Skip to main content

स्वतंत्र होडी!




ते दोघे तलावाकाठी शांत बसले होते.

तिने विचारलं, "भाजी कोणती करू?"

तो म्हणाला, "इतक्या रम्य ठिकाणी येऊन भाजीचा प्रश्न?"

ती त्याला हलकेच फटका देत म्हणाली, "गप रे. असतात असे प्रश्न."

"तुला हवी ती किंवा कंटाळा आला असेल तर जेवायला बाहेर जाऊ."


स्वतःच्या मनाने काही सहजपणे करण्याची सवय घालवून बसलेली ती त्याच्याकडे पाहत बसली.


कागदाची होडी करण्यासाठी पर्स मधला कागद घेत ती म्हणाली, "होडी कशी करू?"

"तुला हवी तशी." तो सहज म्हणाला.

"एवढं स्वातंत्र्य?" तिने प्रश्न केला.

तो आश्चर्याने म्हणाला, "हो. का? काय झालं? भाजी आणि होडी करण्यात काय विचारायचं?"

ती खाली पाहत म्हणाली, "सवय नाही."

तो तिच्याकडे लक्ष देऊन म्हणाला, "कसली?"

"आधीच्या relation मध्ये कसलंच स्वातंत्र्य नव्हतं. श्वास पण त्याच्याच मर्जीने घ्यायचा राहिला होता फक्त. Confidence च गेला. म्हणून अत्यंत silly गोष्टीसाठी पण permission घेऊ लागले. ती  गोष्ट त्याचा ego सुखावू लागली. त्यातून नशिबाने बाहेर पडले. पण तो असा म्हणजे सगळे असे असतील असा समज आपण करून घेतो. म्हणून तुला हा मूर्ख प्रश्न विचारला. Toxic relationship आणि स्वातंत्र्य नाही. ही जाणीव त्रास देत होती." ती कागद अस्वस्थपणे चुरगाळत म्हणाली.











तो निवांतपणे म्हणाला, "स्वातंत्र्याची सवय करून घे."

तिने थोड कचरत विचारलं, "जमेल?"

तो तितक्याच शांतपणे म्हणाला, "स्वातंत्र्य नसताना जमवलंस ना? मग स्वातंत्र्य पण सवयीचं होईल."

ती सांगू लागली, "स्वातंत्र्य नव्हतं तेव्हा पर्याय नव्हता. ज्याच्यासोबत होते तो प्रेम या lable खाली स्वातंत्र्य हिरावून घेत होता. सतत लक्ष ठेवणं, space न देणं, त्याच्या दृष्टीने सगळं perfect करणं, म्हणजे आपल्यासाठी पारतंत्र्यच ना?"

तो म्हणून गेला, "पण आता आहे ना स्वातंत्र्य? आहे ना पर्याय हवं ते करण्याचा?"

ती त्याच विचारात म्हणाली, "पर्याय नसण्याची सवय होते माणसाला."

"सवयी लागतात तशा घालवायच्या पण असतात." त्याने ठणकावून सांगितलं.

"सवयी लागणंही अवघड आणि सुटणं पण अवघड." ती हताश होत म्हणाली.



त्याने तिच्याकडे पाहत म्हटलं, "Negative राहायचं ठरवलंस तर काही घडणार नाही."

"Negative होत नाहीये, facts सांगतेय."

"हो. मग fact ही पण आहे की सवय अंगी बाणवायला २१ दिवस पुरतात."

"सगळ्याची उत्तरं आहेत तुझ्याकडे."

"शोधली की सगळ्याची उत्तरं सापडतात."

"काहीही बोलले तरी तुझ्याकडे reply आहेच."

"असायला हवा. तुझ्यासारख्या मुलीला प्रश्न इतके की कोणीतरी google च्या रूपात तुला भेटायला हवं. तुझं google मी आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं या google बाबा कडे मिळतील."



"उत्तरांचं ठीक आहे. पण प्रेम करशील?"

"Google बाबा ला कोणी प्रेम करायला तेवढं शिकवलं नाही. तेवढं शिकवशील?"

"प्रेम शिकवता येत नाही."

"मग?"

"ते होतं."

"जशी सवय होते तसं?" तो विचारपूर्वक म्हणाला.


ती हसली.


"प्रेम ही पण एक सवयच आहे ना गं?" त्याने निरागसपणे विचारलं.

ती गोड हसत म्हणाली, "प्रेम हे प्रेमच असतं.. त्या माणसाची सवय होते."

"मग प्रेम वाढतं?" त्याने प्रश्न केला.

ती विचार करत म्हणाली, "ती सवय आवडली तर प्रेमही वाढतं."

"थोडं अवघड आहे हे प्रेमाचं गणित." त्याने तिच्या हातातला होडीचा कागद घेत म्हटलं.


ती नवा कागद हातात घेत त्या कागदाची होडी बनवत म्हणाली, "हो, ठोकताळे नाहीत. २+२ = ४ यात नाही."

तो हातातल्या कागदाकडे पाहत म्हणाला, "हो ना... मग आमच्यासारख्या माणसांचं अवघड होतं गं. बाकी इतकी philosophy सांगतो आणि प्रेमाच्या विषयात गडबड."

ती कागदाची घडी व्यवस्थित घालत म्हणाली, "आम्ही आहोत ना मग."



तिच्याकडे पाहत तो म्हणाला,"आम्ही म्हणजे तुम्ही मुली का?"

ती होडी बनवण्यात गुंग होत म्हणाली, "असंच काही नाही. प्रेम कळणं हे केवळ मुलींचं department नाहीये. हे कोणालाही कळू शकतं. ह्याच्याशी related गोष्टींचं अर्थात, प्रेमाचं google जाणणारे आम्ही आहोत असं समज. मग प्रेम जाणणारी मुलंही तितकीच आहेत बरं."


पण आमच्यासारख्या लोकांनां प्रेम कळत नाही." तो तोंड पाडत म्हणाला.

"कळत असतं पण वळत नाही. जसं हे सवय, स्वातंत्र्य ही चर्चा जी आपण केली त्यात मी कच्ची आहे पण पक्क करायला तू आहेस. माझ्या स्वातंत्र्याची जाणीवेची होडी तूच तरंगत ठेवशील. तसं प्रेमाच्या department मध्ये तुला पक्क करायला, तुझी होडी तरून न्यायला मी तत्पर आहे. क्या बोलते हो partner?" तिची कागदाची होडी बनवून पूर्ण झाली होती.

"जमेल आपलं." तो हातातला होडी न बनवलेला कागद तिच्याकडे देत म्हणाला.

"हां, जसं स्वतंत्रपणे काम करायची मला सवय होईल तशी प्रेमाची तुला होईल." तिची होडी स्वतंत्रपणे आणि मुक्तपणे पाण्यात तरंगत होती.



ती गोड हसली. ती नवं स्वातंत्र्य अनुभवत होती. जाचातलं आयुष्य मागे टाकत नव्या वाटेवर ती निघाली होती. ह्याच्यासारखी साथ केव्हापासून तिला हवी होती. तिने अलगद त्याचा हात हातात घेतला.










तो म्हणाला, "या google ला प्रेमाचे प्रश्न पडलेत. विचारू?"

"विचार." असं म्हणत ती हसली.


तिची होडी पाण्यात निवांतपणे तरंगत होती.


- वरुण भागवत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...