Skip to main content

Routine चा आदर!




“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.”

“वेळ मिळाला की काय करतोस?”

“वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.”

“कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.” 



“तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?”

“नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.”

“हं, तेच.”

“तेच नाही, फरक आहे.”

“म्हणजे?”

“Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.” 



“कसं?”

“कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result हे process चं byproduct आहे. प्रयत्न केल्यावर, process मधून गेल्यावर अर्थात routine follow केल्यावर result मिळणारच आहे.” 

“पण हे routine…?”

“या routine चं एक boring example देतो.”

“Boring?”

“हां, तुला routine boring वाटतं ना?”

“मग नाहीये का ते boring?”

“१००% boring आहे. पण तेच आपल्याला पुढे नेतं. त्याचीच पुष्टी करणारं example.”


“हं, बोल.” 

“भारताचा football पटू सुनील छेत्री म्हणाला की त्याचा interview ऐकून तुम्ही bore व्हाल, कारण त्याचं routine खूप bore आहे. खूप monotony आहे त्याच्या रोजच्या जगण्यात, पण त्याच्या मते तुम्हाला काही मोठं achieve करायचं असेल तर ही monotony जगावी लागेल. Monotony म्हणजे तरी काय तर वेळेवर उठावं लागेल, वेळेवर जेवावं आणि झोपावं लागेल. हे सतत repeat करणं खरंच सोपं नाही. पण long term goals साठी या काही गोष्टी रोजच्या रोज कराव्याच लागतील.”

“छेत्री sportsman आहे. त्यामुळे त्याला त्याची process follow करायची आहे. आपलं काय?”

“प्रत्येक जण आपापलं कौशल्य वाढीस लावण्यासाठी प्रयत्नशील असतो. अर्थात त्याला ते कौशल्य वाढीस लावायचं असेल तर. त्यात पारंगत व्हायचं असेल तर ज्याची त्याची process, practice करावीच लागेल. नाहीतर आत्ता तू म्हणालास तसं तो काय मोठा player आहे असं म्हणून समोरच्याला मोठेपण बहाल केलं की आपलं काम सोपं होतं."

"अरे तसं नाही."

"तसंच आहे. कोणीतरी मोठं होतं तेव्हा ती व्यक्ती का आणि कशी मोठी होते हे पण जाणून घ्यायला हवं. आयुष्यात आपल्याला पण काहीतरी वेगळं करायचं आहे अशी निव्वळ इच्छा ठेवून कामाचं नाही. त्यासाठी process मधून जावं लागेल. त्या अनुषंगाने स्वाभाविकपणे त्याला जोडून येणारं routine, याला पर्याय नाही."


“काय करायचं मग?”

“असं म्हणतात की एखाद्या गोष्टीत पारंगत व्हायचं असेल, त्यात उत्तम काम करायचं असेल तर त्यासाठी १०००० तासांची practice लागते. हे achieve करायचं तर routine set हवं. तरच हे शक्य आहे.

“मला वाटतं हे सारं करताना consistency देखील तितकीच महत्त्वाची.”


“Correct. एकूण काय, routine हा मुळातच अनेकांच्या रोजच्या जगण्याचा आणि जीवनाचा भाग आहे. Routine bore होणं हे अगदीच acceptable आहे, पण काही काळाने पुन्हा achievements नजरेसमोर ठेवून routine follow करणं महत्त्वाचं आहे. ते follow करणं ही देखील एक रोजची achievement च आहे. आपल्याला आपल्या routine चं slave व्हायचं नाही. कंटाळून गेलो की त्यात बदल करायचा आहेच पण routine चा आदर करायचा आहे.”



“म्हणजे बरा लेखक व्हायचं तर १०००० तास लिहायचं?”

“ते आता तूच बघ.”

“अरे हे सोपं नाही.”

“Routine काय अवघड असतं का? असं तूच मगाशी म्हणालास.”

“हं. boring असतं रे."

"पण necessary असतं."


- वरुण भागवत

Comments

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...