A Click By: Varun Bhagwat "कधी ऐकलंय का की सशाने सिंहाची शिकार केलीये? गाय बिनधास्तपणे वाघाच्या समोरून चाललीये?" शिक्षक मुलांशी बोलत होते. हे ऐकून मुलं हसू लागली. "असं कसं होईल सर?" एक मुलगा सरांना म्हणाला, "आम्ही नाही ऐकलं असं काही!" "नाही ऐकलं ना... कारण अशी गोष्ट एखादा चमत्कार झाला तरच शक्य आहे." शिक्षक मुलांना सांगत होते, "मुलांनो, चमत्कार करणं कोणाच्या हातात आहे?" "आपल्या तर हातात नाही बुवा." अलका म्हणाली. "खरंच?" सरांनी प्रश्न केला. "कसं शक्य आहे सर आपल्याला?? आपल्याकडे काय जादू आहे की काय?" बाकी मुलांनी पण अलकाच्या बोलण्याला दुजोरा दिला. सर हसले आणि म्हणाले, "हो आपल्याकडे जादूच आहे. मनात आणलं तर ती जादू वापरून काहीही करणं शक्य आहे. पण त्यासाठी आपला आपल्यावर विश्वास हवा." मुलं प्रश्नार्थक नजरेने सरांकडे पाहत होती. सर सांगू लागले, "एकदा एका छोट्या पक्ष्याने समुद्रकिनारी अंडी दिली. काही वेळातच भरती आली आणि समुद्राने त्या पक्ष्याची अंडी स्वतःच्या पोटात घातली. पक्ष्याला फार वाईट वाटलं. आधी ...
जे माझ्या मनात आहे तेच अनेकदा आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतं. तेच शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न. कधी कोणती कथा, तर कधी कोणता किस्सा... कधी मनातली कविता तर कधी मनातली संहिता...