![]() |
| A click by: Varun Bhagwat |
"काहीतरी वेगळं करायचं म्हणजे वेडं होता आलं पाहिजे."
"वेडं व्हायचं म्हणजे?"
"म्हणजे वेडं व्हायचं."
"नीट सांग."
"वेडी माणसं मोठी होतात."
"पण म्हणजे नक्की काय व्हायचं?"
"तुला कोणी किंवा कशानी झपाटलंय का?"
"नाही. अजून तरी भुताखेतांशी संपर्क आलेला नाही."
"मी गंमत करत नाहीये."
"मी पण खरंच सांगतो आहे."
"एखाद्या गोष्टीमुळे चांगल्या अर्थाने आपण झपाटले गेलो पाहिजे. इंग्रजीमध्ये त्याला Passion असा शब्द आहे. उर्दू भाषेत त्याला 'जुनून' असा वजनदार शब्द आहे."
"पण हे मध्येच वेडं व्हावं असं का वाटलं तुला?"
"माझीच जुनी एक वही चाळत होतो ज्यात मी 'लगान- एका स्वप्नाचा प्रवास' नावाच्या पुस्तकाच्या नोट्स काढल्या आहेत. लगान सिनेमाचा दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, त्याच्यामध्ये हा जुनून होता. वेडं होण्याची क्षमता होती (चांगल्या अर्थाने). त्यामुळेच oscar सारख्या पुरस्काराने हा सिनेमा नामांकित केला गेला. त्याच्या या वेडामुळे एक अजरामर सिनेमा झाला."
"Oh..."
"हे बघ ना मी त्या पुस्तकामधलं हे वाक्य लिहून ठेवलं आहे. हे वाक्य केवढं महत्त्वाचं आहे. 'स्वतःचं समाधान व्हायला हवं; मग जग गेलं चुलीत! असं ठरवलेल्या लेखकामुळेच लगानसारखी कलाकृती निर्माण होऊ शकली'."
"खूप काम करावं लागलं असेल नाही?"
"काम असतंच, पण कोण काय म्हणेल, हे होईल की नाही अशा doubts ना इथे थारा नसतो. ठरवलं की ते होणारच हा विश्वास आधी स्वतःवर हवा. मग त्या दृष्टीने तयारी हवी. कारण नुसताच विश्वास आहे पण प्रयत्न शून्य... अशा माणसाला देव पण मदत करत नाही."
"खरंय. हे असं असतं का वेडं होणं?"
"हं.. शहाणं असणं फार सोपं आहे."
"हे सोपं नाही."
"मुळीच नाही. लगान ही तर फार मोठी कलाकृती झाली. पण कोणतंही काम झोकून देऊन करणं म्हणजेच वेडं होणं. त्या कामात आपलं पूर्ण समर्पण असणं महत्त्वाचं. त्याच वेळी आपण त्या कामाला खरा न्याय देतो."
"हो."
"कसल्या विचारात बुडालास?"
"वेडं होण्याच्या!"
"छान! आपल्यामध्ये जुनून आणि कामात लगन असेल तर अशक्य काहीच नसतं."
"बस थोडा पागलपन होना चाहीये।"
- वरुण भागवत

Exactly! 😎😎
ReplyDeleteThank you!! 😊
DeleteMala ved lagale Aahe...
ReplyDeleteTuze blogs vachun...
🙋👌👌👍👍📝📝
🙏
DeleteBeyond imagination 👍
ReplyDeleteThank you Gaurav!
Delete