![]() |
| Photo Courtesy: Sushil Ladkat |
कॉलेजवयीन मुलांचा एक ग्रुप टेकडीवर व्यायामासाठी आला होता. व्यायाम करून आता सगळे थकले होते. थोडी विश्रांती घेत होते. विश्रांती घेऊन थोड्याच वेळात ते निघणार होते. मी ही तिथे त्यांच्या ग्रुप पासून थोड्या अंतरावर होतो, माझे शूज घालत होतो.
कुठल्या तरी खेळाविषयी ते बोलत होते.
त्यांच्यातला एक जण म्हणाला, “या वेळी गोल्ड मेडल बरं का! कोणाचंच गेलं नाही पाहिजे.”
मला साधारण अंदाज आला की हे एकाच जुनियर
कॉलेज मधले असावेत आणि athletics च्या निनिराळ्या प्रकारांत यांनी भाग घेतलेला
असावा. सगळ्याचं ध्येय होतं की आपल्या सगळ्यांना गोल्ड मेडल मिळालं पाहिजे. त्यांचं
स्पिरीट पाहून छान वाटलं.
तोच त्यांच्यातला अजून एक जण म्हणाला, “हो
हो, सगळ्यांना गोल्ड मेडल मिळालं पाहिजे, मला सोडून!!
दुसरा म्हणाला, “ए रोहित, काय रे तुला
सोडून म्हणजे काय?”
रोहित उत्तरला, “नाही रे, या वेळी
खेळताना जरा दम लागतोय. अरे यार यश, माझं अवघड आहे....”
यश म्हणाला, “तुझी तयारी आम्ही करून
घेऊ. पण म्हणायचं की गोल्ड मिळणार म्हणजे मिळणार.”
इतक्या वेळात माझे शूज घालून झाले
होते. मी तिथून पुढे निघालो आणि हे विचार डोक्यात घोळत राहिले आणि ती Japanese गोष्ट अंधुकशी आठवली. ज्यामध्ये काही मुलांमध्ये race लागते. जो मुलगा finishing line
आधी पार करेल तो विजेता आणि finishing line वर ठेवलेली सगळी chocolates त्याला
मिळणार!
Race सुरु होते. सगळे धावू लागतात. तोच
त्यांच्यातला एक जण अडखळून पडतो. सगळे जागच्या जागी थांबतात. सगळे मिळून त्याला
उचलतात. त्याला आधार देतात. एकमेकांचा हात पकडतात. सगळे जण सोबत race संपवतात.
अडखळणारा मुलगा सुद्धा त्यांचाच सोबत त्यांच्या मदतीने शर्यत संपवतो. मुळात आता ही
शर्यत राहिलेलीच नसते. एकत्र जिंकलेली छोटी का होईना लढाई असते. तिथे पोहोचून सगळ्यात
महत्त्वाचं म्हणजे तिथली chocolates ती मुलं वाटून खातात.
देश जपान असो वा भारत, चांगले विचार
आणि team work आपल्याला यश मिळवून देतात.
मागे वळून पाहिलं. रोहितची दमछाक होत
होती. पण गोल्ड मेडल ची लढाई जिंकण्यासाठी यश मात्र रोहितच्या यशाची तयारी करून
घेत होता. त्यांच्या पाठीमागे गोल्डन सूर्यास्त अजूनच शोभत होता.
![]() |
| Photo: Varun Bhagwat |
- वरुण भागवत


मस्तच प्रेरणादायी
ReplyDeleteधन्यवाद!
DeleteGood start, keep it up
DeleteThank you.
DeleteVery inspiring
ReplyDeleteThanks
ReplyDeleteMastach
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteThank you.
Deleteखूपच छान
ReplyDeleteInspiring
ReplyDeleteInspiring
ReplyDeleteNice.. Inspiring...
ReplyDeleteमस्तच
ReplyDeleteSuperb.....simply great and positive
ReplyDeleteखुपच छान. असाच सकारात्मक द्रीष्टीकोन ठेवा. धन्यवाद.
ReplyDeleteहो. धन्यवाद
DeleteSuperb bhaau👍
ReplyDeleteVery true message and Positive energy
ReplyDeleteछान
ReplyDeleteअप्रतिम... सगळ्यांनी हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे.
ReplyDelete