Skip to main content

Posts

Showing posts from March, 2022

आठवणी- हवेहवेसे त्रास

  A click by: Varun Bhagwat "आठवणी." "त्यांचं काय?" "या आठवणी आठवण्याची आणि साठवण्याची सवय लावून घेऊ नये." "का लावून घेऊ नये?" "त्रास देतात या आठवणी." "अगं, याच आठवणी जगवतात. याच आठवणी जगण्यात मजा आणतात. याच आठवणी नव्या आठवणी तयार करण्याची प्रेरणा असतात. आठवणीच तर असतात ज्या हलकेच सारं आठवून हसवतात." "हो रे. खास व्यक्तींच्या बाबतीत तर हे घडतंच. काही व्यक्ती येतात आपल्या आयुष्यात. आपलं आयुष्य सुंदर आहे हे दाखवून देतात. त्या माणसांची सोबत हवीहवीशी वाटते. मग एक दिवस ती माणसं आपल्याला सोडून जातात. भांडून नाही. त्यांचा आपल्यासवे असणारा कार्यभाग संपतो इतकंच. ते पुढच्या प्रवासाला निघतात. त्यांचं काय करायचं? त्यांनाही जायचं नसतं. आपल्यालाही त्यांना सोडायचं नसतं. पण परिस्थितीच यांना एकमेकांपासून दूर लोटते." "हो, पण परिस्थितीनेच तर त्यांना एकत्र आणलेलं असतं. वेगळं करणारी पण ती परिस्थितीच. जरी वेगळं केलं तरी त्या भेटीच्या काळात आपलं आयुष्य काही प्रमाणात समृद्ध होतं. या व्यक्ती शरीराने नेहमी सोबत नसल्या तरी आठवणींच्या रूपा...