A click by: Sushil Ladkat दिनेश तणतणत घरातून बाहेर आला. त्याचा भाऊ जयेश जवळजवळ त्याला जबरदस्तीच बाहेर घेऊन आला होता. अजूनही दिनेशचा राग काही शांत होत नव्हता. "अती होतंय हे!" दिनेश तिरिमिरीत म्हणाला. "काहीच अती झालं नाहीये." "अरे काय आहे हे? आत्ता वाटलं होतं की माझा पोरगा आता हाताशी आला आहे. पण ह्याला कशाची फिकीरच नाही." "आज असं काय झालं की तू इतका भडकलास?" "अरे पोरीसोबत पाहिलं मी ह्याला." जयेश म्हणाला, "एवढंच ना?" "एवढंच काय?" "आपण नाही केलं का त्याच्या वयात असताना सगळं?" "हो केलं पण..." "ऐक... मला कळतंय की या सोबतच त्याला परिस्थितीची जाणीव असावी." "कळतंय ना?" "अर्थात!" "मग मला आत्ता काहीच का बोलू दिलं नाहीस?" "आत्ता पाणी फार गढूळ झालंय रे. नंतर बोलू त्याला आपण." "कसलं पाणी जयेश दादा?" "चल जरा एक चक्कर मारून येऊ." दोघे शांत रस्त्यावर पायीच फेरी मारत होते. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. दिनेश स्वतःहूनच काहीतरी आठवत म्हणाला, ...
जे माझ्या मनात आहे तेच अनेकदा आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतं. तेच शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न. कधी कोणती कथा, तर कधी कोणता किस्सा... कधी मनातली कविता तर कधी मनातली संहिता...