Skip to main content

Team Trip आणि वागणूक

 



“थकायला झालं का रे?” जेवण करून निवांत पहुडलेल्या प्रशांतकडे पाहत त्याची बायको पायल म्हणाली.

“नाही, उलट मस्त refresh झालो.”

“अरे वा. चांगलंय. याचा अर्थ छानच झालेली दिसतीये तुमच्या टीम ची ट्रीप.”

“अगं, ट्रीप म्हणजे काही अशी फार मोठी ट्रीप नव्हती, छोटंसं outing होतं. मजा आली.”

“फिरायला कारण पाहिजे तुम्हा लोकांना.” पायल चिडवत म्हणाली.

“अगं.” प्रशांतने आश्चर्य व्यक्त केलं.

“मग काय, मस्तपैकी ऑफिसच्या लोकांसोबत फिरायचं, team bonding च्या नावाखाली.”

“खरंय मग ते.”

“उगाच.”

“फक्त team bonding असं नाही,  as a leader मला अनेक गोष्टी शिकायला मिळतात.”

“As in?”


“अगं अशा प्रसंगी team ला थोडी मोकळीक मिळाली आणि त्यांच्याशी सहज informal वागायला लागलं की त्यांच्या बाजू अगदी स्वच्छ आणि खऱ्या रुपात दिसतात.”

“ऑफिस मध्ये दिसत नाहीत का?”

“तसं नाही, मुळातच ऑफिस म्हटलं की वातावरण थोडं formal असतंच आणि हे आपण deny करू शकत नाही.”

“True.”

“म्हणूनच मग हे team trip सारखे प्रकार मधून अधून बरे असतात, त्या माणसापर्यंत आणि त्याच्या खऱ्या रूपापर्यंत पोहोचण्यासाठी.”

“खरी रूपं? म्हणजे माणसं ऑफिस मध्ये खोटं खोटं वागतात?”

“सगळे नाही. मुळात पूर्ण खोटं असं कोण वागत नाही, पण काही पैलू कळलेले नसतात, काही चांगल्या पैलूंना वाव मिळालेला नसतो. Untapped talent सुद्धा यातून बाहेर येतं. कधीकधी एखादी negative side सुद्धा कळून येते.”

“Negative side?”

“हां.”


“कशी?”

“Specific असं नाही, पण एकूणच लोकांचा विचार करण्याचा, काम करण्याचा दृष्टीकोन दिसतो. कधी कधी आपल्याला फारशी आवडणार नाही अशी बाजू दिसते.”

“कोणती?”


“एका माणसाला नवनवीन घोडे विकत घेण्याचा शौक होता. घोडे पारखून घेण्यात तो तरबेज होता. उगाच कोणतही घोडा विचार न करता विकत घेतलाय असं शक्यतो त्याच्याकडून घडत नसे. तो घोड्याची परीक्षा घ्यायचा, ती सुद्धा प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारे. एकदा तो घोडा विकत घ्यायला गेला. त्याने आधीच सांगितलं की या घोड्याची मी परीक्षा घेईन आणि पसंत पडला तरच विकत घेईन. तो घोड्यावर स्वार झाला, छोटी चक्कर मारली आणि परत आला आणि जिथे बाकीचे अनेक घोडे होते त्या घोड्यांमध्ये त्याने याला पण सोडलं आणि स्वत: नजरेआड झाला. त्याला लक्षात आलं की हा घोडा एका अत्यंत आळशी आणि कामचुकार  घोड्याशेजारी गेला आणि स्वत:सुद्धा तिथे जाऊन लोळून आळशीपणा करू लागला. तत्क्षणी माणसाने निर्णय घेतला की या घोड्याला विकत घ्यायचं नाही.”


“आजच्या trip मध्ये तुम्हालाही तुमचा कोणी चांगला member कामचुकार employee च्या नादाला लागलेला दिसला का?”

“अगदी योग्य ओळखलंस.”

“आता त्याला काढून टाकणार?”

“मुळीच नाही. थेट नोकरीवर गदा नाही आणायची. Career चा प्रश्न आहे.”

“श्या, उगाच trip काढली का हो तुम्ही? या बाजू कळल्या लोकांच्या.”

“अगं उलट उत्तम झालं. वेळेत कळलं. एका चांगल्या employee ला कामचुकार होण्यापासून वाचवायची योग्य संधी आहे.”

“तो चांगलाय हे कशावरून?”


“अजून लहान आहे, innocent आहे. आपण वळवू तसा वळेल. Potential आहे. मी वाया नाही जाऊ देणार. त्याची खरी किंमत तो जाणत नाही, मी जाणतो, म्हणून प्रयत्न करणार.”

“घोडे विकत घेणाऱ्या माणसापेक्षा approach फार वेगळा आहे तुझा.”

“हो, शिकवण तीच. पण शिकवण मिळण्याचा प्रसंग आणि वेळ वेगळी आहे. म्हणून approach निराळे. आणि मुळात ती गोष्ट आणि हे सत्य आहे.”

-    वरुण भागवत    


Comments

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...