| A Click by: Sushil Ladkat |
एकदा काही कारणावरून एकाच team मध्ये असणाऱ्या
रंजन आणि शार्दुल यांच्यामध्ये वादावादी झाली. मात्र थोड्याच वेळात त्या
दोघांमधल्या senior ने अर्थात शार्दुलने पटकन हार मानली आणि म्हणाला, “तुझं बरोबर
आहे, रंजन... आपण नंतर बोलू. आत्ता इथे नको.”
यानंतर मध्ये २ दिवस गेले. शार्दुल त्याच्या
cabin मध्ये एकटाच बसला होता. रंजन cabin चा दरवाजा knock करत आतमध्ये आला. काही
काळ तो काही बोलेचना. मग शार्दुलनेच विचारलं, “काय रे, anything serious?” रंजन
म्हणाला, “नाही. nothing.” शार्दुलला आश्चर्य वाटून तो म्हणाला, “काहीच नाही. मग
काही काम आहे का?” रंजन उत्तरला, “काम असं नाही. पण बोलायचं होतं.” शार्दुलने
laptop lock केला आणि म्हणाला, “बोला.” रंजन म्हणाला, “Actually, परवा जो आपला वाद
झाला, तो data मी पुन्हा पाहिला आणि मग लक्षात आलं की you were right. माझंच चुकलं
होतं.”
“हं...” शार्दुलने respond केलं.
“पण शार्दुल, you are senior. तुझं बरोबर पण
होतं. पण मग तू तिथे माझं बरोबर आहे असं का म्हणालास?”
“ती जागा वाद घालण्याची नव्हती.”
“मी समजलो नाही.”
“तुला दोन सिंहांची गोष्ट माहितीये?”
“इथे सिंह कुठून आले?”
“ऐक तर. दोन सिंह एकाच वेळी पाणवठ्यावर
पोचले. आता २ सिंह ना ते. Ego आडवे आले, आधी पाणी कोणी प्यायचं यावरून. अर्थात
झोंबाझोंबी सुरु झाली. ते इतके भांडले की दोघेही या फालतू कारणावरून जीव गमावून
बसले असते.”
“मग मेले का दोघं?”
“नाही. त्यांच्यातलं त्राण कमी होऊ लागलं.
तेवढ्यात त्यातल्या एकाने वरती गिधाडं फिरताना पाहिली. त्याला कळून चुकलं की ही
आपल्या मरण्याची वाट पाहतायत. आपण मेलो की आपल्यावर ताव मारायला हे मोकळे. म्हणून त्या
दोघांनी सलोखा केला आणि तो सिंह दुसऱ्याला म्हणाला, “तुझं होऊ दे. मग मी पाणी
पितो.”
“दोघे वाचले?”
“Absolutely. आता हा scenario त्या दिवसाशी
relate कर. आपला वाद नेमका मोकळ्या जागी चालू होता जिथे इतर सर्वांचा वावर असतो. Team
मधल्या लोकातच झालेली भांडणं बाकीच्या लोकांसाठी अनेकदा फायद्याची असतात. असे काही
लोक असतात जे आपल्या वाईटावर टपलेले असतात. I knew की माझं बरोबर होतं, तिथे तुला
हरवून मी माझा ego सुखाऊ शकलो असतो. पण आपण चांगल्या terms वर काम करत नाही असं उगाचच
बाहेरच्यांना वाटलं असतं. रंजन, तिथे स्वत:चा फायदा बघणारे लोक होते ज्यांना कुणकुण
लागली असती की यांच्यात आपसात मतभेद आहेत. अशा गिधाडांपासून सावध राहणं आणि तुला सावध करणं हे जास्त महत्त्वाचं.
मी बरोबर आहे या पेक्षा आपण सोबत असणं माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे.”
- वरुण भागवत
-
Apt example Varun....great
ReplyDeleteVary correct
ReplyDeleteGreat...
ReplyDelete👌👌👌
Masta
ReplyDeleteशार्दूल अंगी बाणावा म्हणजे नक्कीच गिधाडांचं फावत नाही, मस्त कथा
ReplyDelete