Skip to main content

आई फक्त प्रेम जाणते!


A click by: Sushil Ladkat

Guest Lecturer म्हणून आज शाळेमध्ये ‘अक्षर’ नावाचा लेखक आला होता. तो वर्गात गोष्ट सांगत होता, “श्याम अगदी लहान होता. आईने श्यामला अंघोळ घातली. अंघोळ घातल्यानंतर आई त्याचे अंग पुसत होती. श्याम आईला म्हणाला, "आई, माझे पायाचे तळवे ओले आहेत. ते पुसून दे नाहीतर त्याला माती लागेल आणि ते घाण होतील.” आई त्या वेळी काहीच बोलली नाही. तिने त्याचे तळवे पुसून दिले, पण त्यानंतर जे वाक्य ती म्हणाली  ते माझ्या काय, ज्यांनी ज्यांनी श्यामची आई हे पुस्तक वाचलं आहे किंवा श्यामची आई हा चित्रपट बघितला आहे त्यांच्या डोक्यातून, खरंतर मनातून, हो मनातून कधीच जाणार नाही. कारण वाक्यच काहीसं तसं होतं.

 

तळवे पुसून झाल्यावर आई श्यामला म्हणाली, "पायाला घाण लागू नये म्हणून काळजी घेतोस तसाच 'मनाला' घाण लागू नये म्हणून पण काळजी घे हो." किती सहज म्हणून गेलेलं पण केवढं महत्त्वाचं वाक्य आहे.

 

'श्यामची आई' अर्थात साने गुरुजींची आई ही कित्येक आयांचं प्रतिनिधित्व करते असं म्हणायला हरकत नाही. आई साध्या गोष्टी सांगता सांगता किती सहज केवढं मोठं तत्त्वज्ञान सांगून जाते. किती गोष्टी अनेकदा न बोलता, कधी बोलून, कधी ओरडून, कधी गोड बोलून तर कधी दटावून सांगून जाते.” 

 

 

Lecture संपलं. अक्षर जाऊ लागला. शाळेतला एक विद्यार्थी staff room पर्यंत त्याच्या मागे मागे जात होता. अक्षरला चाहूल लागली की कोणीतरी आपल्या मागे येतंय.

तो थबकला. त्याने वळून पाहिलं तर थोडासा बुजरा मुलगा हातात वही आणि पेन घेऊन उभा होता. अक्षरने खुणेनेच काय म्हणून विचारलं?

 

तो मुलगा बोलू लागला, “सर, तुम्ही आईबद्दल जे लिहिलं आहे, ते मध्ये एकदा तुम्ही आलात तेव्हा ऐकवलं होतं. त्यातला थोडा भाग तुमच्या तोंडून परत ऐकायला आवडेल.”

“अरे, ते मी...” अक्षर आढेवेढे घेऊ लागलाय हे कळताच मुलगा थोडा हिरमुसला. तोच हा संवाद ऐकणारे पवार सर अक्षरला म्हणाले, “अक्षरजी, please ऐकवा.”

अक्षर घाईत होता पण सर असं म्हणल्यावर तो बोलू लागला,   
मी रडल्यावर आई मला हसली होती असं ताईने नकळत्या वयात सांगितलं तेव्हा बालसुलभ राग आला होता.
मोठं झाल्यावर कळलं की माझ्या रडण्यावर आई आजपर्यंत एकदाच हसली आणि ते हसू मी जन्माला आल्याच्या आनंदाचं होतं.
मग अगदी कुशीत घेऊन झोपवलं.. कौतुकाने गालावरून हात फिरवला नि चुकल्यावर तोच गाल रंगवला सुद्धा!
त्या गोंजारण्याची आणि रंगवण्याची मजा नि किंमत आता कळतीये.

