Skip to main content

Posts

Showing posts with the label problem solving

लिही ना...

  A click by: Varun Bhagwat   - आज पूर्ण पान कोरं सोडलंस ? - सुचलं नाही. - सुचलं नाही की तसा प्रयत्न केला नाहीस. - केला ना! - मग का लिहिलं नाहीस ? - अरे.. मी केला प्रयत्न.. - मला सांगण्यासाठी म्हणशील केला प्रयत्न.. - अरे तू होतास तिथे. किती वेळ तुझ्याकडे पाहत होतो. तुला पटत नाही का ? - जोपर्यंत मी शाईने नाही भिजत तोपर्यंत मला नाही पटत. - पण मी. - हे बघ. मला कळतंय. - काय कळतंय ? - तुला quality भारीच हवी आहे तुझ्या लिखाणाची. - अर्थात. - आणि म्हणूनच तू माझ्यावर अर्थात या कागदावर एक शब्द सुद्धा न उमटवता निघून जातोयस. - कदाचित. - कदाचित नाही.. हेच खरं आहे. - बरं मान्य. - तू लिहिलेलं चांगलं आहे की नाही हे लिहील्याशिवाय कसं कळेल..? - म्हणजे ? - अरे तुला वाटतंय की तुला quality stuff सुचत नाहीये. - हां. - पण जोपर्यंत तू माझ्यावर प्रयोग करत नाहीस तोपर्यंत तुलाही कळणार नाही. कधी कधी लिहायला घेतलं की सुचत जातं. कधी कधी अगदी वाईट लिहिलं जाईल. पण वाईट लिहिण्याला घाबरु नकोस. लिहिता हो. लिहिलेलं वाईट आहे असं अनेकदा आपल्याला वाटतं किंवा कधीकधी स्वतःचं लिखाण स्वतःला...

अनपेक्षित अडचण

A Click By: Varun Bhagwat आदित्य सरळ रस्त्याने आपल्या वाटेने चालत होता. बराच वेळ तो चालत होता , अथक! थांबून कसं चालेल ? ठरवलेलं लक्ष्यतर गाठायचं होतं. पण त्याचे पाय अचानक चालता चालता थांबले. त्याला जाणवलं की तो एकटा नाहीये. कोणीतरी जवळ आलं आणि त्याला म्हणालं , " काय झालं ?" आदित्य म्हणाला , " कुठे काय ?" " मग चालता चालता थांबलास का ?" त्याचा प्रश्न आला. " अचानक अनपेक्षित असं काहीतरी समोर आलं." आदित्य उत्तरला. " अनपेक्षित ?" " हो." " म्हणजे नेमकं काय ?" " बघ ना , समोर तुलाही दिसतोय ना , केवढा मोठा डोंगर उभा आहे." " हा डोंगर तुला अनपेक्षित होता ?" ' अर्थात." " असं का बरं ?" " इतका वेळ सरळ रस्ता होता , मी ही चालत होतो." " सरळ रस्ता किती वेळ असणार ? हा डोंगर कधी ना कधी समोर उभा ठाकणारच होता , तो आज उभा ठाकला." " पण अपेक्षा नव्हती असं काही असण्याची." " एखादा सिनेमा तू बघतोस आणि त्याचा शेवट जर कोणालाही लगेच कळेल असा झाला तर तू काय म्ह...

Problem झालाय...

A Click by: Varun Bhagwat " नवा दिवस , नवी सुरुवात. नव्या दिवसाची नवी आस. जे चांगलं घडून गेलं ते मनात साठवायचं. वाईट तेवढं मनाच्या दारातून बाहेर सोडून द्यायचं. एक होतं गाव , त्या गावात होता एक अजब मनुष्य! दिसायचा अजब पण होता मोठा हुशार. माणसं त्याच्याकडे सल्ला घ्यायला यायची. भोंदू बाबा नव्हता बरं तो. आजकाल तुमचे ते psychologists वगैरे असतात ना तसा काहीसा होता तो." वडील आपल्या नुकत्याच नोकरीला लागलेल्या मुलीशी बोलत होते.   " पण याचा माझ्या problem शी काय संबंध आहे ??" मुलगी मधेच तोडत म्हणाली. " ऐक तर खरं!" बाबा गोष्ट सांगत होते , " हां , तर या माणसाकडे असेच एक दिवस काही जण सल्ला मागायला आले. याच्या सल्ला देण्याच्या पद्धती फार भन्नाट होत्या. त्याने काय केलं माहितीये ?" " काय ?" " त्याने आधी त्यांचं म्हणणं ऐकलं. घडायची ती चर्चा थोडी घडली. मग मन रिझवायला त्याने त्या माणसांना एक विनोद ऐकवला. ती माणसं पोट धरून हसली. त्यांचं हसणं विरु लागल्यावर त्याने पुन्हा विनोद सांगितला. " मग पुन्हा माणसं हसली ?" " हो , पण थोडी...

