![]() |
| A Click by: Sushil Ladkat |
त्याला काही सांगायचं आहे,
बोलायला कोणी नाही.
कोणापाशी तरी व्यक्त व्हायचंय,
व्यक्त व्हायला त्याचं असं कोणी नाही.
नदीचा प्रवाह विचारांना गतीमान करतोय.
मन प्रवाहाशी बोलू पाहतं आहे नि तरीसुध्दा प्रवाहाच्या विरुध्द पोहण्याचा प्रयत्न करतंय.
मनाला ताकद हवी आहे नवी उभारी घेण्याची.
नदीकडून मिळेल अशी अपेक्षा आहे.
का? कारण नदी वाहत राहते. आपणसुद्धा पुढे जात राहिलं पाहिजे.
नदी शिकवते आहे, थांबला तो संपला.
नदी वाट दाखवते.
नदी गती देते.
हो पुढे तर जायचं आहे.
मनातली भीती नदीवर सोडून दिली पाहिजे.
नदीने वाट दाखवली पाहिजे.
नदी वाट दाखवेलच कारण अडीअडचणी मधून वाट कशी काढायची हेच नदी शिकवते आहे.
तो शिकतोय,
उठून पुढे निघायचं म्हणतोय.
त्याला जमेल.
तो हे करेल.
कारण तोच करू शकतो.
बाकी कोणी सांगून हे होणार नाही.
हे त्यालाच करायचं आहे.
आयुष्य थांबत नाही.
गड्याला पुढे निघायचं आहे.
-वरुण भागवत

👏👏
ReplyDeleteWaa! Khup Chan...
ReplyDelete🙋👌👌👍