ती आणि विराज बोलत होते.
तिचं कवी-मन म्हणत होतं, "दोस्त, सखा, मित्र, यार...
रक्ताच्या नात्याहूनही जवळचा वाटतो ना फार!!"
विराज विचारात पडला आणि म्हणाला,
"हो ना... मैत्रीचा
जन्म कधी होतो हे लक्षात येतंच असं नाही."
"Yes, पण जन्माला आलेली मैत्री मरेपर्यंत साथ
निभावते." ती पटकन म्हणाली.
"आपल्याकडे जुनं हिंदी गाणं सुद्धा हेच
सांगतं- "ये दोस्ती, हम
नहीं तोडेंगे। तोडेंगे दम, मगर
तेरा साथ ना छोडेंगे।"
"सखा हे नाव किती छान वाटतं ना रे?"
"मित्राशी आपलं सख्य असतं म्हणून तर आपण
त्याला सखा म्हणतो आणि कायम साथ निभावतो म्हणून तो आपला साथी असतो..."
"नुसता मित्र मिळणं सोपं आहे; पण खरा मित्र मिळणं अवघड!" ती
विचारपूर्वक बोलत होती.
"पण एकदा का खरा मित्र मिळाला की आयुष्य
नक्कीच सोपं होऊन जातं." विराज म्हणून गेला.
"आयुष्य नाही सोपं होत, आयुष्य अवघडच असतं; पण ते सोप्या पद्धतीने सोडवण्यासाठी ताकद
देतो तो मित्र!"
"हो हे मात्र खरंय! मैत्री कोणामध्ये होऊ
शकते गं?"
"कोणामध्येही होऊ शकते."
"कोणामध्येही म्हणजे?"
"म्हणजे कोणामध्येही!"
"नीट सांग ना."
"२ मुलांमध्ये, २ मुलींमध्ये, १ मुलगा आणि १ मुलगी यांच्यांमध्ये..!"
"फक्त यांच्यातच?"
"असं काही नाही. ही basic combinations झाली. खरं सांगते, मैत्री कोणासोबतही होऊ शकते." ती
मनापासून बोलत होती.
"यातली कुठली मैत्री टिकते?"
"जी घट्ट असते."
"हं, आयुष्याच्या
कुठल्या टप्प्यात होणारी मैत्री सगळ्यात बेस्ट?"
"टप्पा आयुष्याचा असतो. मैत्रीचा नसतो.
कोणत्याही टप्प्यात होऊ दे मैत्री, पण
अवघड टप्प्यात सुद्धा जी साथ सोडत नाही ती खरीखुरी मैत्री!"
"हे बरोबर आहे. मग मी एखादा नवीन मित्र
किंवा मैत्रीण अजूनही मिळवू शकतो?"
"हो, पण
म्हणून जुने धागे विसरायचे नाहीत."
"माझे जीवलग मित्र कधीच विसरणार नाही मी."
"मग नवा धागा जोडायला हरकत नाही. कोण आहे
हा नवा सखा किंवा ही सखी?"
"तू!"
"काय?"
"हो... असंच असतं. इतकी जवळची व्यक्ती असली
की तीच दुर्लक्षित राहते. मला तुझ्याशी मैत्री करायची आहे."
"आज असं अचानक?"
"अचानक वगैरे नाही. पण अगं आज एकूणच जाणवलं
की प्रत्येक टप्प्यात तू साथ करते. You never judge me. मला तुला सगळं सांगता येतं. तूच म्हटलीस
ना, मैत्री कोणामध्येही होऊ शकते. म्हणून तुला
विचारतोय मी की प्रिय डायरी, मुझसे
दोस्ती करोगी?"
क्षणभर ती डायरी काहीच बोलली नाही. तिची, अर्थात
विराजच्या डायरीची पानं फडफडली. विराजशी मनमोकळं बोलणाऱ्या डायरीला त्याने छातीशी
घट्ट पकडलं. फडफडणारी पानं अलगद मिटली आणि मिठीत सामावली.
- वरुण भागवत
Wowwww
ReplyDeleteKhup chhan.
ReplyDeleteछान.म्हणून रोज डेली डायरी लिहावी.
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteChan! Very nice...
ReplyDeleteSakha...
Yaar...
Mitra...
Dosti....
🙋👌👌
Khupach chhan ani khara! 👏👏
ReplyDeleteKhupach chhan ani khara! 👏👏
ReplyDeleteThank you!!
DeleteKhup chan.
ReplyDelete