Skip to main content

साथी रे!

 

A click by : Varun Bhagwat

तिने विचारलं, "कसला विचार चालू आहे रे? मनात ठेवू नको. सांग ना."
तो सहज म्हणून गेला, "तुझाच विचार चालू आहे."
"काय?"
"तुझी आठवण!"
"अं..."
"तुला नाही का गं येत माझी आठवण?"
"येते रे. खूप येते. पण मी बोलून दाखवलं तर अजूनच miss करशील मला!"
"हो गं. पण आपली भेट?"
"लवकरच."
"नुसती आशा की खात्री?"
"खात्री!"
"एवढी खात्री कुठून येते?"
"आपल्या प्रेमावर विश्वास आहे. त्यामुळे खात्री असतेच. कामानिमित्त आत्ता एकमेकांपासून दूर असू तरी कामं आटोपताच पुन्हा भेट होईलच."
"पण या सखीचा विरह म्हणजे जीवाला फार त्रास."
"अरे काय कायमचा विरह थोडी आहे?"
"हो, पण थोडा विरह सुद्धा त्रास देतो."
"असू दे थोडा विरह."
"प्रेम अजून वाढतं म्हणशील."
"हो."
"ते माझं समाधान व्हावं आणि मी सारखं 'तू हवी' असं म्हणू नये म्हणून!"

ती गोड हसली आणि म्हणाली, "तुझं हे असं वागणं मला अजून तुझ्या प्रेमात पाडतं. मी कशाला हवी असते रे तुला?"
"कशाला म्हणजे?"
"बाकी किती जणी आहेत, असतील, मिळतील."
"असू दे."
"मग मीच का?"
"त्या मिळाल्या तरी त्यांच्यात मी तुलाच शोधीन."
"असं का?"
"असंच."
"सांग की रे."
"तुझं असणं खूप ऊबदार असतं. तुझ्या फक्त जवळ असण्याने वाटतं की हे सगळं जग किती सहज आहे, सोपं आहे. तू सोबत म्हणजे मज्जा. तू नाही तर..." (बोलता बोलता त्याचा गळा भरून आला.)

ती समजायचं ते समजली. एका शब्दाने बोलली नाही.
क्षणार्धात त्याच्या डोळ्यांतून अश्रू झरझर झरू लागले.
तिला समजलं. तिने अलगद विचारलं, "रडतोयस?"
तो रडतच म्हणाला, "मुलं कुठे रडतात का?"
ती म्हटली, "का बरं? का नाही रडायचं?"
तो बोलून गेला "पुरुषार्थाचा अपमान होतो म्हणे."
ती लागलीच म्हटली, "असं कोण म्हणतं? बिलकूल नाही. मुलीला बळाने रडवणं हा खरा पुरुषार्थाचा अपमान! तू तर स्वप्नात पण मला रडवायचा विचार करत नाहीस."

फोनवर  पूर्ण एक मिनिट शांतता होती. त्या शांततेत दोघांचा संवाद झाला, निःशब्द! दोघे एकमेकांना दिसत नव्हते, तरी भावनांचं आदान-प्रदान होत होतं. तो भावनांना अडवत नव्हता. तो मोकळा होत होता.

मिनिटभर शांतता होती खरी. पण दोघांच्या मनात विचारांची चक्र फिरत होती. दोघांच्या अवघड क्षणांमध्ये दोघांनी एकमेकांना केलेला support त्यांना आठवत होता.

आत्ता दोघे प्रत्यक्ष एकत्र नसून सुद्धा दोघे एक होते. हे असं या क्षणी सोबत नसून पण 'एक' असण्याची भावना देणारं माणूस प्रत्येकाच्या आयुष्यात असणं फार महत्त्वाचं असतं हे जाणवत होतं.

आपल्याला क्षणोक्षणी judge करणार नाही असं माणूस. "आत्ता तुला असं का वाटतंय?" हे न विचारता जे वाटतंय ते समजून घेईल असं माणूस.
"तू चिंता करू नको. मी आहे!" इतकंच म्हणणारी व्यक्ती.
सगळं ठीक होईल असा विश्वास देणारी सोबत!
दुःखात सर्वात जास्त साथ करणारी व्यक्ती, ते आपलं माणूस.
आपल्या सुखाचा उत्सव साजरा करणारं माणूस.
मोकळा श्वास घेऊ देणारी सोबत.
मोकळं जगू पाहणारी आणि जगू देणारी साथ.

मन जाणणारी व्यक्ती.
हक्काने मनातलं सांगायला भाग पाडणारी व्यक्ती.
भर उन्हात वाऱ्याची झुळूक यावी तशी आल्हाददायक साथ.

फोनवरील शांततेचं एक मिनिट संपलं होतं. एक मिनिटात काय काय घडलं होतं. दोघांचं एक असणं दोघांना एकत्र धरून ठेवत होतं. दोघांना एकमेकांच्या मनातलं कळत होतं. न बोलता नातं अजूनच घट्ट होत होतं.
त्या अश्रूंच्या झरझर झरण्यामध्ये आणि या विचारात झरकन एक मिनिट सरलं.

तो तिच्यासाठी नि ती त्याच्यासाठी झुरत होती.
एकमेकांची आठवण आता थोडी हवंहवंसं छळत होती.

इतकं बोलून आता phone ची battery low होत होती.
पण "लवकरच भेटू सखी" या विश्वासावर दोघांच्या मनाची battery मात्र full charge झाली होती.

- वरुण भागवत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...