Skip to main content

मनातल्या एकलव्याची भरारी...

 

A click by : Varun Bhagwat 


"हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..."

"पण ती निघून जाते. असंच ना?"

"हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली."

"हं..."

"मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?"

"तू मर्जीतील माणूस नव्हतास."

"काय?"

"खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे."

"पण म्हणजे काय?"

"खूप explain करावं लागेल.

"मग कर."

"वेळ आहे?"

"नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो."


"बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला?


जिथून त्या कुत्र्याचा आवाज येत होता त्या दिशेने नकळत साऱ्यांची पावलं पडू लागली. पाहतात तर तो कुत्रा शांत थांबला होता. त्याच्या मुखात मात्र कोणीतरी बाण मारून अशी रचना केली होती की त्याला कोणतीच इजा झाली नव्हती परंतु आत्ता तरी तो भुंकू शकत नव्हता. शोध घेताच द्रोणाचार्यांच्या शिष्यांपैकी एकाला तिथेच जवळ एक धनुर्धारी दिसला. विचारताच कळलं की तो एकलव्य होता.


एकलव्य पुढे आला. द्रोणाचार्यांकडे पाहत म्हणाला, "गुरूंचं दर्शन घडलं. धन्य झालो."

द्रोणाचार्य उद्गारले, "गुरू?"

एकलव्याने द्रोणाचार्यांना तयार केलेला त्यांचा मृत्तिकेचा पुतळा दाखवला. पुढे आनंदाने म्हणाला, "तुम्हीच माझे गुरू आहात. मी तुमच्याकडे शिकण्याच्या आशेने आलो होतो. तुम्ही नकार दिलात. पण मी मात्र माझा गुरू बदलला नाही. या पुतळ्याच्या रूपात तो मला दिशा दर्शवतो."

द्रोण खुश झाले. त्यांनी त्याची पाठ थोपटली. हे पाहणारा अर्जुन मात्र खट्टू झाला.


गुरू द्रोणाचार्यांना बाजूला घेत अर्जुन म्हणाला, "सर्वश्रेष्ठ धनुर्धर मीच होणार असं वचन तुम्ही मला दिलंय. पण हा तर माझ्यापेक्षा उत्तम कामगिरी करताना दिसतोय. काहीतरी करा गुरूवर्य."


द्रोण थोडा विचार करत एकलव्यापाशी आले. त्यांनी त्याला सुचवलं, "मला गुरू मानतोस तर मग मला गुरुदक्षिणा काय देशील?"

"आपण सांगा."

"गुरूदक्षिणा म्हणून तुझा उजव्या हाताचा अंगठा मला दे."


एकलव्याला धक्का बसला. पण लगेच सावरत तो म्हणाला, "म्हणजे शिष्य म्हणून आपण मला स्वीकारलं तर? मग तर हा जीव तुमच्या चरणी अर्पण!"


क्षणाचाही विलंब न करता त्याने मागितलेली गुरुदक्षिणा दिली. आता तो यापुढे कधीही धनुष्य चालवू शकणार नव्हता. आणि त्याच वेळी पुढे अर्जुन मोठा धनुर्धर झाला हे तू जाणतोसच."


"या साऱ्याचं मला नोकरीवरून काढण्याशी काय connection?"

"अरे, आपल्या office मध्ये असंच काहीसं घडलं."

"कसं?"

"तू लवकरच तुझ्या talent वर manager होणार होतास;

पण manager होण्याच्या race मध्ये कोणीतरी आधीपासून होतं. खरं पाहायला गेलं तर ती race नव्हतीच. तो 'कोणीतरी' जो होता, तोच manager होणार हे ठरलं होतं असंच म्हण."

"विजय?"

"हो."

"तो talented आहेच की."

"अर्जुन talented होताच की. तसा तू पण talented आहेस एकलव्यासारखा. विजय चे Godfather म्हणजेच Mr. शर्मा हे company च्या board of directors मध्ये आहेत."

"मग?"

"विजय हा त्यांच्या मर्जीतील माणूस, ज्याला त्यांनी promise पण केलं होतं की या वर्षी तूच manager होशील."

"Oh!"


"या साऱ्यात तुझा हकनाक बळी गेला इतकंच. तू कोणाचा कोणी नाहीस. म्हणजेच तुझे हितसंबंध नाहीत. तू कोणाच्या मर्जीतला नाहीस. त्यामुळे तुझा एकलव्य झाला.

"हं.."


"पण तू धनुष्याला बाण लावू शकतोस. इथल्या महाभारतात Mr. शर्मा तुझे मानलेले गुरू पण नाहीत. So, तुला अंगठा द्यायची गरज नाही. महाभारतातील बिचारा एकलव्य मात्र त्यात अडकला. तू अडकू नकोस."

"पण मी आता काय करू?"

"पंख पसरून भरारी घे. खऱ्या talent ला मरण नाही. लक्षात घे. असे विचार जिथे आहेत, जिथे talent पेक्षा हितसंबंध महत्त्वाचे आहेत, तिथे growth ही तशीच होईल. I mean खऱ्या अर्थाने growth होणारच नाही. तू मोकळा राहा. तुझे पंख कोणी छाटू शकत नाही. तू खुल्या आसमंतात भरारी घे."


- वरुण भागवत


Comments

  1. खूप खुप छान .... किती छान motivate करता तुम्ही

    ReplyDelete
  2. एखाद्या खचलेल्या मनाला उभारी मिळेल.इतकं छान आणि खऱ्या आयुष्यात होणारी गोष्ट लिहली तुम्ही.

    ReplyDelete
  3. खुप छान वरुण
    यावरून चार ओळी आठवल्या
    "हौसले पंखोमे भरलो उंची उडाने पार करलो, पंखोमे बल है ये पहले समजो उंची उडाने पार करलो..."

    ReplyDelete
  4. भारी लिहिलाय 👏🏻

    ReplyDelete
  5. तुम्ही साकारत असलेली भूमिका मनात घर करून आहेच माऊली...विचार सुधा इतका संपन्न पाहून जाणीव होते की खरंच माऊलींचा आशीर्वाद आहे तुमच्या सोबत.🌸🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...