माझ्या यशात हक्काने स्वतःचं यश शोधत नाचली पण अपयशात माझ्यासोबत न रडता मला प्रोत्साहन देत माझ्या सोबत उभी राहिली. अपयश आल्याशिवाय यशाची मजा कशी कळणार? हे एक वाक्य पुरेसं होतं.
ते म्हणतात ना , "a blessing in disguise" अर्थात वाईटातून चांगलं बघायला शिकवलं.
बघण्यावरून आठवलं, आईने जग बघायला शिकवलं.
धडपडायला (धड पडायला) शिकवलं.

आई कशी असते?
माझ्यासाठी हसते।
माझ्यासाठी रडते।
माझ्यासाठी करते।
माझ्यासाठी झुरते।
सुरवातीला माझ्यासाठी तिच सगळं जग असते।
मग मी मोठा होतो नि ती तिचं जग माझ्यात शोधते।



माझ्या यशाचा सर्वोच्च क्षण पाहायला ती तिथे असते पण तिला तो बघता येत नाही.
कारण डोळे भरून आणि भरल्या डोळ्यांनी एकाच वेळी कोणती गोष्ट पाहता येत नाही.

हे सगळं खरं तर सांगायची गरज नाही.
पण कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय राहवत नाही.

कुठून येते इतकी माया..?
कुठून येतो इतका त्याग?
कुठून येतं इतकं प्रेम?
कुठून येते इतकी करुणा?
हे प्रश्न जितके सहज पडतात तितकी उत्तरं सहज मिळत नाहीत.
कारण आईचं आईपण काय असतं हे आई झाल्याशिवाय आईशप्पथ समजत नाही.

 

अक्षर थांबला. त्या विद्यार्थ्याने टाळ्या पिटल्या. डोळ्यांत चमक होती, तो thank you म्हणून जाऊ लागला. अक्षरला गंमत वाटली. तो पवार सरांना म्हणाला, “सर हा?”

सर सांगू लागले, “हा अर्पण. तुम्ही घाईत होतात तरी त्याला हे म्हणून दाखवलं त्याबद्दल धन्यवाद.”

“सर आभार कसले मानताय?”

“तसं नाही. मागच्या वेळेला पण याने हाच भाग तुम्हाला म्हणून दाखवायला लावला होता आणि आजही पुन्हा तेच. तुम्हाला कदाचित वाटेल की हे काय असं? पण खरी गोष्ट अशी की आईबद्दल जिथे जिथे, जसं जसं आणि जे जे ऐकायला मिळेल ते तो ऐकतो आणि त्याच्या वहीत नोंदवून ठेवतो.”

“असं का?”

“कारण त्याला आई नाही. अक्षरजी, कसंय, आईची सर्वात जास्त किंमत ती नसल्याशिवाय कळत नाही. मागच्या वेळी जेव्हा त्याने तुमच्या या कवितेत रस घेतला होता त्याच वेळी त्याला आई नाही ही history मला समजली. हे समजलं तेव्हा मी त्याला घरी नेलं होतं आणि माझ्या आईची..”

 

तोच धावत धावत अर्पण आला. पवार सरांना म्हणाला, “सर तुम्ही मागच्या वेळी मला घरी नेलं आणि आईसोबत पूर्ण दिवस घालवू दिलात. मी मुद्दाम तुमची आई म्हणालो नाही, कारण त्या एक दिवसाच्या सहवासात ती माझी आई झाली आणि तुम्हीही मला दोस्त म्हणालात. म्हणून मी अक्षर सरांना त्यांचा लेख/ कविता पुन्हा ऐकवायला लावली कारण त्यात मला थोडं add करायचं आहे.”

“काय?”

“ती जेव्हा आई होते तेव्हा माझ्यासोबत माझ्या मित्रांचीही आई होते आणि फक्त आपल्या पोटी जन्माला आला म्हणून प्रेम करायचं हे विधान चुकीचं ठरवते. कारण आई फक्त प्रेम जाणते.”

 

अर्पण हे वाक्य बोलून दोघांना thank you म्हणून निघूनही गेला होता. सर आणि अक्षर नि:शब्द होते.

-    - वरुण भागवत

 

  


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...