Skip to main content

Posts

Showing posts with the label Friendship

मान्य आहे!

  "कोरा कागद घेऊन बसलो आणि ठरवलं की आता काहीतरी लिहावं." "मग?" "सुचत नाहीये." "असं का?" "माहीत नाही. खरंतर सगळ्या गोष्टी जागेवर आहेत. पेन, पेपर, टेबल, शांत जागा." "इतकं पुरतं की अजून काही लागतं?" "लागतं." "काय?" "लिहिण्याची भूक आणि कागदावर काहीतरी छान उमटवण्याची मनापासून इच्छा!" "मग ती नाहीये का तुझी?" "ती पण आहे?" "मग आज कागदावर काही उमटत नाही असं सुरुवातीलाच का म्हणालास?" "कारण खरंच उमटत नाहीये." "म्हणजे भूक आणि इच्छा कमी पडली का?" "काहीतरी पडतं कमी. पण ते कमी पडतं हे पण मान्य करता यायला हवं" "म्हणजे?" "म्हणजे भूक आणि इच्छा याही पलीकडे मला आज लिहिता येत नाहीये, सुचत नाहीये हे मी सांगतोय." "तुला येत नाहीये हे कशाला सांगतोय?" "म्हणजे?" "तू ते लपवू शकतो. लिहायला वेळ नाही असं सांगू शकतोस येत नाही, सुचत नाही हे सांगायचं कशाला?" "वेळ आहे, जागा आहे. पण आत्ता सुचत नाह...

Romantic Headphones

  Wired headphones म्हटलं की त्याचा गुंता आलाच. हाच गुंता सोडवायचा प्रयत्न करत राहुल घरच्या bed वर निवांत पडला. तेवढ्यात तिथे राहुलचा मित्र संकेत आला. त्याने राहुलचा, गुंता न निघालेला headphone बाजूला ठेवला. खिशातून स्वत:चे airdopes काढले. एक त्याला दिला. दुसरा त्याने स्वतःच्या कानात घातला. Airdopes हे Bluetooth ने connect होत असल्याने थोड्या अंतरावर खुर्चीत जाऊन तो बसला. दोघे गाणी ऐकू लागले. राहुल एकदम जुन्या आठवणींत रमला.  बाजूला ठेवलेले गुंत्यात असणारे headphones त्याला दिसले. त्याने ते अलगद स्वतःकडे घेतले. गुंता सोडवत जुन्या आठवणींना उजाळा देऊ लागला. . . Train चा आवाज आधी मोठा होता. जशी train रुळावर रुळली तसा आवाज कानांना normal & used to झाला. राहुल आणि तानियाने एकच wired headphone share केला. Local train मध्ये दोघे एकमेकांसमोर बसले. लोणावळा ते पुणे असा परतीचा प्रवास, बाहेर पावसाचं वातावरण, धुकं जमलेलं, दोघे बऱ्यापैकी चिंब भिजलेले. अर्थात अशा trips ठरवूनच चिंब भिजण्यासाठी केल्या जातात. तशीच ही trip. सोबत group होता. पण आता सगळ्यांची trip enjoy करून झाली होती नि प्...

असं का?

  तुझ्या डोळ्यात खोलवर पाहिलं की कुठलीतरी खोलवर वेदना का दिसते गं? तू कशी आहेस विचारल्यावर हसतेस नि म्हणतेस बरी आहे. त्या हसण्यात तू बरी नाहीयेस, हे का कळतं गं मला? तुझ्या विचारात तू हरवतेस नि मग तुझ्या नजरेत पोकळी का असते? आपण एकमेकांच्या मिठीत नेहमी विसावत नाही, तरी आपली मिठी तुला का हवीहवीशी वाटते? आणि मग आपण मिठीत काही क्षण जास्तच का बरं विसावतो? मिठीचे ते जास्तीचे क्षणच समाधान का देतात? आपण मिठीतून नेहमी अलगद का बाहेर येतो? उबदार मिठी सुटली तरीही तो उबदार स्पर्श हवाहवासा का वाटतो? मिठी सुटताच सहज हातात हात का गुंफला जातो? एकमेकांची सोबत त्या हाताच्या स्पर्शाइतकी उबदार का वाटते गं? आपण एकमेकांच्या कुशीत किंचित जास्त वेळ का रमून जातो गं? आपलं नातं जन्मोजन्मीचं आहे असं का बरं वाटतं? आपण एकमेकांसवे नसतो तेव्हा आठवणींत एकमेकांसवे का बरं असतो? मग भेटल्यावर आपण एकमेकांची किती आठवण काढली होती हे का सांगतो? लिहिता लिहिता तो थांबला. त्याने तिला विचारलं, "असं का गं?" ती पुस्तक वाचत होती. पुस्तकातून डोकं बाहेर काढत म्हणाली, "काय माहित?" नि ती पुन्हा पुस्तक ...

