A click by Sushil Ladkat Common man होणं सोपं नसतं. कित्तीतरी गोष्टींना त्याला सामोरं जायचं असतं. दाखवत नाही म्हणजे माणूस रडत नाही असं नसतं. आतमध्ये दर्या भरेल इतकं पाणी असतं. सांगत नाही म्हणजे त्याला बोलायचं नाही असं नसतं. अनेकदा मनातलं बोलायला आपलं माणूस हवं असतं. चिडला म्हणजे माणूस वाईट झाला असं नसतं. रागावणं नि रुसणं प्रेमाचं प्रतीक असतं. बोलत नाही म्हणजे प्रेम नाही असं नसतं. अबोल प्रेमाने कितीतरी मनांना जोडलेलं असतं. एकटा राहतो म्हणजे सोबत नको असं नसतं. सोबतीसाठी मन खरंतर वेडंपिसं असतं. सोबतीला सगळे आहेत म्हणून एकटं राहणं नापसंत नसतं. Space हवीय असं वाटणं स्वाभाविक असतं. वरती हसला म्हणजे आतून खुश आहे असंही नसतं. आतल्या दुःखाला संपवून टाकत हास्यतुषाराने आयुष्य परिपूर्ण जगायचं असतं. दुरावला म्हणजे त्याला परत यायचं नाही असं समजायचं नसतं. त्याला मनापासून मनवणं गरजेचं असतं. स्पष्ट बोलला म्हणजे दुष्ट झाला असं नसतं. चांगलं तेवढं उचलत बाकीचं बाजूला सारायचं असतं. संबंध संपला म्हणजे आठवणीतही नाही असं नसतं. आठवणीशिवाय आयुष्य अर्धवट असतं. सामान्य आहे म्हणजे त्याची स्वप्न नाहीत असं...
जे माझ्या मनात आहे तेच अनेकदा आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतं. तेच शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न. कधी कोणती कथा, तर कधी कोणता किस्सा... कधी मनातली कविता तर कधी मनातली संहिता...