मिट्ट काळोख. समोर पूर्ण अंधार. चालायला तर हवं. पण कसं? सोबत कोण करेल? तेवढ्यात त्या अंधारात कोणीतरी अलगद हात पकडतं. कानावर हलकेच आवाज येतो, "चालत राहा. प्रकाशापर्यंत नेणारी वाट हीच आहे बाळा!" मी विचार करू लागतो की हा कोण आहे? त्याच्या शब्दांमधील भाव विश्वासार्ह असतो. मला वाटून जातं की कोणी संत माणूसच असणार! मी त्या साधूच्या / संताच्या शब्दांवर विश्र्वास ठेवतो. चालू लागतो. थोडा वेळ काहीच नाही. अंधार संपायचं नावं नाही. मी हरणार असं जाणवताच, "अजून थोडंच चाल. तू इप्सित स्थळी पोहोचशील." असा मृदू आवाज कानी येतो. त्या आवाजावर आणि विश्वासावर मी चालू लागतो. मला कळलेलं नसतं की मी जे करतोय ते काय आणि का करतोय. त्या आवाजावर, त्या बोलण्यावर विश्वास का ठेवतोय? त्या शब्दांत, त्या बोलण्यात, त्या आवाजात अशी काय जादू आहे जी मला पुढे चालायला भाग पाडतीये? एक गोष्ट निश्चित की आधीच आपण अंधारात आहोत. या संत माणसाचं ऐकलं नाही नि तिथेच थांबलो तर अंधारातच राहू हे निश्चित! ऐकलं तर मात्र प्रकाशापर्यंत पोहोचण्याची शक्यता तरी आहे. नाहीच दिसला प्रकाश तर काय होईल? फार काही होणार नाही. अंधार...
जे माझ्या मनात आहे तेच अनेकदा आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतं. तेच शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न. कधी कोणती कथा, तर कधी कोणता किस्सा... कधी मनातली कविता तर कधी मनातली संहिता...