A click by: Sushil Ladkat योगेश त्याच्या ठरलेल्या इराणी हॉटेलात चहा घेत होता. सुभाष, त्याचा जुना मित्र सुटाबुटात car park करत होता. योगेशने ते पाहिलं आणि शिळ घालून सुभाषला आवाज दिला. अचानक आलेली ही शिट्टी ऐकून सुभाषच काय पण अनेक जण योगेशकडे बघू लागले. योगेशच्या टेबलपाशी सुभाष आला. योगेश म्हणाला, “दोस्ता, किती दिवसांनी भेटलास.” सुभाषचा mood खास दिसत नव्हता. योगेशने चेहऱ्यावरचे भाव टिपत विचारलं, “काय रे काय झालं? ठीक आहेस ना? कुठे निघालास सुटाबुटात?” सुभाष वैतागत म्हणाला, “जीव द्यायला!” योगेश यावर दिलखुलास हसत म्हणाला, “आधी चहा घेऊ... नंतर जीव दे.” सुभाष ते टाळण्याचा प्रयत्न करत होता. पण योगेशच्या उत्साहाने त्याला त्याच्यासोबत चहा घ्यायला भाग पाडलं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर योगेश म्हणाला, “भाऊ, तू तर मोठा माणूस झालास की... car मधून कामाला जातोस की काय रोज?” सुभाषला हे खूप normal आहे असं वाटलं आणि तो ते तोडत म्हणाला, “इथे लागलीये माझ्या आयुष्याची. किती दिवस तीच car वापरायची. माझी प्रगतीच खुंटली आहे असं वाटतंय आता तर मला. रोज नैराश्य येतंय. माझ्यासोबतचे लोक...
जे माझ्या मनात आहे तेच अनेकदा आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतं. तेच शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न. कधी कोणती कथा, तर कधी कोणता किस्सा... कधी मनातली कविता तर कधी मनातली संहिता...