Skip to main content

Posts

Showing posts from November, 2022

शब्द (कोणता नि कसा?)

शब्द बोलला. बोलून गेला. मग जाणवलं, चुकला.  का बोलला? उगाच बोलला.  खरंतर बोलण्यासाठीच असतात शब्द. पण शब्द चुकले तर मनं दुखावण्याचं काम करतात. माणूस कोणाला तरी वाट्टेल ते बोलून जातो. नंतर पश्चात्ताप करायची वेळ येते.  शब्द शस्त्र आहे. त्यांना धार असते.  कधी कधी ठरवून वार होतो, कधी चुकून वार होतो. कधी कठोर शब्द वापरावे लागतात. कधी नकळत वापरले जातात.  याच्याच जोडीला चांगले शब्दही आहेत, जे मनांना जोडतात. अगदी सहज एकत्र आणतात. शब्दांची गुंफण करून प्रेम दर्शवता येतं. हेच शब्द एकत्र करून राग व्यक्त होतो.  शब्द नकळत घाव घालतात. हेच शब्द घाव भरून काढतात.  शब्द ओले, शब्द कोरडे. शब्द शहाणे, शब्द वेडे. शब्द जोडले तर वाक्य. वाक्य जोडत अर्थपूर्ण संवाद. संवाद एकतर बरा किंवा वाईट. संवाद माणसाला जोडतो, अथवा तोडतो. शब्दाची ताकद मोठी असते. ती ताकद एखादी गोष्ट घडवत किंवा बिघडवत असते.  शब्दांना बांध घालून अडवायचं काम खरंतर शब्दच करू शकतात. अमितच्या बाबतीत असंच घडलं जेव्हा तो अशांत आणि अस्वस्थ झाला होता. त्याच्या तोंडून चुकून त्याच्याच मित्राविषयी चुकीचे शब्द निघाले. अमि...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...

तू चल... मी आहेच!

  मिट्ट काळोख. समोर पूर्ण अंधार. चालायला तर हवं. पण कसं? सोबत कोण करेल? तेवढ्यात त्या अंधारात कोणीतरी अलगद हात पकडतं. कानावर हलकेच आवाज येतो, "चालत राहा. प्रकाशापर्यंत नेणारी वाट हीच आहे बाळा!" मी विचार करू लागतो की हा कोण आहे? त्याच्या शब्दांमधील भाव विश्वासार्ह असतो. मला वाटून जातं की कोणी संत माणूसच असणार! मी त्या साधूच्या / संताच्या शब्दांवर विश्र्वास ठेवतो. चालू लागतो. थोडा वेळ काहीच नाही. अंधार संपायचं नावं नाही. मी  हरणार असं जाणवताच, "अजून थोडंच चाल. तू इप्सित स्थळी पोहोचशील." असा मृदू आवाज कानी येतो. त्या आवाजावर आणि विश्वासावर मी चालू लागतो. मला कळलेलं नसतं की मी जे करतोय ते काय आणि का करतोय. त्या आवाजावर, त्या बोलण्यावर विश्वास का ठेवतोय? त्या शब्दांत, त्या बोलण्यात, त्या आवाजात अशी काय जादू आहे जी मला पुढे चालायला भाग पाडतीये? एक गोष्ट निश्चित की आधीच आपण अंधारात आहोत. या संत माणसाचं ऐकलं नाही नि तिथेच थांबलो तर अंधारातच राहू हे निश्चित! ऐकलं तर मात्र प्रकाशापर्यंत पोहोचण्याची शक्यता तरी आहे. नाहीच दिसला प्रकाश तर काय होईल? फार काही होणार नाही. अंधार...