Skip to main content

असाही एक शिक्षक!

 

A click by: Sushil Ladkat


योगेश त्याच्या ठरलेल्या इराणी हॉटेलात चहा घेत होता. सुभाष, त्याचा जुना मित्र सुटाबुटात car park करत होता. योगेशने ते पाहिलं आणि शिळ घालून सुभाषला आवाज दिला. अचानक आलेली ही शिट्टी ऐकून सुभाषच काय पण अनेक जण योगेशकडे बघू लागले. योगेशच्या टेबलपाशी सुभाष आला. योगेश म्हणाला,  “दोस्ता, किती दिवसांनी भेटलास.” सुभाषचा mood खास दिसत नव्हता. योगेशने चेहऱ्यावरचे भाव टिपत विचारलं, “काय रे काय झालं? ठीक आहेस ना? कुठे निघालास सुटाबुटात?” सुभाष वैतागत म्हणाला, “जीव द्यायला!” योगेश यावर दिलखुलास हसत म्हणाला, “आधी चहा घेऊ... नंतर जीव दे.” सुभाष ते टाळण्याचा प्रयत्न करत होता. पण योगेशच्या उत्साहाने त्याला त्याच्यासोबत चहा घ्यायला भाग पाडलं.


इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर योगेश म्हणाला, “भाऊ, तू तर मोठा माणूस झालास की... car मधून कामाला जातोस की काय रोज?” सुभाषला हे  खूप normal आहे असं वाटलं आणि तो ते तोडत म्हणाला, “इथे लागलीये माझ्या आयुष्याची. किती दिवस तीच car वापरायची. माझी प्रगतीच खुंटली आहे असं वाटतंय आता तर मला. रोज नैराश्य येतंय. माझ्यासोबतचे लोक किती पुढे गेलेत आणि मी आहे तिथेच आहे.” योगेश म्हणाला, “अच्छा, असं आहे तर. पण मी सुद्धा तुझ्यासोबतच होतो शाळेमध्ये. माझ्याकडे तर car नाही आहे अजून. चला, तू माझ्या पुढे तर आहेस.” सुभाष एकदम सावरत म्हणाला, “अरे, मला तसं नव्हतं म्हणायचं. तू वाईट वाटून घेऊ नकोस.”


योगेश हसत म्हणाला, “मला माझ्याबद्दल वाईट नाही वाटत. मला तुझ्याबद्दल वाईट वाटतंय. अरे लेका, सगळं असून तू  काही नसल्यासारखं दाखवतो आहेस.”

सुभाष म्हणाला, “मी समजलो नाही.”

“कारण बाईंनी शिकवलेलं तू apply केलं नाहीस.”

“What do you mean?”

“आपल्या मराठी शिकवणाऱ्या बाई बोलता बोलता म्हणाल्या होत्या की car चालवणाऱ्याने कायम bike चालवणाऱ्याकडे बघावं. ज्याच्याकडे bike आहे त्याने सायकल असणाऱ्याकडे बघावं. सायकल असणाऱ्याने पादचाऱ्याकडे पाहावं.

“आणि असं केल्याने काय होतं?”

“जाणीव होते.”

“कसली?”

“आपल्यापेक्षाही कष्टी माणसं या जगात आहेत याची.”

“इथे सुद्धा comparison आलीच की.”

“आता तुला तुझ्याच भाषेत समजावून सांगायचं म्हणून मी हे उदाहरण दिलं.”


यावर सुभाषने काहीच भाष्य केलं नाही. पण deep down, त्याला कुठेतरी हे पटत होतं.


योगेश बोलू लागला, “हे बघ, मला माझ्या परिस्थितीमुळे दहावीनंतर फार शिकता आलं नाही. तुझ्या comparison च्या हिशोबाप्रमाणे माझ्यापुढे सुद्धा खूप जण गेले.”

“माझ्या हिशोबाप्रमाणे म्हणजे? तुला नाही वाटत कोणाच्या पुढे जावं?”

“गेलो की मी तुझ्या पुढे.”

“काय?”

“बघ तुझा चहा थंड झाला. माझा केव्हाच संपला. गेलो की नाही पुढे?”

योगेश दिलखुलास हसला आणि म्हणाला, “बरं जीव द्यायचा काय plan केला आहेस?”

“गप रे.”

“नाही तसं नाही. जीव द्यायचं confirmed असेल तर ही car माझ्या नावावर करून टाक.” असं म्हणत योगेश मिश्कील हसला.

सुभाषच्या पण चेहऱ्यावर जरा प्रसन्नता आली आणि तो पटकन म्हणाला, “आयुष्याचा रस असा कोळून प्यायल्यासारखा अनुभव तुझ्या गाठीशी आला तरी कुठून?

योगेश विषय बदलत म्हणाला, “और एक चाय?”

सुभाष म्हणाला, “अरे, अजून एक काय?”

“घे रे. आधी चहा घे. नंतर जीव दे.”

“अरे ते असंच म्हणालो होतो मी. वैतागलो होतो.” सुभाष हसत म्हणाला.

Mood गेलेल्या सुभाषचा चेहरा योगेशच्या प्रभावामुळे खूप खुलला.  


पुन्हा एक एक चहा मागवला गेला. आत्ताही योगेशने तो आधी संपवला. “पुन्हा मीच पुढे गेलो.” असं म्हणून सुभाषला खिजवत योगेश टेबल जवळ ठेवलेल्या कुबड्यांच्या सहाय्याने उठला. योगेशला एक पाय नव्हता.


सुभाष मनाशीच बोलला, “इतका वेळ आपण आपल्यात इतके गुरफटलो की समोरचा किती कष्टी असू शकतो याची आपल्याला जाणीवच नव्हती. बाईंची गोष्ट योगेशने अर्धीच सांगितली होती. सायकल असणाऱ्याने पादचाऱ्या कडे अर्थात चालणाऱ्याकडे पाहावं. इथून पुढचं असं आहे की जो चालतो आहे त्याने अपंग माणसाकडे पाहावं. पण हा अपंग नाहीच आहे. हा तर आयुष्याचा रस कोळून प्यायलेला आणि मला जीवनरस अनुभवायला शिकवणारा माझ्या आयुष्यातला महत्त्वाच्या वळणावर भेटलेला शिक्षकच आहे.”

 

A click by: Sushil Ladkat

-       वरुण भागवत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...