![]() |
| A click by: Sushil Ladkat |
- नाही नाही, मला नाही पटत आहे हे असं.
- अहो, काय पटत नाहीये तुम्हाला?
- हे जे तुम्ही सगळ्या दुनियेला involve करत आहात ते!
- आता त्यांना जर आपण याच्या लग्नाबद्दल काही नाही सांगितलं तर वाईट वाटेल ना त्यांना...
- वाटू दे.
- हे काय बोलणं झालं?
- मग मी काय बोलणं अपेक्षित आहे?
- त्यांचं मत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.
- लग्न त्यांचं आहे का आपल्या पोराचं?
- अहो पण....
- मग काय? लग्न त्याचं. त्याने मुलगी पसंत केली, तिला तो पसंत आहे. आपल्यालाही ती पसंत आहे. त्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करणारा हा हेमंत याचा लागतो तरी कोण?
- हे बघा, तुमचे मोठे भाऊ आहेत ते. घराच्या प्रत्येक निर्णयात त्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
- आपण निर्णय घ्यायला सक्षम नाही म्हणून..??
- कदाचित.
- पण अजय आहे.
- .. तो लहान आहे.
- तूच म्हणतेस ना लग्नाचं वय झालंय त्याचं...
- हो..
- तर मग तो लहान नाही आणि मुळात हा जो निर्णय आहे तो त्याच्या आयुष्याचा आहे. इथे तो स्वतंत्र असला पाहिजे. आपणही मध्यस्थी करू नये.
- हे काय आता नवीन?
- तूच वाढदिवसाची भेट म्हणून दिलेलं व.पु. काळेंचं पुस्तक, त्यात लिहिलंय.
- अहो काय लिहिलंय त्यात?
- "आयुष्यात जो अत्यंत महत्वाचा निर्णय असतो,की ज्या निर्णयामुळे सगळ्या भवितव्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे,अशा क्षणी कुणावरही विसंबून रहायचं नाही.आपला बेत फ़सला किंवा कुणीतरी उधळुन लावेल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नाही. निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहीजे."- व.पु.काळे.
यावर आई काहीच बोलली नाही. चर्चा थांबली. आई खोलीत गेली. मग बाबा बाहेर आले. अजयपाशी येऊन बसले.
- काय झालं बाबा?
- काही नाही.
- मग एकदम शांत झालात?
- माहीत नाही.
- thanks dad.
- why?
- माझ्या बाजूने उभे राहिलात.
- मी कोणाच्याच बाजूने नाहीये.
- म्हणजे?
- कारण अरे माझ्या स्वतःच्या लग्नाच्या बाबतीत माझी खूप घाई झाली होती.
- आणि...
- आणि तुला बाकी माहीतच आहे. असा एक दिवस जात नाही जेव्हा आम्ही भांडत नाही.
- निर्णय चुकला असं वाटतं तुम्हाला?
- बरोबर येईल याची guarantee अशी पण कोणी देऊ शकत नाही.
- मग?
- वाईट याचं वाटतं की निर्णय चुकीचा किंवा बरोबर यापेक्षा दुसऱ्याने लादलेला होता. मी निर्णय घेऊन तो चुकला असता तर प्रश्न नव्हता. इतका महत्त्वाचा निर्णय घ्यायला खरोखरीच आपण स्वतंत्र असलो पाहिजे. निर्णय मनापासून असेल तर आयुष्य पण मनापासून जगतो माणूस!!
- वरुण भागवत

Apt! :)
ReplyDeleteThank you!!
DeleteApt! :)
ReplyDeleteVery true.
ReplyDeleteThanks !!
Delete