| A Click by: Varun Bhagwat |
खेळाच्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या मुलांच्या चमूला उद्देशून coach सर बोलत होते,
“खूप मोठी स्पर्धा आहे. जोर
लगाके काम करना है.”
“यावेळी आपल्याकडे बक्षीसं
आलीच पाहिजेत.” अमर उत्साहाच्या भरात म्हणाला.
“मागच्या वेळी काय झालं होतं आठवतंय ना?” संजय
त्याला खिजवत म्हणाला, “काहीच्या काही हरलो होतो आपण.”
“ए, तू negative बोलू नको.” अमर
रागातच म्हणाला.
“मी fact सांगतोय.” संजय
उत्तरला.
वाद वाढू लागताच सरांनी
मध्यस्थी केली. “मुलांनो, हे सगळं positive, negative नंतर बोलू. आत्ता थोडं
practice वर लक्ष देऊया?”
मुलं शांत झाली.
सर बोलत होते, “आपण का हरलो,
याचा विचार कोणी केला आहे का? गडबड कुठे होते आहे हे जाणून घेतलं आहे का? मी एकूणच
सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि आपल्याला छोटे छोटे बदल करणं गरजेचं आहे हे जाणवलं.
ते ही आत्तापासून.”
अनुज मधेच म्हणाला, “सर,
स्पर्धेला खूप वेळ आहे. आत्ताच practice?”
“हेच टाळायचं.”
“म्हणजे?”
“सुरुवात आत्ताच करायची.”
“हो, खूप मोठे बदल गरजेचे आहेत
सर.” संजय पुन्हा बोलला.
“एकदम मोठे बदल कोणालाच पटकन
झेपत नाहीत. या नादात जास्त चुका होण्याची आणि original game विसरण्याची शक्यता
असते.”
“छोट्या बदलांनी काय होणार सर?”
संजयने प्रश्न केला.
सर किंचित हसत म्हणाले, “ब्रिटीश
रायडर्स ना Tour de France जिंकवून देणाऱ्या डेव ब्रेल्स्फोर्ड ला पण असंच म्हणाल
का?”
“हा डेव कोण सर?”
“ब्रिटीश सायकलस्वार एका
शतकामध्ये अर्थात साधारण १९०८ पासून २००० सालाच्या आसपास फक्त १ गोल्ड मेडल जिंकू
शकले होते. त्याच वेळी डेवची coach म्हणून घोषणा झाली. त्याने ब्रिटीश सायकलिंगचा
चेहरा मोहराच बदलून टाकला.”
“मोठे बदल करून?”
“नाही रे बाळा.”
“मग?”
“छोटे बदल करून.”
“काय केलं त्याने?”
“अगदी cycle च्या सिटींग अरेंजमेंट
पासून, टायर्सचा अभ्यास केला. कोणत्या massage gels ने fastest muscle recovery
होते, चांगली झोप लागावी म्हणून कशा पद्धतीत झोपणं गरजेचं आहे, या आणि अशा अनेक
छोट्या छोट्या बदलांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं.”
“याने काय असं होणारे?”
“झालं ना... याचा result
पुढच्या ५ वर्षांत दिसला. त्यांच्या team ने ६० टक्क्यांहून जास्त सुवर्णपदकं
मिळवली. मग काय, ऑलिम्पिक, Tour de France
अशा सर्व ठिकाणी त्यांनी इतिहास रचला. हे शक्य झालं छोट्या बदलांनी आणि सातत्यानी.”
“म्हणून आत्तापासूनच practice!”
अनुज समजायचं ते समजला.
“तेव्हा कुठे ५ वर्षांनी
बक्षीस मिळेल.” संजय मस्करीच्या सुरात म्हणाला.
“मस्करी ठीक आहे. पण आपल्याला
मात्र या वेळी बक्षीस आणायचं आहेच.” अमरने पुन्हा आपलं म्हणणं ठणकावून सांगितलं.
यावर सगळे जण उत्साहात
म्हणाले, “हो, हो बक्षीस मिळवलं पाहिजेच.”
सरांनी पण मुलांच्या उत्साहात
सहभाग घेतला पण लगेचच म्हणाले, “बक्षीस मिळवायचं तर practice सुरु करूया?”
“हो, आज पूर्ण दिवस मी
practice करणार.” अमर म्हणाला.
“आणि उद्या आजारी पडणार.”
सरांनी वाक्य पूर्ण केलं.
“सर.” अमर रडवेला झाला.
“अरे, त्या डेवने सुद्धा एका
दिवसांत सगळं नव्हतं केलं.”
“आत्ताच सरांनी गोष्ट सांगितली
ना अमर. रोज थोडं थोडं करत छोटे बदल करत पुढे जायचं. पालथ्या घड्यावर पाणी.” मुलं
बोलू लागली.
“असू द्या.” सांभाळून घेत सर
म्हणाले, “त्याचा उत्साह बघण्यासारखा आहे. रोज असाच राहू दे म्हणजे झालं.”
अमर हसला आणि म्हणाला, “डेवसारखे
धावून... आपलं, देवासारखे धावून आलात सर.”
यावर सगळे दिलखुलास हसले.
Practice सुरु झाली.
- वरुण भागवत
Comments
Post a Comment