Skip to main content

Posts

Showing posts with the label karma

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...

जे नकोय ते बाजूला कर!

A click by: Varun Bhagwat "सुचत नाहीये." "काय?" "काहीच नाही." "असं का?" "माहीत नाही." "मला माहितीये." "मनकवडा आहेस का?" "हाहा..." "हसू नको. उत्तर दे." "सुचत नाहीये म्हणजे छान किंवा नवं काही सुचत नाहीये. बरोबर?" "हो." "कारण तुझं मन बाकी विचारांनी preoccupy झालंय." "As in?" "आधीच ज्या गोष्टी पटल्या नाहीत, पण बदलणं तुझ्या हातात नाही त्या विचारांनी अस्वस्थ झालायस. किंवा इतरही demotivating thoughts मनात घोळतायत." "हं. पण मग करू तरी काय?" "सोड." "असं कसं सोड?" "तू ज्याचा विचार करत आहेस ते केवळ विचार करून बदलेल?" "नाही." "तू नुसताच गप्प बसून राहिला आहेस का?" "नाही. मी try केला काही प्रमाणात जे पटत नाही ते बदलण्याचा. थोडा demotivate झालो तर स्वतःला push करण्याचा." "आणि?" "थोडं बदललं." "Good." "Good काय? बाकीचं..." "सगळ...

ए पोरा...

  A click by: Sushil Ladkat केतन सवयीप्रमाणे व्यायामाला एका club मध्ये जायचा. Routine ठरलं होतं. जिथे तो व्यायामाला जायचा तो एक sports club च होता. त्यामुळे club च्या member व्यतिरिक्त इतर कोणाला प्रवेश नसे. आज अचानकच केतनला आतमध्ये असणाऱ्या security guard ने अडवलं. केतन member होता, पण तरी त्याला अडवलं होतं. केतनला या गोष्टीची चीड आली. नुसतं अडवण्याची नव्हे तर अडवण्याच्या पद्धतीची. Guard ने चुटकी आणि टाळी वाजवत हाताचा इशारा केला आणि म्हणाला, "कुठं चालला रे?" केतन तरीही चालत राहिला. Guard चिडला. तो वयस्कर होता तरीही केतन दुर्लक्ष करतोय हे पाहून अजून मोठ्या आवाजात मोठ्या कष्टाने थोडं जवळ येऊन म्हणाला, "विचारलेलं कळत नाही का?" केतन थांबला. झटकन म्हणून गेला, "का थांबू? इथे रोज येतो मी." "पण मी इथं नवीन आहे." "मी जुना आहे." "तुझ्या गळ्यात club चं card नाही." केतन अरेरावी करत म्हणाला, "तुम्ही आज आलाय." यावर guard चा आवाज अजून चढला आणि म्हणाला, "ए पोरा, मी काम करतोय. तू नाही मला शिकवायचं." "Card माझ्य...

करीत राहायचं!

  A Click by: Varun Bhagwat राघवच्या मनात संमिश्र भावना होत्या. नुकतीच त्याची एका tv show मधील मध्यवर्ती भूमिकेत entry झाली होती. अनेक जण शुभेच्छांचा वर्षाव करत होते. Show सुरू झाला याचं छोटं celebration सुद्धा show च्या set वर झालं होतं. सगळे जण enjoy करत होते. राघव मात्र विचारात गढला होता. तो त्या गर्दीतून थोडा बाजूला येऊन set वरच्या एका पारावर येऊन बसला. राघव तिकडे आहे हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. Rather, राघवला ते कोणाच्या लक्षात येऊच द्यायचं नव्हतं इतक्या शांतपणे तो बाजूला झाला होता. पण ज्यांच्या लक्षात यायला हवं त्यांना कळलंच. राघवला नाटक शिकवणारे राघवचे सर पण set वर उपस्थित होते. या गर्दीतून त्यांचा राघव ते शोधत होते. तो दिसला नाही. त्याला आधीपासून ओळखत असल्याने त्यांनी जाणलं आणि त्याला शोधत ते बरोबर त्याच्या शेजारी येऊन बसले. राघवच्या मनात काय चालू असेल याचा सरांना अंदाज आला. पण सर काहीच बोलले नाहीत. काही वेळ दोघे नुसतेच बसून होते. सरांनी पाठीवर हात ठेवला, म्हणाले, "काय, कसं वाटतंय?" राघव इलुसं हसला. सरांनी विचारलं, "कसला विचार चालू आहे?" राघव त्याच्य...

कृष्ण आणि कर्माचं महत्त्व!

  A click by Varun Bhagwat रात्री बाराची वेळ, एरवी किर्रर्र शांतता असणारा क्षण, मात्र हा दिवस वेगळंच काहीतरी मनात घेऊन आला होता. बाहेर धुवाधार पाऊस, आत कारागृहात बंदिवान होते देवकी आणि वसुदेव. या कारागृहातच इलुशा देवकीनंदनचा जन्म झाला नि अवघं जग कृष्णमय झालं.  कृष्ण आणि त्याचं कार्य दुनियेला ठाऊक आहे. त्याच्या चातुर्याचे, शांत प्रवृत्तीचे, कर्माचे दाखले जगभर दिले जातात. या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी ज्याला कृष्णाने मात्र महत्त्व दिलं नाही ती म्हणजे त्याचं जन्मस्थळ. गंमत अशी की खरंतर कारागृहात याचा जन्म झाला, पण म्हणून ती जागा हे त्याचं भवितव्य ठरलं नाही. कृष्णाने त्याचं भवितव्य स्वतः घडवलं. नशिबाला दोष देत त्याने आयुष्याच्या गाडीला अडसर आणला नाही.  परिस्थिती प्रत्येकाची निराळी असते. काही व्यक्ती सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येतात पण म्हणून ते सर्वस्व प्राप्त करतीलच असं नाही. काही जण शून्यातून विश्व उभं करण्याची चुणूक आणि धमक दाखवतात. काही जण सर्व असूनही उतमात न करता आपलं काम करत राहतात. काही जण असलेल्या गोष्टी स्वतःच्याच कर्माने घालवतात.  या सगळ्यात एक समान दु...

कॉर्पोरेट शिराळशेट

  A click by Varun Bhagwat ऑफिस च्या कॅफेटेरिया मध्ये गरमा गरम कॉफी चे mugs घेऊन दोन team members कोपऱ्यातील टेबल पकडून बसले . कॉफी थोडी थंड होईपर्यंत दोघांमध्ये संवाद सुरू झाला .     " काय मग शिराळशेट ?" विकास म्हणाला . " काय ? कोणाला बोलवतोयस ?" " तुलाच !" " माझं नाव शिरीष आहे , शिराळशेट नाही ." " हो , पण आज तू शिराळशेट ! औट घटकेचा राजा , congratulations!" " ऐक ना , कोण शिराळशेट ? कसली औट घटका ? आणि माझा त्याच्याशी काय संबंध ?" " तुला नाही माहीत ?" " नाही रे बाबा ."     विकास कॉफीचा घोट घेत बोलू लागला , " अरे पूर्वी एक राजा होऊन गेला ." " शिराळशेट नावाचा ?" " नाही ." " मग ?" " जो राजा होऊन गेला त्या राजाच्या नावाला महत्त्व नाही . त्याने घेतलेल्या एका निर्णयामुळे घडलेल्या बदलला महत्त्व आहे ." " कोणता निर्णय ?" " ऐक तर ! त्या राजाच्य...