![]() |
| A Click by: Sushil Ladkat |
माणसाला दिवसभर थकल्यानंतर गरज असते शांततेची. अनेकदा ही हवी असणारी शांतता
त्याच्या नशिबी असतेच असं नाही. कधी कधी थोडीशी संधी मिळते पण नेमकं काही ना
काहीतरी घडतं आणि शांतता भंग पावते. मात्र ही हवी असणारी शांतता नक्की शोधावी.
प्रत्येकाने शोधावी. अनेकांना त्याची गरज जाणवत नाही पण ती गरजेची असते हे ती अनुभवल्यावर
कळतं.
या शांततेतून मिळतं तरी काय? मिळतो तो
स्वतःसाठी गरजेचा असणारा पण आजकालच्या धकाधकीत माणूस स्वतःलाच न देऊ शकणारा वेळ. रोजची चाललेली धावपळ कशासाठी हे पुनःश्च एकदा
चाचपून पाहण्याची संधी ही शांतता देते. शांतता आपल्याला आपल्या passion कडे नेते.
रोजमर्रा च्या आपल्या आयुष्यात आपण अनेकदा आपली passion च विसरून जातो. या शांततेत
एक chance असतो त्या passion ला शोधण्याचा. ज्यांनी शोधली आहे त्यांना ती
जगण्याचा.
बाकी सगळं राहू दे बाजूला. ही शांतता किमान
आपल्या थकल्या जीवाला थोडी शांती देऊन नव्या दिवसासाठी ताजतवानं तरी करते. हिला कमी लेखता कामा नये. ही आपल्याला थोडसं
busy जगातून unbusy व्हायला शिकवते. Unbusy व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं? आता
उत्तर असं पण आहे की प्रत्येक वेळी काही केलंच पाहिजे का? काही न करणं सुद्धा जमलं
पाहिजे. म्हणजे काय लगेच आपण निष्क्रिय झालो असं होत नाही. असा guilty भाव अनेकांमध्ये
येण्याची शक्यता असते. पण असं मुळीच नसतं.
स्वतःला पुन्हा ऊर्जा मिळवून देण्यासाठी थोडसं
switch off होणं गरजेचं असतं. कितीतरी वेळा आपण आपली electronic devices hang होऊ
लागली की त्यांना switch off आणि switch on करतो. बरं आपण तर machine पण नाही.
हाडामासाची माणसं आहोत. मग या शरीराला आणि मनाला इतकं थकवल्यावर थोडं थांबावं.
नाहीतर वेगाने धावणाऱ्या दुनियेत थकून आपलाच speed कमी व्हायचा.... धावायचं आहे. पण थोडं थांबून...
आपल्या आयुष्यातील शांततेच्या महत्त्वाला कमी
लेखून चालणार नाही. Chaos आपल्याला काही सुचू देत नाही.
नवं काही सुचू द्यायचं असेल तर शांतता हवी.
नव्याने स्वतःला पाहायचं असेल तरी शांतता हवी.
जोरात धावायचं असले तरी क्षणभर विश्रांती हवी.
जीवाला घटकाभर शांती हवी.
- वरुण भागवत

खर आहे. खूप छान लिहिलंय
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteI live by this, like literally. Awesome write up! Totally relatable!
ReplyDeleteYes. Thank you very much!! 😊
DeleteOk, very good.
ReplyDeleteThanks!!
ReplyDeleteYes...
ReplyDeleteKhup sundar aani correct Aahe he....
🙋👌👍