कामाचं ठिकाण. कामात थोडया वेळाचा ब्रेक होता. मी खुर्चीवर बसलो होतो. ३ जण शेजारी होते. अचानक एकाच वेळी निरनिराळ्या कारणांनी ते तिघे उठून तीन दिशांना गेले. मी तिथे एकटाच. एकदम एकटा पडलो असं वाटलं. एकटा पडलो होतो, एकटं वाटत होतं की एकटं वाटत होतं म्हणून एकटा पडलो होतो? काही कळत नव्हतं. आजूबाजूला पाहिलं. प्रत्येक जण काहीतरी करण्यात व्यस्त. माझ्याशी बोलायला कोणीच नव्हतं. की मीच कोणाशी बोलत नव्हतो? की मी कोणाशी बोलत नव्हतो म्हणून माझ्याशी कोणी बोलत नव्हतं? की कोणी माझ्याशी बोलत नव्हतं म्हणून मी कोणाशी बोलत नव्हतो? मग नीट पाहिलं. प्रत्येक जण तिथे एकटा होता. म्हणजे माणसं खूप होती पण सगळे एकत्र नव्हते. प्रत्येक जण आपापल्या विश्वात होता. स्वतःतच व्यस्त होता. काही जण तिथे खरोखरीच स्वतःच्या कामात व्यस्त होते. मात्र अनेक जण नुसतेच एकटे होते, जे खरंतर संवाद साधू शकत होते. अगदी सहज एकमेकांशी बोलू शकत होते. पण तसं घडत नव्हतं. ते पण माझ्यासारखंच स्वतःला एकटं समजत होते? . गंमत आहे सगळीच. मी बोलायला पुढाकार घेत नाही किंवा समोरचा घेत नाही यावरून कितीतरी संवाद होता होता राहून गेले असतील? कितीतरी ...
जे माझ्या मनात आहे तेच अनेकदा आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतं. तेच शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न. कधी कोणती कथा, तर कधी कोणता किस्सा... कधी मनातली कविता तर कधी मनातली संहिता...