Skip to main content

Posts

Showing posts from August, 2020

जुनून...

  A click by: Varun Bhagwat  "काहीतरी वेगळं करायचं म्हणजे वेडं होता आलं पाहिजे." "वेडं व्हायचं म्हणजे?" "म्हणजे वेडं व्हायचं." "नीट सांग." "वेडी माणसं मोठी होतात." "पण म्हणजे नक्की काय व्हायचं?" "तुला कोणी किंवा कशानी झपाटलंय का?" "नाही. अजून तरी भुताखेतांशी संपर्क आलेला नाही." "मी गंमत करत नाहीये." "मी पण खरंच सांगतो आहे." "एखाद्या गोष्टीमुळे चांगल्या अर्थाने आपण झपाटले गेलो पाहिजे. इंग्रजीमध्ये त्याला  Passion असा शब्द आहे. उर्दू भाषेत त्याला 'जुनून' असा वजनदार शब्द आहे." "पण हे मध्येच वेडं व्हावं असं का वाटलं तुला?" "माझीच जुनी एक वही चाळत होतो ज्यात मी 'लगान- एका स्वप्नाचा प्रवास' नावाच्या पुस्तकाच्या नोट्स काढल्या आहेत. लगान सिनेमाचा दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, त्याच्यामध्ये हा जुनून होता. वेडं होण्याची क्षमता होती (चांगल्या अर्थाने). त्यामुळेच oscar सारख्या पुरस्काराने हा सिनेमा नामांकित केला गेला. त्याच्या या वेडामुळे एक अजरामर स...

तू पुढे चालत राहा...

  A Click by: Sushil Ladkat त्याला काही सांगायचं आहे, बोलायला कोणी नाही. कोणापाशी तरी व्यक्त व्हायचंय, व्यक्त व्हायला त्याचं असं कोणी नाही.   नदीचा प्रवाह विचारांना गतीमान करतोय. मन प्रवाहाशी बोलू पाहतं आहे नि तरीसुध्दा प्रवाहाच्या विरुध्द पोहण्याचा प्रयत्न करतंय. मनाला ताकद हवी आहे नवी उभारी घेण्याची. नदीकडून मिळेल अशी अपेक्षा आहे. का? कारण नदी वाहत राहते. आपणसुद्धा पुढे जात राहिलं पाहिजे. नदी शिकवते आहे, थांबला तो संपला. नदी वाट दाखवते. नदी गती देते.  हो पुढे तर जायचं आहे. मनातली भीती नदीवर सोडून दिली पाहिजे. नदीने वाट दाखवली पाहिजे. नदी वाट दाखवेलच कारण अडीअडचणी मधून वाट कशी काढायची हेच नदी शिकवते आहे.  तो शिकतोय, उठून पुढे निघायचं म्हणतोय. त्याला जमेल. तो हे करेल. कारण तोच करू शकतो. बाकी कोणी सांगून हे होणार नाही. हे त्यालाच करायचं आहे. आयुष्य थांबत नाही. गड्याला पुढे निघायचं आहे.  -वरुण भागवत

लंबोदर

A click by - Varun Bhagwat आई वडिलांनी काय विचार करून नाव ठेवलेलं असतं कोणास ठाऊक? पण ते नाव सार्थकी लागावं असं त्यांना वाटत असतं. गणेश चतुर्थीला लंबोदरचा जन्म झाला त्यामुळे हे नाव ठेवलं आणि पटठ्याने त्याच्या गणेशभक्ती मुळे नि लंब उदरामुळे (पोटामुळे) ते नाव सार्थही केलं. लंबोदर च्या घरी गणपती छोटीशीच भेट द्यायचा. मोजून दीड दिवस मुक्काम! लोकांचे गणपती settle होइपर्यंत यांच्या जाण्याची वेळ यायची. दीड दिवसात खूप लगबग असायची. लंबोदर च्या आईच्या उत्साहाला तर काय उधाण यायचं! प्रसाद म्हणजे विचारायला नको. हाताला इतकी मस्त चव की लहानपणी लंबोदर ला वाटायचं गणपती दीड दिवसाची प्रथा मोडून खास आईच्या मोदकासाठी मुक्काम वाढवेल की काय! कारण मोदक म्हणजे लंबोदर चा जीव की प्राण. पण वर्षातून एकदाच मोदक व्हायचे आणि या गणपती सोबत लंबोदर ला मोदकांना सुद्धा पुढच्या वर्षी लवकर या म्हणावं लागायचं. या दीड दिवसात लंबोदर आपल्या आईला मनापासून मदत करायचा. सगळ्या छोट्या छोट्या कामात याचा हातभार लागायचा आणि याचा खारीचा वाटा सिंहाच्या पिल्लाइतका नक्की मोठा व्हायचा. याला "बहीण" नाही त्यामुळे पाहुण्या रावळ्यांना ...

