ते दोघे तलावाकाठी शांत बसले होते. तिने विचारलं, "भाजी कोणती करू?" तो म्हणाला, "इतक्या रम्य ठिकाणी येऊन भाजीचा प्रश्न?" ती त्याला हलकेच फटका देत म्हणाली, "गप रे. असतात असे प्रश्न." "तुला हवी ती किंवा कंटाळा आला असेल तर जेवायला बाहेर जाऊ." स्वतःच्या मनाने काही सहजपणे करण्याची सवय घालवून बसलेली ती त्याच्याकडे पाहत बसली. कागदाची होडी करण्यासाठी पर्स मधला कागद घेत ती म्हणाली, "होडी कशी करू?" "तुला हवी तशी." तो सहज म्हणाला. "एवढं स्वातंत्र्य?" तिने प्रश्न केला. तो आश्चर्याने म्हणाला, "हो. का? काय झालं? भाजी आणि होडी करण्यात काय विचारायचं?" ती खाली पाहत म्हणाली, "सवय नाही." तो तिच्याकडे लक्ष देऊन म्हणाला, "कसली?" "आधीच्या relation मध्ये कसलंच स्वातंत्र्य नव्हतं. श्वास पण त्याच्याच मर्जीने घ्यायचा राहिला होता फक्त. Confidence च गेला. म्हणून अत्यंत silly गोष्टीसाठी पण permission घेऊ लागले. ती गोष्ट त्याचा ego सुखावू लागली. त्यातून नशिबाने बाहेर पडले. पण तो असा म्हणजे सगळे असे असतील असा समज ...
जे माझ्या मनात आहे तेच अनेकदा आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतं. तेच शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न. कधी कोणती कथा, तर कधी कोणता किस्सा... कधी मनातली कविता तर कधी मनातली संहिता...