Skip to main content

Posts

Showing posts from January, 2022

किती पाहावी वाट...

  A click by: Varun Bhagwat कातरवेळ. सूर्य उदास आहे असं वाटत होतं. Bike वर जाणारा मी मित्रासोबत होतो. Highway वर चहाची टपरी दिसली. नकळत गाडी बाजूला घेतली. तिथेच एक बाकडं दिसलं. बसलो. २ कटिंग सांगितले. मित्राने सहज गाणं लावलं.  पद्मजा जोगळेकर यांनी गायलेलं आणि यशवंत देव यांनी लिहून संगीत दिलेलं गाणं. शब्द ऐकले. "तुझ्या एका हाकेसाठी, किती बघावी रे वाट!" या पहिल्याच ओळीने गाण्यात बुडून गेलो. तिथून खूप खूप दूर असणाऱ्या माझ्या तिच्यापर्यंत पोहोचलो. दूर असून खरंतर कसा तिच्यापर्यंत पोहोचलो? हो, शरीराने दूर होती, पण गाणं तिच्या जवळ नेत होतं. खरंतर नाही, बहुधा जवळ आणून तिच्यापासून पुन्हा दूर करत होतं. कारण लगोलग भेट होणं शक्य नव्हतं. वाटलं, माझ्या एका हाकेसाठी वाट पाहतेय का ती?? स्वतःला प्रश्न केला, मी हाक मारत नव्हतो का? जाणवलं की ती किती वाट पाहत असेल. कामानिमित्त कित्येक दिवस तिच्या भेटीविना जातात. तिची आठवण तर रोज होते. हाक मारायचं राहून जातं. ती वाट पाहत असेल. आलो नाही हे पाहून अश्रू गालावर ओघळू देत असेल. खिडकीतून तिला चंद्र दिसतो, तो निरखत असेल. चंद्र कळा बदलतो. कधी वाढत जात...

काय बदललं? फक्त कॅलेंडर?

A click by: Sushil Ladkat काय बदललं? फक्त कॅलेंडर! रोजचा सूर्य तसाच उगवला आहे. सुर्यास्तसुद्धा तसाच, सकाळ तशीच आहे. काय बदललं? फक्त कॅलेंडर! गरमागरम चहानेच दिवसाची सुरूवात होत होती, आजही तशीच होते आहे. काहींचा आळसाने दिवस सुरू व्हायचा, काहींचा उत्साहाने. आजही तेच घडतंय. मग काय बदललं? केवळ कॅलेंडर! वर्तमानपत्रात काल बातम्याच आल्या होत्या, आजही बातम्याच आल्या आहेत. केवळ वर्तमानपत्रावरील तारीख बदलली, वर्ष बदललं. काल ३१ तारीख होती, आज १. दर महिन्यात असतं हे, मग बदललं काय? फक्त कॅलेंडर! आजूबाजूला असणारी माणसं तीच आहेत, रोजची कामं तीच असणार आहेत. काय बदललं? फक्त कॅलेंडर! दिवस २४ तासांचाच राहिलाय, कामाची वेळही तीच राहिलीय. काय बदललं? फक्त कॅलेंडर! . . कष्ट तितकेच आहेत, त्यात काही बदल नाही. रोजची काम तीच आहेत, रुटीन तसंच आहे. बदललं काय, केवळ कॅलेंडर! . . सगळं खरंय, पण माणसाला काही ना काही बदल घडलाय किंवा घडेल (चांगला) हे वाटण्याची संधी आहे हे बदलणारं कॅलेंडर! सूर्य तोच असला तरी उत्साह नवा आहे असं सांगतं हे कॅलेंडर! कॅलेंडर फक्त बदलत नाही, जुनं जे नको आहे ते विसरुन पुढे जायला शिकवतं. जे चांगलं ...