तो आणि ती समुद्रकिनारी गेले. समोर पाहिलं. दूरवर दिसणारा सागर. त्याला अथांग का म्हणतात त्याचं उत्तर लगेच त्यांना मिळालं. ज्याचा थांग लागू शकत नाही तो अथांग. खरंच ह्या सागराला अंत आहे का? अंत असेल तर कुठे जाऊन हा संपतो? असे प्रश्न त्याला पडले. ती म्हणाली, "क्षितिज बघ. आपले अवघड प्रश्न सोपे करतं." "म्हणजे?" त्याने प्रश्न केला. ती उत्तरली, "हा समुद्र कुठे संपेल वगैरे तुझा प्रश्न. त्याचप्रमाणे आयुष्यात पुढे काय होईल असेही तुझे प्रश्न." तो बुचकळ्यात पडत म्हणाला, "हो." ती गोड हसत म्हणाली, "क्षितीज हे त्याचं उत्तर." तो पुन्हा प्रश्नार्थक नजरेने म्हणाला, "पण क्षितीज म्हणजे तरी काय?" "जिथे आकाश आणि हे दूरवर असलेलं पाणी एकमेकांना मिळतात." तिने समर्पक उत्तर दिलं. "पण खरंच असं घडत नाही. ही एक concept आहे. हा एक भास आहे." तो म्हणाला. ती लगेच म्हणाली, "मान्य आहे. पण हे उत्तर आपल्या मनाचं समाधान तरी करतं." "पण मग असं भासवत, फसवत का जगायचं?" तो निरागसपणे म्हणाला. ती शांतपणे उत्तर देत होती, "आपण पण अ...
जे माझ्या मनात आहे तेच अनेकदा आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतं. तेच शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न. कधी कोणती कथा, तर कधी कोणता किस्सा... कधी मनातली कविता तर कधी मनातली संहिता...