Skip to main content

पांडुरंग आणि Google maps

A click by: Varun Bhagwat 


कधी पाहिलंय का की पांडुरंगाचा टिळा आणि Google maps च्या app चा symbol हा जवळजवळ सारखा आहे. मी निरीक्षण करत बसलो आणि लक्षात आलं की बरोबर. दोघेही अंतिमतः पोहोचण्याचं ठिकाण अर्थात final destination सांगतात. Google map आपल्याला इप्सित स्थळी पोहोचवतो आणि पांडुरंगाचा तो टिळा (नाम) हे दर्शवतो की इथे पोहोचायचय.


Google map रस्ता दाखवतो. पांडुरंग मात्र म्हणतो की रस्ता तुम्ही शोधा. मात्र तिथपर्यंत पोहोचण्याचं गमक मात्र तो सांगतो. प्रत्येकाचे रस्ते भिन्न असतील. मात्र प्रत्येकाच्या रस्त्यात मधे मधे सतत stops लागतील. त्या stops चं नाव असेल कर्म. एका कर्माची रेषा हिरवी तर दुसऱ्याची लाल असेल. हिरवा रंग म्हणजे चांगलं कर्म. लाल म्हणजे कुकर्म. हिरवं कर्म निवडायचं यासाठीची बुध्दी पांडुरंग आपल्याला देतो, ती वापरायचं काम आपलं. नाहीतर लाल रंगाच्या कर्माच्या traffic jam मधे आपण फसतो आणि काही केल्या त्यातून बाहेर पडता येत नाही. Choice आपल्या हातात दिलाय. योग्य निवड करत जात राहायचं.


रस्ता कधी कच्चा असतो, कधी पक्का.

कधी चढ तर कधी उतार.

कधी खड्डे तर कधी एकदम सुबक रस्ता.

कधी सरळ तर कधी वळणावळणाचा रस्ता.

कधी त्रास असेल तर कधी आरामात drive करता येईल.

कधी first gear तर कधी मस्त fifth gear वर जाता येईल. 


कधी डोंगरदऱ्यांचा, हिरवळीचा सहवास असेल. अर्थात सगळं काही अलबेल असेल. तर कधी ओसाड माळरान अर्थात त्रासदायक काळ असेल. .


कधी काही रस्ते आवडतील, काही आवडणार नाहीत. पण प्रवासाचा भाग म्हणून पूर्ण करावे लागतील. हां, पण तिथेही choice मिळताच योग्य choice ची निवड करणं हे driver चं म्हणजेच आपलं कौशल्य. 


कधी आपण रस्त्याचा हात पकडू, कधी तो आपला हात पकडेल, अर्थात कधी आयुष्य आपल्याला नेत राहील, कधी आपण आयुष्याला सांगू, चल आज या दिशेने जाऊ.


ज्याप्रमाणे रस्त्यात कधी गाडी बदलावी लागते त्याप्रमाणे आयुष्यात वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात.

कधी पायी चालावं लागतं त्याप्रमाणे जीवनात खडतर मार्ग अवलंबावा लागतो.


या जगात आपण सारेच मुसाफिर. भटकत असतो. रस्ता असतो. चालत राहतो. हवेसंग डोलत असतो. प्रवास आहे. आनंद घेत असतो. आनंद घेत नाही आहोत असं जाणवत असेल तर क्षणभर थांबून एकदा विचार करायचा आणि स्वतःला विचारायचं की प्रवासात मजा येते आहे ना?


कारण नीट विचार केला की कळतं की इथे destination महत्त्वाचं आहे पण प्रवास जास्त महत्त्वाचा आहे. याचं मुख्य कारण हेच की एकदा destination आलं की story संपेल. शेवटाची घाई कशाला? तो शेवट सुंदर व्हावा यासाठी प्रयत्न नक्कीच करू शकतो.


तेच तर करायचंय. प्रवास उत्तम करायचा आहे. ऊन, सावली, पाऊस, वारा सगळं लागणार आहेच. पण आयुष्याची वारी अथक पूर्ण करायची. तिही शक्य तिथे, शक्य तेव्हा, शक्य तेवढा, शक्य तेवढ्या साऱ्यांना आनंद देत.


कारण माउलींनी म्हटलंच आहे,

अवघाचि संसार सुखाचा करीन |

आनंदें भरीन तिन्ही लोक ||

जाईन गे माये तया पंढरपुरा |

भेटेन माहेरा आपुलिया ||


Destination तर set आहे. प्रवास उत्तम आणि आनंदी करणं आपल्याच हाती.


- वरुण भागवत


Comments

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...