![]() |
Wired headphones म्हटलं की त्याचा गुंता आलाच. हाच गुंता सोडवायचा प्रयत्न करत राहुल घरच्या bed वर निवांत पडला. तेवढ्यात तिथे राहुलचा मित्र संकेत आला. त्याने राहुलचा, गुंता न निघालेला headphone बाजूला ठेवला. खिशातून स्वत:चे airdopes काढले. एक त्याला दिला. दुसरा त्याने स्वतःच्या कानात घातला. Airdopes हे Bluetooth ने connect होत असल्याने थोड्या अंतरावर खुर्चीत जाऊन तो बसला.
दोघे गाणी ऐकू लागले. राहुल एकदम जुन्या आठवणींत रमला. बाजूला ठेवलेले गुंत्यात असणारे headphones त्याला दिसले. त्याने ते अलगद स्वतःकडे घेतले. गुंता सोडवत जुन्या आठवणींना उजाळा देऊ लागला.
.
.
Train चा आवाज आधी मोठा होता. जशी train रुळावर रुळली तसा आवाज कानांना normal & used to झाला. राहुल आणि तानियाने एकच wired headphone share केला. Local train मध्ये दोघे एकमेकांसमोर बसले. लोणावळा ते पुणे असा परतीचा प्रवास, बाहेर पावसाचं वातावरण, धुकं जमलेलं, दोघे बऱ्यापैकी चिंब भिजलेले. अर्थात अशा trips ठरवूनच चिंब भिजण्यासाठी केल्या जातात. तशीच ही trip. सोबत group होता. पण आता सगळ्यांची trip enjoy करून झाली होती नि प्रत्येक जण आपापल्या विश्वात होता. ह्या दोघांचं विशेष विश्व, त्यात एकच headphone लावून दोघे गाणी ऐकत होते. Wired headphone मुळे नकळत पण हवीहवीशी आलेली एक जवळीक. आवडतं गाणं लागल्यावर music सोबत डोलताना कपाळावर कपाळ आपटत होतं. एकमेकांचा ओलसर स्पर्श, गरम श्वासोच्छ्वास सगळं छान होतं.
गाण्यातले lyrics relate झाले की अजूनच बहार. एकमेकांना दिले जाणारे कटाक्ष. तिची हळूच खाली जाणारी नजर. त्याने तिला हळूच पाहत राहणं...
तेवढ्यात राहुलच्या शेजारचं सीट रिकामं झालं. तानिया काही न बोलता शेजारी येऊन बसली. मध्येच एक गोंडस लोरी लागली. त्या लोरीमुळे आणि दिवसभर भिजून, खेळून, फिरून, दंगा करून दमल्यामुळे तिला डुलकी लागली. तिने त्याच्या खांद्यावर हलकेच डोकं रेललं. Headphones चा थोडासा गुंता झाला.
.
.
हे आठवत असताना इकडे wired headphones चा गुंता राहुल ने सोडवला. त्याने कानातून airdope काढला. संकेतला दिला.
संकेत - काय रे?
राहुल - मस्त आहेत हे. Sound quality पण उत्तम.
संकेत - अरे मग ऐक की गाणी. काढले कशाला?
राहुल - (हसत, गुंता सोडवलेले wired headphones दाखवत) सुटला बघ गुंता.
संकेत - (डोक्याला हात मारत) अरे ह्यांचा रोज गुंता होतो, तरी का हौसेने वापरतो हे?
राहुल - असंच.
संकेत - mad or what? चिडचिड नाही होत?
राहुल - कशाने?
संकेत - सतत होणाऱ्या गुंत्याने?
राहुल - नाही.
संकेत - का?
राहुल - काही गुंते हवेहवेसे असतात. या headphones च्या गुंत्याने मी कधीच चिडत नाही.
संकेत - तुला काय होतंय?
राहुल - काही नाही. हे wired headphones वापरलेत तू?
संकेत - आधी दुसरा option होता का?
राहुल - कधी कधी option नसणं उत्तम असतं.
संकेत - म्हणजे?
राहुल - काही नाही. हे headphones लावून कोणासोबत एकत्र गाणी ऐकली आहेस?
संकेत - ऐकली असतील.
राहुल - तशी गाणी ऐकण्यात एक romance असतो.
संकेत - कसा?
राहुल - May be तुला नाही कळणार.
संकेत - का?
राहुल - तुला गुंता नको वाटतो ना.
संकेत - गुंता कोणाला आवडतो? (असं म्हणत त्याने दुसऱ्या कानात airdope टाकला.)
राहुल - कोणालाच नाही. पण तो सोडवण्यात मजा असते. आणि तो सोडवता सोडवता romance सुरू होतो. Romance शोधता आला पाहिजे. Entangled wire सोडवण्यात वेळ जातो. तो वेळ घालवायचा. एकत्र सोडवायचं ते. तसं करताना तिच्या हाताचा निसटता स्पर्श होतो. पटकन नजर उचलली जाते नि तिच्याकडे पाहिलं जातं. ती पाहत राहते. मी पण पाहतो. गुंता सुटत नाही, वाढतो. मग पुन्हा सोडवायचा. अडकण्यात गंमत आहे रे संक्या. अडकणं सुद्धा गोड होऊ शकतं. ही जवळीक wired headphone मध्ये घडते बघ. हां, आता जवळीक निरनिराळ्या प्रकारे होते. पण old school प्रेमात हे headphones म्हणजे एक महत्त्वाचा घटक. काळानुसार headphones बदलले. प्रेमाचे प्रकार पण बदलले आणि romance चे प्रकार पण बदलले.
सगळं कितीही आणि कसंही बदललं तरी प्रेम ही गोष्ट अजूनही तितकीच सुंदर आहे बघ. Romance ही तितकाच कमाल असतो. हे wired नाही, आमच्यासाठी romantic Headphones आहेत म्हणायला हरकत नाही.
आता romance खूप प्रकारे करता येतो. महत्त्वाचं हे आहे की Romance शोधता आला पाहिजे. मी त्या romance मधला एक प्रकार romantic Headphone मध्ये शोधला.
.
.
असं म्हणत romantic विचारात बोलत राहणाऱ्या राहुलने संकेतकडे पाहिलं. संकेत गाणी ऐकण्यात मग्न होता.
संकेतचं लक्ष गेलं. त्याने पटकन airdope काढत विचारलं, "काही म्हणालास?"
राहुल हसत म्हणाला, "काही नाही. ऐक तू."
तेवढ्यात राहुलला message आला. त्याने phone पाहिला. तानिया चा msg होता. - लोणावळा trip ला आज ८ वर्ष पूर्ण झाली. दरवर्षीप्रमाणे आज पण जातोय ना आपण पुन्हा trip ला?
राहुल - Yes.
तानिया - मी cab मध्ये आहे. On the way. माझे Headphones विसरले आहेत घरी.
राहुल - दरवर्षीप्रमाणे?
तानिया - चुप. तुझे आहेत ना?
राहुल - हो.
तानिया - wired?
राहुल - हो. By the way, headphones तू विसरलीस की मुद्दाम घरी ठेवून आलीस?
तानिया काहीच बोलली नाही. राहुल हसला.
- वरुण भागवत

Wowowow
ReplyDeleteKhup Sunder
ReplyDelete