Skip to main content

मैत्री-ण

A click by: Varun Bhagwat


ती आणि विराज बोलत होते.


तिचं कवी-मन म्हणत होतं, "दोस्त, सखा, मित्र, यार...
रक्ताच्या नात्याहूनही जवळचा वाटतो ना फार!!"

विराज विचारात पडला आणि म्हणाला, "हो ना... मैत्रीचा जन्म कधी होतो हे लक्षात येतंच असं नाही."
"Yes, पण जन्माला आलेली मैत्री मरेपर्यंत साथ निभावते." ती पटकन म्हणाली.

"आपल्याकडे जुनं हिंदी गाणं सुद्धा हेच सांगतं- "ये दोस्ती, हम नहीं तोडेंगे। तोडेंगे दम, मगर तेरा साथ ना छोडेंगे।"

"सखा हे नाव किती छान वाटतं ना रे?"

"मित्राशी आपलं सख्य असतं म्हणून तर आपण त्याला सखा म्हणतो आणि कायम साथ निभावतो म्हणून तो आपला साथी असतो..."

"नुसता मित्र मिळणं सोपं आहे; पण खरा मित्र मिळणं अवघड!" ती विचारपूर्वक बोलत होती.

"पण एकदा का खरा मित्र मिळाला की आयुष्य नक्कीच सोपं होऊन जातं." विराज म्हणून गेला.

"आयुष्य नाही सोपं होत, आयुष्य अवघडच असतं; पण ते सोप्या पद्धतीने सोडवण्यासाठी ताकद देतो तो मित्र!"

"हो हे मात्र खरंय! मैत्री कोणामध्ये होऊ शकते गं?"

"कोणामध्येही होऊ शकते."

"कोणामध्येही म्हणजे?"

"म्हणजे कोणामध्येही!"

"नीट सांग ना."

"२ मुलांमध्ये, २ मुलींमध्ये, १ मुलगा आणि १ मुलगी यांच्यांमध्ये..!"

"फक्त यांच्यातच?"

"असं काही नाही. ही basic combinations झाली. खरं सांगते, मैत्री कोणासोबतही होऊ शकते." ती मनापासून बोलत होती.

"यातली कुठली मैत्री टिकते?"

"जी घट्ट असते."

"हं, आयुष्याच्या कुठल्या टप्प्यात होणारी मैत्री सगळ्यात बेस्ट?"

"टप्पा आयुष्याचा असतो. मैत्रीचा नसतो. कोणत्याही टप्प्यात होऊ दे मैत्री, पण अवघड टप्प्यात सुद्धा जी साथ सोडत नाही ती खरीखुरी मैत्री!"

"हे बरोबर आहे. मग मी एखादा नवीन मित्र किंवा मैत्रीण अजूनही मिळवू शकतो?"

"हो, पण म्हणून जुने धागे विसरायचे नाहीत."

"माझे जीवलग मित्र कधीच विसरणार नाही मी."

"मग नवा धागा जोडायला हरकत नाही. कोण आहे हा नवा सखा किंवा ही सखी?"

"तू!"

"काय?"

"हो... असंच असतं. इतकी जवळची व्यक्ती असली की तीच दुर्लक्षित राहते. मला तुझ्याशी मैत्री करायची आहे."

"आज असं अचानक?"

"अचानक वगैरे नाही. पण अगं आज एकूणच जाणवलं की प्रत्येक टप्प्यात तू साथ करते. You never judge me. मला तुला सगळं सांगता येतं. तूच म्हटलीस ना, मैत्री कोणामध्येही होऊ शकते. म्हणून तुला विचारतोय मी की प्रिय डायरी, मुझसे दोस्ती करोगी?"


क्षणभर ती डायरी काहीच बोलली नाही. तिची, अर्थात विराजच्या डायरीची पानं फडफडली. विराजशी मनमोकळं बोलणाऱ्या डायरीला त्याने छातीशी घट्ट पकडलं. फडफडणारी पानं अलगद मिटली आणि मिठीत सामावली.

- वरुण भागवत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...