Skip to main content

Posts

Showing posts from July, 2023

स्वतंत्र होडी!

ते दोघे तलावाकाठी शांत बसले होते. तिने विचारलं, "भाजी कोणती करू?" तो म्हणाला, "इतक्या रम्य ठिकाणी येऊन भाजीचा प्रश्न?" ती त्याला हलकेच फटका देत म्हणाली, "गप रे. असतात असे प्रश्न." "तुला हवी ती किंवा कंटाळा आला असेल तर जेवायला बाहेर जाऊ." स्वतःच्या मनाने काही सहजपणे करण्याची सवय घालवून बसलेली ती त्याच्याकडे पाहत बसली. कागदाची होडी करण्यासाठी पर्स मधला कागद घेत ती म्हणाली, "होडी कशी करू?" "तुला हवी तशी." तो सहज म्हणाला. "एवढं स्वातंत्र्य?" तिने प्रश्न केला. तो आश्चर्याने म्हणाला, "हो. का? काय झालं? भाजी आणि होडी करण्यात काय विचारायचं?" ती खाली पाहत म्हणाली, "सवय नाही." तो तिच्याकडे लक्ष देऊन म्हणाला, "कसली?" "आधीच्या relation मध्ये कसलंच स्वातंत्र्य नव्हतं. श्वास पण त्याच्याच मर्जीने घ्यायचा राहिला होता फक्त. Confidence च गेला. म्हणून अत्यंत silly गोष्टीसाठी पण permission घेऊ लागले. ती  गोष्ट त्याचा ego सुखावू लागली. त्यातून नशिबाने बाहेर पडले. पण तो असा म्हणजे सगळे असे असतील असा समज ...

क्षितीज

तो आणि ती समुद्रकिनारी गेले. समोर पाहिलं. दूरवर दिसणारा सागर. त्याला अथांग का म्हणतात त्याचं उत्तर लगेच त्यांना मिळालं. ज्याचा थांग लागू शकत नाही तो अथांग. खरंच ह्या सागराला अंत आहे का? अंत असेल तर कुठे जाऊन हा संपतो? असे प्रश्न त्याला पडले. ती म्हणाली, "क्षितिज बघ. आपले अवघड प्रश्न सोपे करतं." "म्हणजे?" त्याने प्रश्न केला. ती उत्तरली, "हा समुद्र कुठे संपेल वगैरे तुझा प्रश्न. त्याचप्रमाणे आयुष्यात पुढे काय होईल असेही तुझे प्रश्न." तो बुचकळ्यात पडत म्हणाला, "हो." ती गोड हसत म्हणाली, "क्षितीज हे त्याचं उत्तर." तो पुन्हा प्रश्नार्थक नजरेने म्हणाला, "पण क्षितीज म्हणजे तरी काय?" "जिथे आकाश आणि हे दूरवर असलेलं पाणी एकमेकांना मिळतात." तिने समर्पक उत्तर दिलं. "पण खरंच असं घडत नाही. ही एक concept आहे. हा एक भास आहे." तो म्हणाला. ती लगेच म्हणाली, "मान्य आहे. पण हे उत्तर आपल्या मनाचं समाधान तरी करतं." "पण मग असं भासवत, फसवत का जगायचं?" तो निरागसपणे म्हणाला. ती शांतपणे उत्तर देत होती, "आपण पण अ...

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...