Skip to main content

मिटता काजळी, दीप उजळी!

 

A click by : Varun Bhagwat 

मशाल जळत होती. त्यातून निर्माण होणारी आग केसरी, गडद पिवळा रंग झळकवत होती. त्या आगीतून तयार होणारी आभा त्याच्या मुखावर पसरली. मुखावर तेज दिसू लागलं. आजूबाजूला मिट्ट काळोख. केवळ चेहऱ्यावर आगीची आभा, त्यामुळे येणारं तेज, आणि शांत उभा असलेला तो! 

अंधारात असणाऱ्या कोणासाठीही एक प्रोत्साहन होतं ते चित्र! इतका मिट्ट काळोख आयुष्यात निर्माण झाला तरी इवलासा प्रकाश तमाचा अंत करू शकतो.

"पिछे मेरे अंधेरा, आगे आँधी आँधी हैं, मैंने ऐसी आँधी में दिया जलाया है|" या गुलजार जींच्या ओळी तंतोतंत तिथे बसल्या.
ते चित्र प्रेरणा देत होतं की कितीही नकारात्मकता असली तरी एक छोटी ज्योत सारं काही उजळून टाकते.

आग ही खरंतर विध्वंस करणारी गोष्ट देखील आहे. परंतु हाच अग्नी पंच महाभूतांपैकी एक आहे. It's a source of energy.
तिमिरातून तेजाकडे जाताना हा अग्नी मदत करेल. मनात हा अग्नी सतत प्रदीप्त असायला हवा. तोच ऊर्जा देतो.
मशाल तर खूप जास्त प्रकाश देते. पण एक छोटी पणती सुद्धा तिचा परिसर समृद्ध करते. आपण आपल्या परीने पणती होऊ शकतो, मशाल होऊ शकतो. इतक्याशा प्रकाशाने काय होणार? असा self doubt असतोच. पण प्रकाश नसण्यापेक्षा थोडा प्रकाश असणं अधिक महत्त्वाचं.

आपल्यात प्रकाश असतोच. पण आपल्याला कळत नाही. कारण त्यावर काजळी बसलेली असते. ती दूर करणं आपल्याच हाती असतं. दीप उजळण्यासाठी काजळी काढणं महत्त्वाचं.
ही काजळी कधी नकारात्मकतेची असते.
कधी कंटाळ्याची असते.
कधी अविश्वासाची असते.
कधी न मिळालेल्या प्रोत्साहनाची असते.
कधी दुर्लक्षित कौशल्याची असते.
कधी आळसाची असते.
कधी द्वेषाची असते.
कधी भीतीची असते.

मग काय करायचं? प्रत्येक वेळी कोण सहाय्याला येईल? आपणच आपल्या हाताने ती काजळी काढायला सुरुवात करायची.  कधी कधी जळत असणारा दिवाही या काजळीमुळेच हवा तितका प्रकाश देत नाही. कारण काजळी काढलेली नसते. थोडे कष्ट पडतात. पण जमतं. म्हणजेच काय तर स्वयंप्रेरणेने ती काजळी दूर करायची.

मी अविवेकाची काजळी,
फेडोनि विवेकदीप उजळी|
ते योगिया पाहे दिवाळी,
निरंतर|
- ज्ञानेश्वर माऊली

ते चित्र हेच दर्शवत होतं. तेजाने झळकणारा चेहरा डोळ्यातून बोलत होता. ती आग डोळ्यातही होती. निरखून पाहिलं. लक्षात आलं की मशाल दूर आहे. हातात एक पणती आहे. ती  काजळी नसलेली पणती केवढा प्रकाश देत होती.  प्रत्येकामध्ये प्रकाश निर्माण करण्याचं, किमान आजूबाजूचा परिसर आपल्या ज्ञानरूपी प्रकाशाने समृद्ध करण्याचं सामर्थ्य आहे, हेच जणू ते चित्र, त्यातील छोटीशी पणती आणि ते तेजःपुंज मुख सांगत होते.

- वरुण भागवत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...