Skip to main content

जे नकोय ते बाजूला कर!

A click by: Varun Bhagwat


"सुचत नाहीये."
"काय?"
"काहीच नाही."
"असं का?"
"माहीत नाही."
"मला माहितीये."
"मनकवडा आहेस का?"
"हाहा..."
"हसू नको. उत्तर दे."
"सुचत नाहीये म्हणजे छान किंवा नवं काही सुचत नाहीये. बरोबर?"
"हो."
"कारण तुझं मन बाकी विचारांनी preoccupy झालंय."
"As in?"
"आधीच ज्या गोष्टी पटल्या नाहीत, पण बदलणं तुझ्या हातात नाही त्या विचारांनी अस्वस्थ झालायस. किंवा इतरही demotivating thoughts मनात घोळतायत."
"हं. पण मग करू तरी काय?"



"सोड."
"असं कसं सोड?"
"तू ज्याचा विचार करत आहेस ते केवळ विचार करून बदलेल?"
"नाही."
"तू नुसताच गप्प बसून राहिला आहेस का?"
"नाही. मी try केला काही प्रमाणात जे पटत नाही ते बदलण्याचा. थोडा demotivate झालो तर स्वतःला push करण्याचा."
"आणि?"
"थोडं बदललं."
"Good."
"Good काय? बाकीचं..."
"सगळं कसं मनासारखं होईल?"
"कळतंय मला."
"मग वळत का नाही?"
"कारण काय करावं समजत नाही."
"सोड."
"म्हणजे?"
"Make peace with it."
"काय?
"हो. शक्य होतं ते तू केलंस. बाकी तुझ्या हाताबाहेर आहे. मग जितका चांगला बदल तुझ्या परीने करू शकलास त्याबद्दल आनंदी राहा. नाहीतर कायमच असंतुष्ट राहशील. नाही त्या विचारांनी preoccupy राहशील. नवं सुचणार नाही."



"पण मग मी पळ काढतोय असं वाटतं!"
"मुळीच नाही. पळ काढणारा माणूस हा घाबरून त्या घटनेचा विचारच करत नाही. तू अती- विचार करतोस. मध्य गाठायचा प्रयत्न कर."
"कसा?"
"हे बघ. तू पळपुटा नाहीस. तू झाल्या घटनेला, आल्या परिस्थितीला भिडणारा माणूस आहेस. एकच कर. तुझ्याकडून सारं करून झालं की मग सोडून दे. काही जण विषय सोडून देतात, काही जण पळ काढतात.  मी तुला गोष्टी सोडून द्यायला सांगतोय, पळायला नाही. दोन्ही गोष्टी भिन्न आहेत."
"कशा?"



"सोडून देणं म्हणजे मी म्हणालो तसं to make peace with it. मी पूर्ण प्रयत्न केले. त्यापुढे practically काही करणं शक्य नसेल तर विचार करायचा नाही. नाहीतर मनात गोष्टी धुमसत राहतात. ते बरं नाही. तलवार म्यान करायची नाही. पण अकारण दिशाहीन फिरवायची पण नाही. योग्य वेळ आली की पुन्हा आपलं म्हणणं मांडण्याची संधी येते. धुसफूस करून उपयोग नाही, कारण त्यातून काही साध्य नाही. म्हणणं इतकंच आहे की अकारण न होणाऱ्या गोष्टी imagine करत रक्त जाळत राहणं बरं नाही. विचारांना पटकन बांध घालणं अवघड असतं. ते धावतात अश्वासारखे. ती घोडदौड थांबवायला लगाम आपल्या हाती हवा. वेळीच declutter करता आलं पाहिजे. त्या त्या वेळेला बोलून मोकळं व्हावं. मग नंतर मी हे केलं असतं, ते केलं असतं ही भावना राहत नाही."
"तशी भावना राहिलीच तर?"



"तर मग पुन्हा बोलून पाहायचं. प्रयत्न करायचा. पण डोक्यात ठेवायचं नाही. धुमसत राहिलं की अनेकदा चुकीच्या वेळी ते बाहेर पडण्याची शक्यता असते. यात नेमकी चांगली नाती बिघडण्याची शक्यता असते."
"Mind Declutter करणं, I mean नको त्या गोष्टी मनातून काढून मन ताजं करणं गरजेचं आहे हे पटतंय मला, पण..."


"पण काय?"
"काही नाही."
"विचार येतात."
"ते येणारच."
"कोणते विचार जास्त प्रभाव करतात त्यावर सारं अवलंबून. त्यांना काही प्रमाणात काबूत ठेवणं तसं तर आपल्या हातात नाही, पण म्हटलं तर आपल्याच हातात आहे. कारण त्या विचारांना shape आपणच देऊ शकतो. Try देऊन बघ. हे करण्यात नुकसान नक्की नाहीये म्हणून म्हणतोय. नवे विचार डोक्यात शिरू द्यायचे असतील तर शिळे आणि नकारात्मक विचार, मन आणि डोकं occupy करून टाकणारे नकोसे विचार बाजूला ढकलायला हवे ना! तर तुझी सर्जनशीलता समोर येईल. तुलाही कामात मजा येईल. तू फार sensitive आहेस. Sensitive माणसं लवकर दुखावतात. लवकर स्वतःला त्रास करून घेतात. १०० चांगल्या विचारांवर १ नकोसा विचार भारी पडतो. हो की नाही?"

त्याने होकारार्थी मान डोलावली. त्याला मनोमन पटलं. किंचित हसला. काही काळ तसाच शांत बसला.

- वरुण भागवत

Comments

  1. Very very nice because this thing is happen with me due to which I am deeply relate and now I now what I want to do.

    ReplyDelete
  2. I am your big fan, since i saw you in dnayeshwar mauli.
    Your blogs are too awesome and inspiring!
    I also write articles and poems on my blog readtorefresh7.blogspot.com
    Do visit,and comment if you like.
    All my best wishes to entire team of dnayeshwar mauli.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...