A click by : Varun Bhagwat सूर्यनारायण सारं विश्व प्रकाशमान करत असताना मी काय करत असतो? त्या भास्कराकडून प्रकाश घेणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. अर्थात ती सुद्धा जमावी लागते. अनेक चांगल्या गोष्टी आपल्या आसपास घडत असतात, दिसत असतात. आपल्याला काहीतरी देत असतात, म्हणजेच देण्याचा यत्न करत असतात. घेणं सर्वथा आपल्यावर आहे. मग विचार आला की खरंच मी त्या गोष्टी घेतो का? किमान त्या घेण्याची तयारी दर्शवतो का? त्याच्याही आधी त्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं तरी का? सकाळ झाली. रोजच होते म्हणा. परंतु ज्या सकाळी मी माझ्या आळसाला लाथाडून जागृतावस्थेत येतो, तेव्हा जाणवतं की सकाळही सुंदरही असू शकते. ती सुंदर सकाळ अनुभवल्यावर मग मला कळतं की आपल्या झोपेहून अधिक सुखावह काहीतरी असतं. काय? तर हा सुंदर प्रकाश. (तसा हा प्रकाश डोक्यात पडायला वेळ लागतो, पण तो पडतो हे महत्त्वाचं.) विश्व प्रकाशाने उजळत जातं. तो प्रकाश आपल्याला नवा उत्साह देतो. उगवणाऱ्या आदित्याला मी वंदन करत दिवसाची सुरूवात करतो. हा उत्साह मला स्वस्थ बसू देत नाही. मी नव्या दिवसाचा वेग पकडत व्यायामाचं निमित्त करत धावत सुटतो. धा...
जे माझ्या मनात आहे तेच अनेकदा आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतं. तेच शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न. कधी कोणती कथा, तर कधी कोणता किस्सा... कधी मनातली कविता तर कधी मनातली संहिता...