![]() |
| A click by: Sushil Ladkat |
केतन सवयीप्रमाणे व्यायामाला एका club मध्ये जायचा. Routine ठरलं होतं. जिथे तो व्यायामाला जायचा तो एक sports club च होता. त्यामुळे club च्या member व्यतिरिक्त इतर कोणाला प्रवेश नसे. आज अचानकच केतनला आतमध्ये असणाऱ्या security guard ने अडवलं. केतन member होता, पण तरी त्याला अडवलं होतं. केतनला या गोष्टीची चीड आली. नुसतं अडवण्याची नव्हे तर अडवण्याच्या पद्धतीची. Guard ने चुटकी आणि टाळी वाजवत हाताचा इशारा केला आणि म्हणाला, "कुठं चालला रे?"
केतन तरीही चालत राहिला. Guard चिडला. तो वयस्कर होता तरीही केतन दुर्लक्ष करतोय हे पाहून अजून मोठ्या आवाजात मोठ्या कष्टाने थोडं जवळ येऊन म्हणाला, "विचारलेलं कळत नाही का?" केतन थांबला. झटकन म्हणून गेला, "का थांबू? इथे रोज येतो मी."
"पण मी इथं नवीन आहे."
"मी जुना आहे."
"तुझ्या गळ्यात club चं card नाही."
केतन अरेरावी करत म्हणाला, "तुम्ही आज आलाय."
यावर guard चा आवाज अजून चढला आणि म्हणाला, "ए पोरा, मी काम करतोय. तू नाही मला शिकवायचं."
"Card माझ्या bag मध्ये आहे."
"दाखव."
केतनचा संयम सुटू लागला आणि तो बोलून गेला, "नाही दाखवत जा."
यावर guard काही बोलणार तोच केतनच्या trainer ने आवाज दिला. विषय थांबला, पण संपला नाही. केतन निघाला. चेहऱ्यावर अविर्भाव असा होता की बघितलं ना, इथले सगळे मला ओळखतात. तू अकारण मला अडवतोयस. पण हे सगळं नजरेतून घडलं. केतन खांदे झटकत कॉलर tight करत तिथून करत जाऊ लागला. जाता जाता म्हणाला, "बोलण्याची पद्धत बघा तुमची."
.
.
केतनचा व्यायाम करून झाला होता. थकून थोड्या वेळ club मधल्या bench वर केतन टेकला होता. तिथून त्याला तोच guard दिसला जो त्याचं काम करण्यात मग्न होता. Session सुरू होण्यापूर्वी guard सोबत घडलेला प्रकार त्याला आठवला. आत्ता तो त्या bench वर बसून स्वतःचाच घडलेला किस्सा तिऱ्हाईताच्या नजरेने पाहत होता. एकूणच त्या guard चं वय इथल्या bench वर बसून त्याला आता जाणवत होतं. गरज म्हणून काम करणारा तो म्हातारा त्याला बापासारखा भासला.
केतन चालू लागला. २-३ वेळा प्रयत्न करूनही त्या guard कडे जाण्याचा विचार पक्का होईना. कारण पुन्हा तिकडे जाणं म्हणजे स्वतःचा ego hurt करून घेणं आलं. पण ego पेक्षा माणुसकी मोठी ठरली आणि धैर्य एकवटून केतन त्याच्यापाशी गेला. काय बोलायचं हे काही ठरवलं नव्हतं. पण आधी जे आपण त्या guard सोबत वागलो ते चुकीचं होतं इतकं तर केतनला कळत होतं. मग त्याने विचार केला की हेच सांगू आपण त्यांना.
केतन धीर करून guard जवळ गेला. Guard कामात होता तरी त्याला जाणवलं हा पोरगा जवळ येतोय. मगाशी घडलेला प्रसंग ताजा होता. आता हा काही बोलला तर याला सोडायचं नाही अशा विचाराने guard आवेशात केतनला सामोरा गेला.
केतनच्या तोंडून नकळत निघून गेलं, "Sorry." हे ऐकून guard चकित झाला. केतन बोलत होता, "मी तुमच्या वयाचं भान राखलं नाही. वाट्टेल ते आणि वाट्टेल तसं बोललो."
Guard ला काय बोलावं कळेना. सहज त्याच्या तोंडून निघून गेलं, "मला पण माफ कर."
केतन म्हणाला, "अहो तुम्ही का माफी???"
Guard केतनचं बोलणं मध्येच तोडत म्हणाला, "मी वयानं मोठा असलो म्हणून काय झालं. इथे नवीन असलो म्हणून काय झालं. या जगात कोणत्याही माणसाशी बोलण्याची वागण्याची अलिखित सभ्य पद्धत आहे. तू जाताना बोलून गेलास की बोलण्याची पद्धत बघा तुमची म्हणून. मला जाणवतंय की असं वागण्याने मी कोणाला आपलंसं करत नाहीये. तू उलट बोललासच. या वयाला ते सहन होत नाही. थोडक्यात काय तर तू तुझ्या वयाला साजेसा वागला. मी मात्र वयानुसार शांतपणे घेणं अपेक्षित होतं.
मी उत्तरलो, "वय तरूण आहे म्हणून गरम डोकं असावं हा अलिखित अधिकार पण चुकीचाय. डोकं शांत ठेवून बोललो असतो तर कदाचित वेगळा संवाद घडला असता."
Guard मोठा हुशार. मिश्कील हसत म्हणाला, "हो पण मग आत्ता आपण बोलतोय तो संवाद नसता झाला. चल, पळ पोरा. उद्यापासून साहेब म्हणून आवाज देईन. केतन लागलीच म्हणाला, "नको. 'ए पोरा' असंच म्हणा.
Guard हसला. केतन जाऊ लागला. Guard ओरडला, "ए पोरा." केतन वळून पाहू लागला. Guard खोटं खोटं दटावत म्हणाला, "दारातून आत येताना आणि दाराबाहेर पडताना club चं card दिसलं पाहिजे." केतनने हसत हसत कान पकडले आणि bag मधून card बाहेर काढून दाखवलं. नकळत आजूबाजूच्या ४ जणांनी पण card काढून दाखवलं.
Guard केतनच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला. आपल्या सख्ख्या पोरासकट सगळे तरूण हे उलट उत्तर देणारेच असतात हा guard चा समज केतनने नकळत पुसला होता. आपल्या कान धरणारा बापाला केतन या guard मध्ये शोधत होता आणि रोज मुद्दाम club चं card बॅगेत ठेवत होता आणि guard ओरडला की bag मधून काढून त्याला दाखवत होता.
- वरुण भागवत

😍👏
ReplyDeleteKhup chan ❤️
ReplyDeleteThank you!!
Delete