शब्द (कोणता नि कसा?)

शब्द बोलला. बोलून गेला. मग जाणवलं, चुकला.  का बोलला? उगाच बोलला.  खरंतर बोलण्यासाठीच असतात शब्द. पण शब्द चुकले तर मनं दुखावण्याचं काम करतात. माणूस कोणाला तरी वाट्टेल ते बोलून जातो. नंतर पश्चात्ताप करायची वेळ येते.  शब्द शस्त्र आहे. त्यांना धार असते.  कधी कधी ठरवून वार होतो, कधी चुकून वार होतो. कधी कठोर शब्द वापरावे लागतात. कधी नकळत वापरले जातात.  याच्याच जोडीला चांगले शब्दही आहेत, जे मनांना जोडतात. अगदी सहज एकत्र आणतात. शब्दांची गुंफण करून प्रेम दर्शवता येतं. हेच शब्द एकत्र करून राग व्यक्त होतो.  शब्द नकळत घाव घालतात. हेच शब्द घाव भरून काढतात.  शब्द ओले, शब्द कोरडे. शब्द शहाणे, शब्द वेडे. शब्द जोडले तर वाक्य. वाक्य जोडत अर्थपूर्ण संवाद. संवाद एकतर बरा किंवा वाईट. संवाद माणसाला जोडतो, अथवा तोडतो. शब्दाची ताकद मोठी असते. ती ताकद एखादी गोष्ट घडवत किंवा बिघडवत असते.  शब्दांना बांध घालून अडवायचं काम खरंतर शब्दच करू शकतात. अमितच्या बाबतीत असंच घडलं जेव्हा तो अशांत आणि अस्वस्थ झाला होता. त्याच्या तोंडून चुकून त्याच्याच मित्राविषयी चुकीचे शब्द निघाले. अमि...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...

अर्धविराम ;

  A click by : Varun Bhagwat किती सांगायचं, किती बोलायचं, किती काय काय करायचं राहूनच गेलं. आपण एकमकांसोबत नव्हतो की सोबत असून सोबत मिळत  नव्हती आपली एकमेकांना? खरंतर दोन्ही होतं, पण फार काळ नव्हतं. अगदी थोडा अवधी आपण सोबत होतो. पण जितका काळ सोबत होतो त्या काळात खूप छान सोबत केली आपण एकमेकांची! एकमेकांना वेळ दिला, एकमेकांची काळजी घेतली. तुझं दुःख माझं मानलं, माझ्या आनंदात तू तुझा आनंद शोधलास. माझ्या हास्यात हसू शोधलंस. तुझ्या रडण्यात मी माझे हरवून गेलेले, कोरडे होऊन गेलेले अश्रू शोधले. माझ्या विनोदांमध्ये पोट दुखेपर्यंत हसलीस. हसता हसता पटकन रडून मोकळी झालीस. सहज मोकळं होणं, मनातलं बोलून टाकणं तुझ्याकडून तर शिकलो. किती काळ स्वतःतच हरवलेल्या तुला त्यातून बाहेर काढणं मात्र मलाच जमलं. तुला चित्र काढताना पाहून वाटलं, ही कला काही आपल्याला जमली नाही गड्या! पण म्हणूनच तुला या कलेत बुडालेलं पाहून मला तुझ्यात रमायला जमलं.  आपल्या एकत्र असण्यात जान होती. निखळ मैत्रीची गायलेली सुंदर तान होती. पण हे सारं फार लवकर संपलं. खूप काही करायचं राहून गेलं. खरंतर एकत्र असल्यावर जगाची फिकीर नव्ह...

ए दोस्त...

