A click by: Sushil Ladkat Guest Lecturer म्हणून आज शाळेमध्ये ‘अक्षर’ नावाचा लेखक आला होता. तो वर्गात गोष्ट सांगत होता, “श्याम अगदी लहान होता. आईने श्यामला अंघोळ घातली. अंघोळ घातल्यानंतर आई त्याचे अंग पुसत होती. श्याम आईला म्हणाला , " आई , माझे पायाचे तळवे ओले आहेत. ते पुसून दे नाहीतर त्याला माती लागेल आणि ते घाण होतील.” आई त्या वेळी काहीच बोलली नाही. तिने त्याचे तळवे पुसून दिले , पण त्यानंतर जे वाक्य ती म्हणाली ते माझ्या काय , ज्यांनी ज्यांनी श्यामची आई हे पुस्तक वाचलं आहे किंवा श्यामची आई हा चित्रपट बघितला आहे त्यांच्या डोक्यातून , खरंतर मनातून, हो मनातून कधीच जाणार नाही. कारण वाक्यच काहीसं तसं होतं. तळवे पुसून झाल्यावर आई श्यामला म्हणाली , " पायाला घाण लागू नये म्हणून काळजी घेतोस तसाच ' मनाला ' घाण लागू नये म्हणून पण काळजी घे हो." किती सहज म्हणून गेलेलं पण केवढं महत्त्वाचं वाक्य आहे. ' श्यामची आई ' अर्थात साने गुरुजींची आई ही कित्येक आयांचं प्रतिनिधित्व करते असं म्हणायला हरकत नाही. आई साध्या गोष्टी सांगता सांगता किती सहज केवढं मोठं तत्त्...
जे माझ्या मनात आहे तेच अनेकदा आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतं. तेच शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न. कधी कोणती कथा, तर कधी कोणता किस्सा... कधी मनातली कविता तर कधी मनातली संहिता...