| A Click By: Sushil Ladkat |
"गरम स्टोव्ह च्या धगी जवळ १ मिनिट जरी हात ठेवला तरी तो तासभर ठेवल्यासारखा वाटतो. हेच जर का आवडणाऱ्या मुलीसोबत एक तास घालवला तर मात्र एका मिनिटा इतकाच वाटतो." आईनस्टाईन ची रिलेटीविटी हीच की काय? हा वाचनात आलेला किस्सा.
पण यातून जाणवलेली एक महत्वाची गोष्ट म्हणजे
वेळेचं गणित खरोखरीच असं असतं. आवडत्या
कामात आपण वेळेचा track पूर्णपणे विसरून जातो. ज्या
दुपारी आपण आपल्या आवडीचं पुस्तक वाचतो त्या वेळी आपल्या लक्षातही येत नाही की
दुपार कशी निघून गेली. हीच दुपार काही मनाजोगतं काम नसेल तर उदास, भकास, रखरखीत वाटते. म्हणजेच
काय प्रवाहात वाहता आलं पाहिजे. (प्रवाहाविरुद्ध
पोहण्याचा इथे काही संबंध नाही.)
म्हणण्याचा अर्थ असा की आपल्याला आपल्या कामात
झोकून देता आलं पाहिजे. फालतू गोष्टींनी आपली एकाग्रता हलता कामा नये. नाहीतर आपण कामाला सुद्धा न्याय देऊ शकत नाही नि वेळेला सुद्धा!
वेळेचा दुरुपयोग सहज होतो, काहीच
न करता. पण सदुपयोग
करण्यासाठी planning लागतं. एका
वेळी अनेक काम करत सगळ्या कामांचा बट्ट्याबोळ करण्या ऐवजी एका वेळी एक काम तडीस
नेत ठरलेल्या वेळेत ठरवलेली आणि ऐनवेळी येणारी कामं पूर्ण करणे.
थोडक्यात काय तर आपण जे काम करतोय ते काम
इतक्या तन्मयतेने व्हावं की वेळेचं भान राहू नये.
(चांगल्या अर्थाने). निष्कर्षातून
सिद्ध झालेली गोष्ट असंच सांगते की एका वेळी एक काम एकाग्र चित्ताने केलं तर
त्याचे results जास्त उत्तम येतात. इथे
आपल्याकडची फार सुंदर म्हण लागू पडते ती म्हणजे ‘एक
ना धड नि भाराभर चिंध्या!’ हे असं
होता कामा नये.
वेळ वाहत असते. कधी
slow तर कधी fast. slow आणि
fast हा झाला आपला दृष्टीकोन. स्टोव्ह
आणि आवडणारी मुलगी. कधी मिनिट तासासारखं तर कधी तास मिनिटाहून कमी. खरं पाहिलं तर वेळेची गती तीच असते. आपली
गती आपण ठरवली पाहिजे.
वेळ प्रवाही आहे. आपल्याला
त्यासोबत वाहता आलं पाहिजे; मात्र
वाहवत जाणं बरं नाही. बऱ्याचदा तेच होतं. मला
article लिहायचं असतं. मग
त्या दृष्टीने research करण्यासाठी मी थोडी google
ची मदत घेतो. म्हणजेच
मी इंटरनेट चालू करतो. यात मग research करता
करता बाकी अनेक गोष्टी मला distract करायला
ready च असतात. मी
तिकडे किती बघतो आणि माझ्या research वर
किती एकाग्र राहतो यावर माझ्या article चं
पूर्ण होणं (नुसतं पूर्ण नाही, ते
प्रवाही वाटणं) अवलंबून असतं. गोष्टी
प्रवाही असतील तर त्याला एक ताल,
सूर आणि लय प्राप्त होते. आपल्याला स्वतःला ते करताना मजा येते.
पण या सगळ्या झाल्या ideal
conditions. ही लय कायम मिळेलच असं नाही. वेळेचं
महत्त्व तेव्हा कळतं जेव्हा आपली स्वतःची किंवा स्वतःला हवी असणारी वेळ कोणीतरी
हिरावून घेतं. याचं मुख्य कारण म्हणजे unavoidable
tasks. ज्याचं आपण काहीच करू शकत नाही. ते tasks संपवून पुन्हा अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करणं हे खरं मग challenge. पण इथेसुद्धा कुठे पोहोचायचं आहे हे clear
असेल तर मग पुन्हा flow मध्ये
शिरता येतं.
| A click by: Sushil Ladkat |
पाण्यासारखं प्रवाही बनता आलं पाहिजे.
नदीसुद्धा आलेले अडथळे पार करत पुन्हा मुख्य
प्रवाहाला लागतेच की. तेच तर करायचं आहे. स्वतःला
झोकून देऊन काम करता आलं पाहिजे म्हणजेच प्रवाहात रमता आलं पाहिजे. रमता आलं तर मग स्टोव्ह वर हात ठेवायची वेळ कमी वेळा येईल आणि मिनिट
तासासारखं वाटणार नाही. प्रत्येक काम सुंदर वाटेल आवडणाऱ्या मुलीसारखं आणि
कामात रममाण झालं की मग कितीही वेळ एक मिनिटाइतकाच कमी वाटेल.
relativity च्या theory सारखा... अर्थात
energy कायम high राहील
आणि वाहत राहता येईल.
वरुण भागवत
Comments
Post a Comment