![]() |
| A Click by: Varun Bhagwat |
शेखर आज नेहमीपेक्षा जास्त शांत बसला होता. त्याच्या मोठ्या बहिणीला- शलाकाला कळेना, पण तिला इतकं जाणवलं की आज काहीतरी बिनसलंय. शलाका काही न बोलता त्याच्या जवळ जाऊन बसली. थोडा वेळ पूर्ण शांतता होती.
मग शेखरच बोलला, “वर्गातली सगळी मुलं पुढच्या courses ची तयारी करताहेत.”
“तुझीही चालू आहे की तयारी.”
“पण मला तितकं जमत नाही. मी
त्यांच्याशी compete करू शकत नाही.”
“तुला कोण म्हणतंय की त्यांच्याशी
compete कर?”
“मग काय करू? Please don’t tell me की
माझी competition माझ्याशी आहे वगैरे.”
“आहेच. पण, इथे थोडी वेगळी गंमत आहे.
इथे मुळात, तुझं aim हे तुझं पाहिजे.”
“मी समजलो नाही ताई.”
“म्हणजे, अं, तू गर्दी बनू नकोस.”
“गर्दी?”
“हे बघ, ज्याचं- त्याचं aim हे ज्याचं
त्याचं असलं पाहिजे. आपण आपलं वेगळेपण ओळखलं पाहिजे.”
“पण वेगळेपण काय ताई?”
“हे बघ, ते तू शोध. Specifics तुला
माहिती आहेत. पण मुळात मला इतकं नक्की कळतं की जे सगळ्यांना आवडतं आहे ते तुला
आवडत नाहीये पण सगळे ते करतायत म्हणून तू ते करतोयस. ते सगळे मित्र एक ठराविक course
निवडत आहेत म्हणून तू तो course निवडतोयस. तुला तुझं वेगळेपण माहित नसेल कदाचित
आत्ता, पण शोधायला वेळ आहे, तू तो शोध घे. गरुडाच्या पिल्लाने तो घेतला नव्हता, पण
तू तसं करू नकोस.”
“गरुडाचं पिल्लू?”
“एका माणसाला एक अंड सापडलं. त्याला ते
कशाचं आहे हे कळलं नाही, त्याने ते उचललं आणि कोंबड्यांच्या खुराड्यात ठेवलं. त्या
अंड्यामधून पिल्लाचा जन्म झाला. ते पिल्लू गरुडाचं होतं. पण ते कोंबड्यांसोबत मोठं
होऊ लागलं. त्या जशा वागतात तसं वागू लागलं. त्यांच्यासारखंच जमिनीवरून अगदी थोडंच
वर उडू लागलं, दाणे टिपू लागलं. अशीच थोडी वर्षं गेली. एक दिवस या पिल्लाचं, जे
आता थोडं मोठं झालं होतं, त्याचं आभाळाकडे लक्ष गेलं. त्या मोकळ्या गगनामध्ये
ढगांच्याही वरून एक गरुड उडत होता. पिल्लाने त्याच्या मित्राला अर्थात कोंबड्याला
विचारलं, “हा कोणता पक्षी आहे?” कोंबडा म्हणाला, “माहित नाही, पण हा कायम फार वरती
उडत असतो, उंच आकाशात! आपली तेवढी झेप नाही, चल, दाणे टिपू. छोट्या गरुडाला ते
पटलं. अगदी काही काळ अंगात आलेली चेतना पुन्हा निघून गेली आणि पिल्लू पुन्हा दाणे
टिपू लागलं.”
“गोष्ट संपली?”
“म्हटलं तर संपली, म्हटलं तर माझ्या
छोट्या गरुडासाठी सुरू झाली.”
“अं?”
“तू ठरव, इतर सगळ्यांसारखं तुझं aim
ठेवणार आहेस की तू तुझं स्वत:चं शोधणार आहेस?”
“मित्रांचं aim काय वाईट आहे का?”
“मुळीच नाही, aim कोणाचच वाईट नसतं. ते
वेगवेगळं असतं. खरंतर त्यांच्यातल्या पण अनेकांमध्ये खूप काही त्यांचं वेगळेपण
जपण्याची क्षमता आहे, गरज आहे गरुडाची गोष्ट माहित होण्याची. आज ना उद्या, या ना
त्या प्रकारे ती त्यांना कळेल.”
“तू सांग ना त्यांना ही गोष्ट?”
“सांगायला हरकत नाही, पण अनेकांना
गोष्ट कळली तरी वळत नाही. अनेकांना फुकटचे सल्ले नको असतात. काही जणांचं खरोखर तो
course हे aim असेल. आपण पटकन कोणाला judge करून वाईट ठरवायला नको.”
“म्हणजे कोंबड्या असणं वाईट नाही तर.”
“मुळीच नाही. कुठल्याच प्रकारचा course
वाईट नाही पण त्या त्या course चे आपण गरुड झालो पाहिजे. आपल्यात गरुडझेप घेण्याची
क्षमता आहे हे ओळखलं पाहिजे. गर्दीत fit-in होऊ नये. मला माझ्या भावाची क्षमता
माहित आहे आणि ती त्याने दुर्लक्षित करू नये. बाकी तू सुज्ञ आहेस. तुझ्याकडे बराच
वेळ आहे. त्या गरुडाच्या पिल्लाकडे पण होता. त्याने नाही घेतली पण तू भरारी घेऊन
बघ.”
-
वरुण भागवत

Comments
Post a Comment