” दुसरा उत्तरला. “मला नाही वाटत तुला कळतंय..” “असं का?” “जर तुला हे जाणवत असतं तर आज आपण इथेच या विहिरीचा आसरा घेण्याचा निर्णय पक्का केला असता.” “पण मी नाही थांबायचं असं म्हणतोय..” “तेच... असं का? असशील माझा senior... पण म्हणून ही मनमानी बरी नव्हे.” “ही मनमानी नाही तर याला holistic thinking असं म्हणतात.” “काय म्हणतात?” “Holistic thinking अर्थात समग्र विचार!” “आपण इतक्या दुरून आलोय. कष्ट पडलेत. इथे पाण्याचा साठा आहे. काय हरकत आहे...

असाही योग (अयोग्य) दिवस!

A click by: Omkar Unde किस्सा असा झाला की कोण्या एका ‘योग’दिनी बाहेर पाऊस पडत होता. मी पावसापाण्यात पण धावत पळत एका इप्सित स्थळी पोचलो. आत पोचलो तर छान वातावरण निर्मिती झाली होती. आंतरराष्ट्रीय योग दिवस असल्याने सगळी तयारी झाली होती. मोठमोठी मंडळी मांड्या ठोकून खालीच बसली होती. मी ही सहभागी झालो. म्हणलं चला.. योगा करू!   आधी lecture सुरू झालं.. सुरुवात थेट भजी च्या उदाहरणाने झाली. आधीच पाऊस , त्यात भजी.. ह्म्म ... पण झालं वेगळंच.. ते म्हणाले की या वातावरणात भजी खावी वाटते.. मी मनात म्हणलं खरंय .. तर ते म्हणाले .. अजिबात खायची नाही.. ताबा असला पाहिजे जिभेवर.. मी म्हणलं तो ताबा बोलताना ठीक आहे पण भजी म्हणजे.. पण त्यांच्या या वाक्याने भजीची आशाच संपली. मग ते म्हणाले माणसाचं आयुष्य ५०% सुख आज ५०% दुःख असं असतं. मी म्हणलं बरं .. भजी खायला मिळत नाही म्हणजे एकूणच ५०% दुःखाचा काळ चालू आहे. मग ' सुख ' मिळविण्यासाठी आमच्या केंद्राला भेट द्या असं ते म्हणाले.. तिथे ताण घालवला जाईल. अहो.. योगाच्या ऐवजी lecture सुरू झाल्याने निम्मे लोक अपेक्षाभंगाने वैतागले होते आणि तणा...