Skip to main content

Common man होणं सोपं नसतं!

 

A click by Sushil Ladkat



Common man होणं सोपं नसतं.

कित्तीतरी गोष्टींना त्याला सामोरं जायचं असतं.


दाखवत नाही म्हणजे माणूस रडत नाही असं नसतं. आतमध्ये दर्या भरेल इतकं पाणी असतं.


सांगत नाही म्हणजे त्याला बोलायचं नाही असं नसतं.

अनेकदा मनातलं बोलायला आपलं माणूस हवं असतं.


चिडला म्हणजे माणूस वाईट झाला असं नसतं.

रागावणं नि रुसणं प्रेमाचं प्रतीक असतं.


बोलत नाही म्हणजे प्रेम नाही असं नसतं.

अबोल प्रेमाने कितीतरी मनांना जोडलेलं असतं.


एकटा राहतो म्हणजे सोबत नको असं नसतं.

सोबतीसाठी मन खरंतर वेडंपिसं असतं.


सोबतीला सगळे आहेत म्हणून एकटं राहणं नापसंत नसतं. 

Space हवीय असं वाटणं स्वाभाविक असतं.


वरती हसला म्हणजे आतून खुश आहे असंही नसतं.

आतल्या दुःखाला संपवून टाकत हास्यतुषाराने आयुष्य परिपूर्ण जगायचं असतं.


दुरावला म्हणजे त्याला परत यायचं नाही असं समजायचं नसतं.

त्याला मनापासून मनवणं गरजेचं असतं.


स्पष्ट बोलला म्हणजे दुष्ट झाला असं नसतं.

चांगलं तेवढं उचलत बाकीचं बाजूला सारायचं असतं.


संबंध संपला म्हणजे आठवणीतही नाही असं नसतं.

आठवणीशिवाय आयुष्य अर्धवट असतं.


सामान्य आहे म्हणजे त्याची स्वप्न नाहीत असं नसतं.

त्याला पण आयुष्यात हिरो व्हायचं असतं.


ऐकून घेतो म्हणजे भावना नाहीत असं नसतं.

ऐकवणाऱ्याला बोलणं अनेकदा शक्य नसतं.


शांत आहे म्हणजे रागावत नाही असं नसतं.

रागावणं हानिकारक आहे हे मन जाणून असतं.


रोज मर मर करणं कायम आवडत नसतं.

कुटुंबाकडे पाहून शरीर काम करत असतं.


सामान्य माणूस असणं बिलकुल सोपं नसतं.

सगळं सांभाळून जगणं तारेवरच्या कसरतीसारखं असतं.


भांडणात एक पाऊल मागे सरकला म्हणजे माघार घेतली असं नसतं.

त्या मागे जाण्यात खूप खूप प्रेम असतं.


मनातलं बोलला म्हणजे बोलायचं भान नाही असं नसतं. तसं करणं निरागसतेमुळे घडलेलं असतं.


क्षणभर थांबला म्हणजे संपला असं नसतं.

विश्रांतीनंतर अधिक वेगाने कामाला लागायचं असतं.


हरला म्हणजे जिंकणं विसरला असं नसतं.

हार पचवून पुन्हा जिंकू पाहणाऱ्या खऱ्या नायकाचं हे लक्षण असतं.


- वरुण भागवत

Comments

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...