निर्णय स्वातंत्र्य

A click by: Sushil Ladkat - नाही नाही, मला नाही पटत आहे हे असं. - अहो, काय पटत नाहीये तुम्हाला? - हे जे तुम्ही सगळ्या दुनियेला involve करत आहात ते! - आता त्यांना जर आपण याच्या लग्नाबद्दल काही नाही सांगितलं तर वाईट वाटेल ना त्यांना... - वाटू दे. - हे काय बोलणं झालं? - मग मी काय बोलणं अपेक्षित आहे? - त्यांचं मत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. - लग्न त्यांचं आहे का आपल्या पोराचं? - अहो पण.... - मग काय? लग्न त्याचं. त्याने मुलगी पसंत केली, तिला तो पसंत आहे. आपल्यालाही ती पसंत आहे. त्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करणारा हा हेमंत याचा लागतो तरी कोण? - हे बघा, तुमचे मोठे भाऊ आहेत ते. घराच्या प्रत्येक निर्णयात त्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. - आपण निर्णय घ्यायला सक्षम नाही म्हणून..?? - कदाचित. - पण अजय आहे. - .. तो लहान आहे. - तूच म्हणतेस ना लग्नाचं वय झालंय त्याचं... - हो.. - तर मग तो लहान नाही आणि मुळात हा जो निर्णय आहे तो त्याच्या आयुष्याचा आहे. इथे तो स्वतंत्र असला पाहिजे. आपणही मध्यस्थी करू नये. - हे काय आता नवीन? - तूच वाढदिवसाची भेट म्हणून दिलेलं व.पु. काळेंचं पुस्तक, त्यात लि...

हिशोब आणि गवतीचहा

A click by: Varun Bhagwat ऑफिस मधून घरी पोहोचलो. फ्रेश झालो. चहा घेतला. तेवढ्यात बेल वाजली. दार उघडलं. समोर माने काका उभे. माने म्हणजे आमचे केबल वाले काका. नेहमीप्रमाणे टिव्हीचा रिचार्ज मारायला आले होते. बरं, आले ते वैतागतच! त्यांना बसा म्हटलं. “बसतो कसला? या ३००० रुपयाचं काय करू?" "मी समजलो नाही." असं म्हणत मी त्यांना पाणी दिलं. "अहो, सकाळी निघताना खिशात ११० रुपये होते मोजून!! आता ३००० कसे होतील??" " तुम्ही केबल ची बिलं गोळा करत आलात त्याचे पैसे असतील." "सगळे त्याचेच पैसे आहेत. पण हिशोबाने हे ३००० एक्स्ट्रा आहेत." "ऑनलाईन नोंद होते ना बिलाची. ते चेक केलं का?" "विचारलं अहो मी हेड ऑफिसात." "मग?" "३००० जास्त च आहेत." "अहो, जास्त आहेत, कमी नाहीत ना.. तेवढं तरी बरं आहे ना?" "अहो असं कसं? ज्याचे असतील त्याला गरजेचे असतील हो हे पैसे!" "मान्य आहे मला. पण तुम्ही काय कोणाचे पैसे असे उचलणारे आहात का?" "नाही हो." "मग असू द्या ना. रात्री बिछान्यावर पडलात क...

मैत्री-ण

A click by: Varun Bhagwat ती आणि विराज बोलत होते. तिचं कवी-मन म्हणत होतं , " दोस्त , सखा , मित्र , यार... रक्ताच्या नात्याहूनही जवळचा वाटतो ना फार!!" विराज विचारात पडला आणि म्हणाला , " हो ना... मैत्रीचा जन्म कधी होतो हे लक्षात येतंच असं नाही." "Yes, पण जन्माला आलेली मैत्री मरेपर्यंत साथ निभावते." ती पटकन म्हणाली. " आपल्याकडे जुनं हिंदी गाणं सुद्धा हेच सांगतं- "ये दोस्ती , हम नहीं तोडेंगे। तोडेंगे दम , मगर तेरा साथ ना छोडेंगे।" " सखा हे नाव किती छान वाटतं ना रे ?" " मित्राशी आपलं सख्य असतं म्हणून तर आपण त्याला सखा म्हणतो आणि कायम साथ निभावतो म्हणून तो आपला साथी असतो..." " नुसता मित्र मिळणं सोपं आहे ; पण खरा मित्र मिळणं अवघड!" ती विचारपूर्वक बोलत होती. " पण एकदा का खरा मित्र मिळाला की आयुष्य नक्कीच सोपं होऊन जातं." विराज म्हणून गेला. " आयुष्य नाही सोपं होत , आयुष्य अवघडच असतं ; पण ते सोप्या पद्धतीने सोडवण्यासाठी ताकद देतो तो मित्र!" " हो हे मात्र खरंय! मैत्री कोणामध्ये होऊ...