A Click by: Sushil Ladkat “काय म्हणतायत तुमचे मित्र?” “सगळे मस्त आहेत बाबा.” “तशा सारख्या parties चालू असतातच तुमच्या. म्हणजे खुश दिसताय...” “बाबा, you know ही सगळी पार्टीप्रिय मंडळी आहेत. It’s fun... right?” “हं...” नीरज बाबांशी हे बोलत असताना त्याच्या फोन वर काहीतरी करण्यात मग्न होता. आज नीरजच्या बाबांना नीरजशी गप्पा मारायला तसा निवांत वेळ मिळाला होता. किती दिवस ते खरंतर या विषयावर त्याच्याशी बोलायचा विचार करत होते. आज त्यांनी बोलायचं ठरवलं. नीरजचं typical teenager सारखं वागणं अगदीच त्याच्या वयाला शोभणारं होतं. मात्र बाबांना हे ही जाणवत होतं की नीरजची संगत म्हणावी तितकी चांगली नाही. अगदी वाईट होती अशातला भाग नाही. नीरजला म्हणायला खूप मित्र होते. मात्र त्यांच्या मते ते नावापुरतेच होते. नीरजचा एकच खरा मित्र होता अभिनव ज्याच्याशी सध्या नीरज बोलत नव्हता. त्याच्यावाचून आपलं काही अडत नाही आणि आपल्याला बाकीचे खूप मित्र आहेत हे तो दाखवत होता. बाबांच्या मते हे त्याचं फक्त cover होतं. बाबांनी थेट विषयालाच हात घातला. “नीरज, या तुमच्या मित्रांमधला एक तरी मित्र तुला काही झालं तर वेळ...

मित्राने थोबाडीत मारली आणि...

A Click by: Sushil Ladkat “दादा, please यार, महेश माझ्याशी अशा पद्धतीने वागणार असेल ना तर खरंच त्याचा आणि माझा संबंध संपला. दोस्ती गेली तेल लावत.” “Don’t overreact प्रशांत.” “मी overreact करतोय?” “तो चुकून तुझ्या अंगावर ओरडला असणारे.” “चुकून?” “हां... म्हणजे त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं tension असेल आणि तू wrong timing ला काहीतरी बोलला असशील. म्हणून म्हणलं चुकून ओरडला असेल.” “असं कोणी चुकून ओरडतं का?” “नुसतं ओरडत नाही... मारतं पण..” “काय?” “अरे त्या २ मित्रांच्या गोष्टीमध्ये नाही का अक्षय तुषारच्या कानाखाली मारतो.” “असं अर्धवट सांगू नको.” “२ मित्र म्हणजेच अक्षय आणि तुषार beach वर निवांत बसले होते. त्या दोघांमध्ये काहीतरी वाद झाला आणि अक्षयने तुषारच्या कानाखाली वाजवली.” “आणि मग?” “मग काय... तुषार ने समुद्रकिनाऱ्यावरच्या रेतीत लिहिलं- आज माझ्या मित्राने मला थोबाडीत मारली.” “इतकंच?” “हं... थोडा वेळ शांततेत गेला. हे होऊन सुद्धा त्यांचा समुद्रात मस्त डुबकी मारायचा plan काही बदलला नाही.” “आश्चर्य आहे.” “कदाचित मिटवलं असेल त्यांनी. may be अक्षय sorry म...

ये दोस्ती...

A Click by- Sushil Ladkat एक सिंह जंगलाजवळ असणाऱ्या एका शेतावर नजर ठेवून होता. त्या शेतात ४ बैल काम करायचे. हे चारही बैल एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. सिंहाला बैलाची शिकार करायची होती. मात्र ते चौघे कायम एकत्र असल्या कारणाने त्याला हे शक्य होत नव्हतं. तरीही तो संधीची वाट पाहत होता. त्याने एकूणच त्यांच्या रोजच्या दिनक्रमाचा अभ्यास केला होता. अभ्यासातून एक गोष्ट त्याला कळली होती की दिवसातल्या एका ठराविक वेळी हे चौघे एकमेकांसोबत नसतात. त्यावेळी ते वेगवेगळ्या दिशांना जाऊन चक्कर मारून येतात. मात्र तरीही त्याला एक गोष्ट जाणवली की हे एकमेकांपासून फार दूर जात नाहीत. त्याने साधारण अर्थ हा काढला की समजा आपण हल्ला केलाच तर बाकी बैल जे साधारण नजरेच्या टप्प्यात आहेत ते येतील आणि आपल्यालाच पळ काढावा लागेल. कितीही मोठा सिंह असला तरी ४ बैल नक्कीच भारी पडू शकले असते. म्हणून सिंहाने वेगळंच अस्त्र निवडलं. त्याने बोलण्याचा पर्याय निवडला. जेव्हा बैल एकएकटे चक्कर मारायचे तेव्हा त्यातल्या एका बैलाला त्याने गाठलं. आधी तो बैल त्याच्याशी बोलायला पुढे जात नव्हता. सिंह म्हणाला, “अरे तुझे मित्र आजूबाजूला आह...