A Click by: Varun Bhagwat खेळाच्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या मुलांच्या चमूला उद्देशून coach सर बोलत होते, “खूप मोठी स्पर्धा आहे. जोर लगाके काम करना है.” “यावेळी आपल्याकडे बक्षीसं आलीच पाहिजेत.” अमर उत्साहाच्या भरात म्हणाला. “मागच्या वेळी काय झालं होतं आठवतंय ना?” संजय त्याला खिजवत म्हणाला, “काहीच्या काही हरलो होतो आपण.” “ए, तू negative बोलू नको.” अमर रागातच म्हणाला. “मी fact सांगतोय.” संजय उत्तरला. वाद वाढू लागताच सरांनी मध्यस्थी केली. “मुलांनो, हे सगळं positive, negative नंतर बोलू. आत्ता थोडं practice वर लक्ष देऊया?” मुलं शांत झाली. सर बोलत होते, “आपण का हरलो, याचा विचार कोणी केला आहे का? गडबड कुठे होते आहे हे जाणून घेतलं आहे का? मी एकूणच सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि आपल्याला छोटे छोटे बदल करणं गरजेचं आहे हे जाणवलं. ते ही आत्तापासून.” अनुज मधेच म्हणाला, “सर, स्पर्धेला खूप वेळ आहे. आत्ताच practice?” “हेच टाळायचं.” “म्हणजे?” “सुरुवात आत्ताच करायची.” “हो, खूप मोठे बदल गरजेचे आहेत सर.” संजय पुन्हा बोलला. “एकदम मोठे बदल कोणालाच पटकन झेपत ना...
जे माझ्या मनात आहे तेच अनेकदा आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतं. तेच शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न. कधी कोणती कथा, तर कधी कोणता किस्सा... कधी मनातली कविता तर कधी मनातली संहिता...