ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे.
ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई.
आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला.
गल्ली, दुपारी १ ची वेळ. आजूबाजूला पाहिलं तर मदत करणारं कोणी दिसेना. मग हे शिवधनुष्य तिने स्वतः उचलायचं ठरवलं. अर्थात स्वतःची गाडी स्वतः बाहेर काढायचं ठरवलं. तिने पिशव्या तिथेच खाली ठेवल्या. पण ते तिला पाहवेना कारण पिशव्या खालून खराब होतील. मग मोठ्या मुश्किलीने तिने त्या तिच्या moped bike च्या seat आणि handle च्या मध्ये मोकळ्या जागेत ठेवल्या. पण गाड़ी side stand वर असल्याने त्यातली एक पिशवी थोडी खाली घसरू लागली. २२ वर्षीय ईशाची चांगलीच तारांबळ झाली.
तेवढ्यात तिथे साधारण पंचविशीची, मध्यम बांध्याची तरुणी साडी नेसून चालत येत होती. कधीतरी साडी नेसल्यावर साडी carry करता न आल्याने ज्या पद्धतीत चाल असते तशी चालत होती. खरंतर ईशाची तिच्याकडे पाठ होती. पण तिच्या pencil heels चा आवाज ऐकून तिने वळून पाहिलं. ईशाला वाटलं, चला, मदत आपल्याकडेच चालत आली. ईशाने, "Excuse me" असा आवाज दिला. त्या साडीतल्या मुलीने लक्ष असून दुर्लक्ष केलं. ईशाला वाटलं तिने ऐकलंच नसेल म्हणून परत आवाज दिला. ती मुलगी थांबली नि "काय?" असं म्हणत फिस्कारली.
ईशाने तरीदेखील तिचा सूर नरम ठेवत " Please मदत करा ना ही गाडी काढायला." अशी विनंती केली.
ती नकचढी मुलगी आधी नाईलाज असल्यासारखी मदत करायला सरसावली नि क्षणात मागे फिरली,
"ईईईगए," असं म्हणाली. "या शेजारच्या गाडीवर किती धूळ आहे. मी नाही हात लावणार. मी एका function ला, lunch ला जातेय. माझे हात खराब होतील."
"जेवणाच्या आधी धुशीलच ना हात???" असं इशाला म्हणावं वाटलं पण तिने स्वतःला सावरत म्हटलं, " तू माझी गाडी काढ ताई. मी ती धूळ असणारी गाडी बाजूला करते."
तिची इच्छाच नसावी. तिचा फोन वाजला. "उशीर होतोय." म्हणाली. आधी आरामात चालणाऱ्या मुलीच्या पायांनी अचानक वेग धारण केला किंवा किमान तसं भासवलं. फोनवर बोलू लागली, "हां, मी पुढे निघालीये."
ईशा गाडीच्या दोन्ही बाजूंना पाय टाकून अर्धवट कसंतरी बसून, अर्ध उभं राहून, घसरणारी पिशवी सांभाळत त्या मुलीच्या दिशेने पाहत राहिली. ती मुलगी डावीकडे एका छोट्या गल्लीत घुसली.
तेवढयात, "पोरी, गाडी काढ तुझी बाहेर." असा मागून आवाज आला. तिने वळून पाहिलं. पन्नाशीतली बाई असावी. ईशाने अंदाज लावला. तिने धुळीने माखलेली गाडी तिच्या हाताने लिलया बाजूला केली. जेणेकरून ईशा तिची गाडी काढू शकेल. ईशा हसली. तिने अलगदच गाडी बाहेर काढली.
"अगदी सुरुवातीला गाडी चालवायचे तेव्हा माझीही अशीच तारांबळ उडायची. तुला लांबून पाहिलं. मला तुझ्यात मीच दिसले.." बाई हसत म्हणाली.
ईशा आभार मानण्यासाठी "Thank..." असं म्हणणार तोच thank you पूर्ण होईपर्यंत "आssssssss" असा आवाज आला. दोघींनी आवाजाच्या दिशेने पाहिलं. डावीकडच्या गल्लीतून आवाज आला जिथून ती साडीतली मुलगी pass झाली होती. ईशा गाडीवर बसली होती. तिने सवयीने side stand वर गाडी लावली. दोन पिशव्यांतली एक पिशवी पडू लागली. तिने दुर्लक्ष केलं. पिशवी पडलीच, पण ईशा आणि ती बाई मुलीकडे पळाल्या. त्यांनी पाहिलं. ती मुलगी पडली होती.
बाईने त्या मुलीला हात दिला. ती मुलगी माझ्याकडे आणि त्या बाईकडे बघत बसली.
"ते.. मी... चालताना हाय हील्स मुळे पाय एकदम मुरगळला आणि.." रस्त्याकडे बोट करत ती मुलगी म्हणाली, "तिथे खडबडीत आहे."
बाईने तिला उठवलं. हाताला धूळ लागेल असं म्हणणाऱ्या मुलीची साडी धूळमातीने माखली होती. ईशा तिच्याकडे पाहत राहिली.
"जमत नाही तर कशाला हील्स वापरायच्या?" बाई शांतपणे म्हणाली. ती मुलगी चटकन उत्तरली. "Sorry, आई!"
ईशा मदत करणाऱ्या आणि नाकारणाऱ्या मायलेकींकडे पाहत राहिली.
- वरुण भागवत

किती छान
ReplyDeleteThank you!
DeleteKhup mast
ReplyDeleteThanks!!
DeleteWaw ...khupach bhari aa...MLA khup awdly esha Ani ti 25 tli..as hot nehmich mulinch,....😆😆😂😂🤣🤣🤣😆😆😆
ReplyDeleteThank you 😊
Deleteकमाल!
ReplyDeleteThank you 😊
ReplyDeleteMast 👌👌
ReplyDeleteखूप छान!
ReplyDeleteखूपच छान ज्ञाना दादा 😊👏
ReplyDeleteKhup sundar katha apratim
ReplyDelete