
Photo Credit: Sourabh Paranjape
रवी: अरे माझा बाप दुसरं लग्न करायचं म्हणतोय.
अमर: मग problem काय आहे?
समीर: ए, अरे अमऱ्या, तू बरायस ना?
अमर: I’m serious. काय अडचण आहे?
समीर: तुला विचित्र नाही वाटत का हे?
अमर: अजिबात नाही.
रवी: अरे लोक काय म्हणतील? आता माझं वय आहे लग्न करण्याचं.
अमर: हे बघ हे ‘लग्नाचं वय’ वगैरे अंधश्रद्धा आहेत. (असं म्हणत हसू लागला.)
रवी: हे बघ, मला वाद नाही घालायचा आणि मस्करीचा तर त्याहून mood नाहीये. समाज काही इतका पुढे गेलेला नाही सगळं accept करायला.
अमर: माझ्या मते समाजाला या गोष्टीचा acceptance फार आधीपासून आहे.
समीर: what do you mean?
अमर: तुला महाभारतातल्या देवव्रताची गोष्ट माहितीये?
रवी: त्याचा इथे काय संबंध?
अमर: direct connection आहे. त्याची आई गंगा आणि वडील म्हणजे राजा शंतनू यांना काही कारणास्तव वेगळं व्हावं लागलं. शंतनूचं आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम होतं. पण ते separate झाले. तुझे आई बाबा सुद्धा separate झाले होते. right?
रवी: हो... अशा अनेक cases असतात.
अमर: पण तुमची फार सारखी आहे.
रवी: कशी?
अमर: अगदी आपल्याकडे court मध्ये निर्णय होतो तसंच mutual understanding त्यांच्यात होतं. देवव्रत आधी आपल्या मातेकडे आणि मोठा झाल्यावर पित्याकडे अर्थात शंतनू कडे राहू लागला. पित्याकडे राहू लागल्यावर कालांतराने त्याने बापाचं म्हणजेच राजाचं मन जाणलं. राजाच्या right hand कडून त्याला ही गोष्ट कळली की आपल्या पित्याचं एकीवर प्रेम जडलय. त्या मुलीचं नाव होतं सत्यवती. पण ही गोष्ट बाप आपल्या मुलाला सांगत नव्हता.
रवी: घ्या... कसा सांगेल? तेवढा sensible तर राजा पण होता.. पण आमचे परमपूज्य...
समीर: थांब त्याला पूर्ण करू देत.
अमर: मग हा देवव्रत स्वतः त्या मुलीच्या वडिलांकडे गेला आणि आपल्या बापासाठी त्या मुलीला मागणी घातली आणि त्यांचं लग्न लावून दिलं.
रवी: are you serious?
समीर: यार.. या देवव्रताचं नाव कधी ऐकलं नाही. तू तयार नाही ना केलीस गोष्ट?
अमर: गोष्ट खरी आहे. देवव्रत म्हणजेच भीष्म पितामह... अर्थात भीष्माचार्य..
समीर: महाभारतातलं पहिलं character?
अमर: almost. he had courage to fight for his father and he didn’t care की समाज काय म्हणेल.
समीर: रव्या, त्यांना साथ असावी असं वाटणं स्वाभाविक आहे.
रवी: पण त्यांना आधी सुचायला हवं होतं ना?
अमर: अरे आत्ता मिळालं असेल कोणीतरी मनासारखं... ठरवून घडतात का या गोष्टी? just accept it.
रवी: एवढं सोपं नाहीये.
अमर: हो मान्य आहे. पण ज्या समाजाला दोष देतोयस की ते accept करणार नाहीत त्याचं प्रतीक तू होऊ नकोस म्हणजे झालं. तू त्यांच्या मागे उभा राहा.
(तेवढ्यात समोर चहा आला.)
समीर: रव्या, मला पण आधी पटत नव्हतं. पण एक खरं आहे की बाप मनातलं नाही रे बोलत. तू lucky आहेस, तुला सागितलं त्यांनी.
अमर: आणि राहिला प्रश्न रव्या तुझ्या लग्नाचा... (खोडकर कटाक्ष टाकत) तुझं आणि तुझ्या बापाचं एकाच मांडवात वाजवून देऊ (हे ऐकताच समीरने घेतलेला चहा फुर्रर्र करून बाहेर काढला आणि रवी पण चहाचा घोट घेत गालात हसला.)
-वरुण भागवत
Very practical
ReplyDeleteThank you!! 😊
DeleteI have done it in real life.
ReplyDeleteGreat!! 😊
Delete