वेळेचा खेळ

A Click by: Varun Bhagwat Office च्या cafe मध्ये नुसतीच स्वत:च्या नादात समोर असलेली coffee ढवळत बसणाऱ्या सरिताला तिची senior प्रणाली म्हणाली, “काय गं, तोंड का पाडलंयस? सरिता एकदम भानावर येत म्हणाली, “अं, काय?” “झालं तरी काय?” प्रणालीने विचारलं. “आता ते आपल्यापेक्षा वरिष्ठ आहेत. त्यांना कोण काय बोलणार? ” “ कोणाला काय बोलणार?” “आरती madam कडे जरा काम होतं.” “मग?” “त्या माझ्यापेक्षा खूप senior आहेत.” “असतील.” “असतील नाही आहेत.” “मुद्दा काय?” “त्या मला काही बोलल्या तर मी उलट उत्तर द्यायचं का?” “मुळीच नाही.” “घ्या. मग कसं जगायचं आमच्या सारख्यांनी?” “हां... पण तुझी चूक नसेल तर बोलायचं.” “उलट?” “नाही. पण आपल्याला काय म्हणायचं आहे ते पोचलं पाहिजे. या ना त्या प्रकारे...” “मी तीन वेळा बोलायचा प्रयत्न केला पण she was not in a position to listen.” “हं. मग जरा योग्य वेळेची वाट बघायची.” “आणि ही योग्य वेळ काय असते आणि कधी येते?” “त्यासाठी आपण alert राहायचं.” “अशी कोड्यात बोलू नकोस यार.” “मग कसं सांगू?” “ते माहित नाही. पण समजेल असं सांग.” cafe मध्ये शे...

संकटाची चाहूल

A Click by: Sushil Ladkat “संकट कसं येतं?” “कसं येत म्हणजे?” “सांग ना.” “सांगता येत नाही.” “काय सांगता येत नाही?” “संकट कसं येईल हे सांगता येत नाही.” “मी जगावर येणारं संकट किंवा unprecedented संकट असल्या संकटांबद्दल बोलत नाहीये.” “मग?” “संकट येऊ शकतं असं वाटत असेल तर किंवा काही काळंबेरं आहे असं वाटत असेल तर काय करू शकतो आपण?” “असं होय. Then reframe your question. थोडक्यात तुला जाणून घ्यायचं आहे की संकटाची चाहूल घेणं म्हणजे काय असतं?” “हं... kind of yes.” “हे बघ असं काहीच वेगळं करू नाही शकत आपण. Alert राहावं लागतं कायम बाकी काही नाही.” “Alert राहायचं म्हणजे काय?” “म्हणजे आजूबाजूला नजर असली पाहिजे. प्रत्येक वेळी आपलाच अनुभव कामी येतो असं नाही. दुसऱ्याच्या अनुभवाने सुद्धा मनुष्य शहाणा होऊच शकतो. किंवा त्याचं निरीक्षण त्याला संकटापासून वाचवू तरी शकतं किंवा सावध तरी करू शकतं. पण हा प्रश्न अचानक का पडला रे तुला?” “अरे दादा काय सांगू, सहज जेव्हा observe करतो तेव्हा जाणवतं आणि मला ना काही माणसांची गंमत वाटते. तोंडावर गोड असतात आणि आत वेगळंच. अशा वेळी काय करायचं, त...

अडचण आणि gaps

  A Click by: Varun Bhagwat शाळेमध्ये आज सर मुलांशी अनौपचारिक गप्पा मारत होते. सर म्हणाले, “कल्पना करा, तुम्ही रस्त्यातून चालत जाताय... रस्त्यामध्ये मोठ्ठा दगड ठेऊन दिला आहे. तुमचं लक्ष कुठे जाईल?” एक मुलगा खोडीलपणे म्हणाला, “दगड ठेवणाऱ्या माणसाला शोध घेण्याकडे लक्ष जाईल.” सर हसले आणि बोलले, “छान. पण गंमत सोडा. काय दिसेल सांगा पाहू?” मुलं म्हणाली, “दगड.”   “आज अमितच्या शर्टवर डाग पडला होता. मुलांनो त्याच्याकडे पाहताच तुमचं लक्ष कुठे गेलं?” “सर, डागाकडे.”   “उदाहरणं, प्रसंग अनेक आहेत. सगळी गंमत इकडेच आहे. म्हटलं तर दगडापेक्षा रस्ता मोठा आहे. रस्ता दिसायला हवा. पण दिसतो दगड. इतका सुंदर शर्ट अंगावरती आहे, डागापेक्षा शर्ट मोठा आहे. पण लक्ष डागाकडे जातं.” “सर असा दगड दिसला की काढला पाहिजे ना..” “बरोबर... दगड म्हणजे अडचण. आपण ती दूर करावी. स्वत:ला आणि लोकांनाही फायदा होतो.” तेवढ्यात दुसरा मुलगा म्हणाला, “पण सर कधीकधी तो दगड उचलणं अशक्य असतं... अर्थात खूप मोठी अडचण असते जी स्वत: तिथून हलायला तयार नसते. आपण तिथे काहीच करू शकत नसतो. मग करायचं....???” ...