Skip to main content

अबोल ती... अबोल तो...

 



माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?"


अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..."

या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये."

त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?"

"नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?"

"ऐकव."


गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोचले. ती पटकन म्हणाली, "थोडी अस्वस्थ झाले होते मी काल. कोणीतरी हवं होतं जे मला एकही प्रश्न न विचारता समजून घेईल. माझ्यासवे केवळ शांतपणे थांबेल. एक गोड गाणं लावायचं आणि त्या गाण्यात रमून जायचं, न बोलता बरं का! बाकी काही नको होतं. पण ठीके." 


तो सहज बोलून गेला, "ठीक का? अजून नाहीयेस तू ठीक! आत्ता लाव तुला हवं तसं गाणं."

जणू त्याने तिच्या मनातलं जाणलं आणि गाण्यामध्येही पंक्ती होत्या - "बिन बोले बाते, तुमसे करू..."


हलक्या आवाजात गाणं सुरू झालं. दोघे केवळ एकमेकांसोबत बसून होते. डोळे मिटून गाणं ऐकू लागले. ती इलुसं हसत म्हणाली, "इतकं छान गाणं आहे हे.. काय करायचं आपण?"

गाण्याची धून ऐकतानाच तो बोलून गेला, "तू सांग." 

"Dance येतो?" तिने उत्साहाने प्रश्न केला. 

अत्यंत शांतपणे हसत तो म्हणाला, "नाही. पण तुला करायचा असेल आणि तू शिकवशील तर करूया."

ती मोठ्या उत्साहात पुढे येऊन उभी राहिली. हात पुढे करत तिने त्याला उभं राहण्यासाठी खुणावलं. तो उभा राहिला. एक हात हातात घेतला. त्याचा दुसरा हात तिनेच तिच्या कमरेवर ठेवायला सांगितला.  ते ball dance च्या position मध्ये आले.


इतका वेळ खूप शांत असणारा तो एकदम काहीसा अस्वस्थ झाला. इतक्या वेळ अस्वस्थ असणारी ती मात्र एकदम शांत झाली. ती steady होती. तो थोडा थरथरत होता. 


ती शांत होती. तिला इतकाच शांतपणा हवा होता. एक अबोल पण हवीहवीशी सोबत जी आत्ता तिच्यासवे होती. शांतपणा... एखाद्यावर पूर्ण भार सोपवून ती मोकळी झाली. Dance च्या position मध्ये येताच ती पूर्ण स्थिरावली. हळूहळू dance च्या steps पडू लागल्या. त्याने डोळे मिटून घेतले. अशा dance मध्ये शक्यतो मुलगा मुलीला lead करतो. इथे मात्र तिनेच त्याला सावरून घेतलं. या आधी त्याने काही वर्षांपूर्वी असा dance केला होता. पण तो rehearsed होता. Stage वर साऱ्या प्रेक्षकांसमक्ष केला होता. That time he was confident. आज खरं पाहता खोलीत दुसरं कोणी नव्हतं. Dance चुकला असता तरी कोणी हसणार नव्हतं. पण तो मात्र nervous होता. ती मात्र सगळं सहज करत होती. 


दोघे श्वासाइतके समीप आले. परंतु कोणाच्याच मनात कोणताच वेगळा विचार नव्हता. निर्मळ भाव होता. त्यामुळेच बहुधा nervousness होता. म्हणूनच ती इतकी मोकळी होती. 

"श्वासाइतक्या जवळ असणाऱ्या माणसावर श्वासाइतकाच विश्वास असू नये का?" हे व. पु. काळे यांचं वाक्य ती अगदी सहज जगत होती. डोळ्यातून ते दर्शवत होती. अशा परिस्थितीत तिसऱ्या माणसाला जे घडेल असं वाटतं तसं काहीच घडणार नव्हतं. हा विश्वास दोघांनी डोळ्यांतून एकमेकांना दिला. त्याच्यावर असणाऱ्या विश्वासामुळेच ती इतक्या सहज त्याच्यासवे रमली होती. तो तिचा comfort आणि safe zone होता हे ती त्याला दर्शवत होती. हे केवळ हालचालीतून आणि डोळ्यातून ती सांगत होती. त्याचे कोणतेच स्पर्श तिला नकोसे नव्हते. कोणत्याच स्पर्शाला नकोसा गंध नव्हता. तो हळूहळू स्थिरावला.


काहीच घडलं नव्हतं. पण खूप काही घडलं होतं. एक गोड नातं होतं. नात्याला काहीच नाव नव्हतं. माणूस नात्याला नाव आणि नावं  ठेवण्याच्या अट्टाहासाने उगीच नात्यांची हेटाळणी करू पाहतो. प्रत्येक नात्याला नाव कशाला हवं? Logic कशाला हवं? योग्य/ अयोग्य का म्हणायला जावं?



काही कारणाने एखादा जीव थोडा उदास असतो. त्याचं उत्तर हे दुसऱ्या माणसात दडलेलं असतं. तो दुसरा माणूस उदासवाण्या मनस्थितीतून त्या व्यक्तीला बाहेर काढतो. ह्यात केवळ सकारात्मक ऊर्जा transfer होते.


कोणाला सांगता येईल असा हा क्षण नव्हता. कारण कोणाला हा क्षण कशाही पद्धतीत सांगितला असता तरी तो प्रत्येकाने स्वत:च्या चष्म्यातून पाहिला असता आणि हवा तोच अर्थ काढला असता.

मग जे होतं ते उत्तम होतं. 


काही क्षणांपूर्वी ते 'क्षण' या विषयी बोलले होते. क्षण छोटा असतो. पण तो छोटा क्षण खूप मोठ्या आठवणी तयार करतो. काही क्षण जगायचे, विसरून जायचे. काही मनाच्या कप्प्यात साठवून ठेवायचे, पुरवून वापरण्यासाठी.



एकदम गाणं संपलं. तो आपले नेत्र अलगद उघडले. तो तिथेच होता. ती ही तिथेच होती. मगाच्या 'ती' पेक्षा आताची 'ती' खूप वेगळी होती, चांगल्या अर्थाने. दोघे मिठीत विसावले. त्याची स्पंदनं अत्यंत वेगवान होती. तिला जाणवत होती. आता ती त्याला न बोलता शांत करणार होती. अज्ञात, दुसरं कोणी नसलेल्या किनाऱ्यावरून नाव वल्हवत पुन्हा माणसांत यायचं होतं. भावविश्वातून पुन्हा रोजच्या विश्वात यायचं होतं.


काही गोष्टी दोघांत असतात. त्या तशाच राहाव्या. सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या व्यक्ती भेटणं कधीकधी destined असतं. कारण ही सकारात्मकता दोघांनी एकमेकांना द्यायची असते.


तिला ऊर्जा गवसली. पण त्याला कधी अशी ऊर्जा लागणार होती का? संवेदनशील मनाला अशी ऊर्जा हवी असते.


पुन्हा जाणार होते का ते त्या अज्ञात पण तरीही हव्याहव्याशा किनाऱ्यावर?



- वरुण भागवत

Comments

  1. वाह !किती छान आणि उत्कृष्ट लिहिता तुम्ही 👏👏👏👏

    ReplyDelete
  2. खूप खूप धन्यवाद!!

    ReplyDelete
  3. ह्यालाचं तर निर्मळ भाव असणारी मैत्री म्हणतात. निर्मळ मनाची व्यक्तीचं असं लिहू शकते.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...