![]() |
| A Click by- Sushil Ladkat |
एक होता उंदीर आणि एक होता बेडूक. यांची झाली मैत्री. थोडं odd होतं हे combination. उंदीर बिचारा भोळा आणि बेडूक थोडा लबाड.
हा बेडूक उंदराशी वाट्टेल तसं विचित्र वागायचा आणि त्याचं त्या बेडकाला कधीच काही वाटायचं नाही.
त्याला तो कायम कमी लेखायचा. उंदीर त्याचं काहीच वाकडं करू शकणार नाही याची त्याला
खात्री होती आणि हे बऱ्यापैकी खरं सुद्धा होतं. उंदीर कधीच काही बोलायचा नाही.
असली मैत्री तरी का असावी असा एक प्रश्न कोणालाही पडला असता. पण ज्याला पडायला
पाहिजे त्या उंदराला तो पडत नव्हता. पर्याय नसल्यासारखं, जगातले इतर मित्र संपल्यासारखा तो घाबरून
का होईना त्याच्यासोबत राहत होता. त्यामुळे बेडकाचं असं बेदरकार वागणं वाढू लागलं.
एक दिवस तर बेडकाने कहर केला.
त्याला उंदराची अतीशय नीच दर्जाची मस्करी करायची लहर आली. त्याने उंदराचा पाय स्वतःच्या पायाला बांधला आणि उड्या मारत फेरफटका मारायला निघाला. उंदीर फरफटत त्याच्या सोबत ओढला
जाऊ लागला. डबकं तर बेडकाची अतीशय लाडकी जागा. त्याने उंदराचा आणि बाकी कसलाच
पुढचा मागचा विचार न करता डबक्यात उडी टाकली. स्वतः मस्तपैकी पाण्यात खेळू लागला.
पण उंदराच्या मात्र नाकातोंडात पाणी जाऊ लागलं. इतकं की तो गटांगळ्या खाऊ लागला
आणि काही क्षणांत मरण पावला. बेडकाला त्याचं काही नव्हतं.
जगात चांगली माणसं आहेत पण सोबत नीच माणसं सुद्धा असतात. स्वतःच्या फायद्यासाठी, गमतीसाठी एखाद्या साध्या माणसाला चेष्टेचा
विषय बनवतात. स्वतः डबक्यात राहतात आणि दुसऱ्याला पण त्याच त्या डबक्यात ओढतात. मग
त्यात त्या दुसऱ्याचं काय होतंय या कडे ते पाहत नाहीत. अनेक जण भीतीने अशा
लोकांच्या मागे जातात. काय म्हणतील ते सहन करतात. अनेकदा कळत पण नाही.
अन्याय करणं चूक तसं सहन करणं सुद्धा चूक!
पण अन्याय करणं तर कधी कधी गुन्हा करण्याइतकं गंभीर असतं जे बेडकाने केलं होतं.
उंदीर पाण्यात मेला.त्यामुळे त्याचं प्रेत फुगून पाण्यावर तरंगू लागलं. आकाशामध्ये एक घार घिरट्या
घालत होती. घारीची नजर तीक्ष्ण असते. तिला वरूनच दिसलं की एक उंदीर मेला आहे आणि
पाण्यात तरंगतो आहे. घार वेगाने खाली आली आणि तिने उंदीर पकडला. उंदराचा पाय
अजूनही बेडकाला बांधला असल्याने घारीने उंदीर पकडल्यावर त्याच्या सोबत आपोआपच
गाफील असलेला बेडूक सुद्धा तिच्या तावडीत सापडला. घारीला आयती शिकार चालून आली
होती. तिने समोर आलेल्या मेजवानीचा मनसोक्त आस्वाद घेतला.
Karma (अर्थात कर्म) ही अशी गोष्ट आहे जी फिरून
आपल्याकडेच येते.
चांगल्या कर्माचं फलित उत्तम मिळतं. वेळ लागू शकतो. मान्य.. पण वाईट कामाचं फळ सुद्धा वाईटच. कधीकधी त्याचं फळ तर अजून लवकर मिळतं जसं या गोष्टीत घडलं.
हे कर्म म्हणजे अनेकदा हिशोबासारखं असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसऱ्याचं वाईट करून आपलं कधीच चांगलं होत नाही.
Equation अर्थात समीकरण कधी ना कधी जुळून येतच. Circle पूर्ण होतो. बाकी शून्य राहतेच..
या गोष्टीतल्या वाईट कर्माची जशी बाकी शून्य राहिली. कारण कर्म हे boomerang नावाच्या
अस्त्रासारखं आहे. वळून पुन्हा आपल्याकडेच. आपण करू तसं. आपण जे देऊ ते फिरून
येतं. चांगलं केलं तर चांगलं नाहीतर....
- वरुण भागवत

Nice !👌
ReplyDeleteKhup chan 👌👍
Deleteछान
ReplyDeletethanks
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteसुंदर...
ReplyDeletechan varun
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteNice !!
ReplyDeleteKhup chhan
ReplyDeleteKhupach sundar
ReplyDeleteMast☺️
ReplyDeleteछान 👌
ReplyDeleteWaa! Match!
ReplyDeleteThat story, I am listening for the First time..👍👍👌👌.
एक कटु सत्य
ReplyDeleteReality..
ReplyDeleteChan
ReplyDelete