![]() |
| A Click By: Varun Bhagwat |
गाय बिनधास्तपणे वाघाच्या समोरून चाललीये?" शिक्षक मुलांशी बोलत होते. हे ऐकून मुलं हसू लागली. "असं कसं होईल सर?" एक मुलगा सरांना म्हणाला, "आम्ही नाही ऐकलं असं काही!"
"नाही ऐकलं ना... कारण अशी गोष्ट एखादा चमत्कार झाला तरच शक्य आहे." शिक्षक मुलांना सांगत होते, "मुलांनो, चमत्कार करणं कोणाच्या हातात आहे?"
"आपल्या तर हातात नाही बुवा." अलका म्हणाली.
"खरंच?" सरांनी प्रश्न केला.
"कसं शक्य आहे सर आपल्याला?? आपल्याकडे काय जादू आहे की काय?" बाकी मुलांनी पण अलकाच्या बोलण्याला दुजोरा दिला.
सर हसले आणि म्हणाले, "हो आपल्याकडे जादूच आहे. मनात आणलं तर ती जादू वापरून काहीही करणं शक्य आहे. पण त्यासाठी आपला आपल्यावर विश्वास हवा."
मुलं प्रश्नार्थक नजरेने सरांकडे पाहत होती.
सर सांगू लागले, "एकदा एका छोट्या पक्ष्याने समुद्रकिनारी अंडी दिली. काही वेळातच भरती आली आणि समुद्राने त्या पक्ष्याची अंडी स्वतःच्या पोटात घातली. पक्ष्याला फार वाईट वाटलं. आधी त्याने समुद्राला विनंती केली की अंडी परत कर म्हणून. पण समुद्राला आपल्या शक्तीचा गर्व झाला. त्याने विनंती फेटाळून लावली. पक्ष्याने समुद्राला सांगितलं की तू जर माझी अंडी दिली नाहीस तर मी तुला पूर्ण कोरडा करेन."
हे ऐकून वैभव हसला आणि म्हणाला, "कसं शक्य आहे?"
सर म्हणाले, "अजून गोष्ट संपलेली नाही. समुद्र सुद्धा त्या पक्ष्याचं बोलणं ऐकून तुमच्यासारखाच हसला. पण पक्ष्याने निश्चय केला. त्याला त्याची अंडी हवी होती. तो समुद्रातला एक एक थेंब चोचीने उचलून बाहेर टाकू लागला. पक्ष्याचा साथीदारसुद्धा त्याची सोबत करू लागला. ही बातमी हळूहळू समस्त पक्ष्यांपर्यंत पोचली. पक्ष्यांचा राजा गरुड याने फर्मान काढलं की आपण त्याची मदत करूया. त्या बिचाऱ्या पक्ष्यावर अन्याय होतोय. सर्व पक्षी समुद्रकिनारी जमले आणि चोचीतून पाणी घेऊन दूर टाकू लागले. समुद्रातले मासे हा उपक्रम पाहून घाबरले. खरंच पक्ष्यांनी समुद्र कोरडा केला तर आपली खैर नाही. त्यांनी समुद्राकडे याचना केली. समुद्राला सुध्दा मग माघार घ्यावी लागली आणि अंडी परत करावी लागली."
अलका पटकन म्हणून गेली, "सर, चमत्कार!"
सर हसले.
वैभव म्हणाला, "सर, पण ससा कशी करेल सिंहाची शिकार?"
सर वैभवला म्हणाले, "इथे ससा म्हणजे कमकुवत व्यक्ती, अर्थात अशी व्यक्ती जी स्वतःला कमकुवत समजते. सिंह म्हणजे बलशाली व्यक्ती. हे प्रतिकात्मक आहे वैभव. असा विचार कर की दृढनिश्चय आणि एकी असेल तर काहीही शक्य आहे. मग कोणीही कोणालाही हरवू शकतं.
कोणाला कमी लेखायचं नाही. स्वतःला तर मुळीच नाही. मग नक्की घडतात चमत्कार!
- वरुण भागवत

एक नंबर !
ReplyDeleteधन्यवाद
DeleteChhan
ReplyDeleteUr writing is also like magic...
ReplyDelete🙋👌👌👌👍🎊